श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज .
स्वामी महाराजांना कारंजा मुक्कामी आगळ्या वेगळ्या भक्तीचे दर्शन सदगुरूरायांनी घडविले .
कारंजा मुक्कामी श्री स्वामी महाराज असतांना त्यांचा मुक्काम मारोती मंदीरात होता ,ज्या मंदीरात स्वामी महाराजांचा मुक्काम होता तेथिल पुजारी मारूतीची पुजा करून नैवेद्य दाखवल्या नंतर लगेच खाऊन पुजा समाप्त करी स्वामी महाराज मुक्कामी असल्यामुळे पुजार्यास नैवेद्य भक्षण करणे बरे वाटले नाही चागंले दिसणार नाही असे पुजार्यास वाटले त्या दिवशी नैवेद्य खाल्ला नाही तेव्हा स्वामी महाराज मारोती समोर ध्यानस्थ बसले असतांना मारोतीराया महाराजांपुढे तोंड आ करून उभे असल्याचे दिसले मला भूक लागली आहे असे सांगितले ही गोष्ट त्यांनी लगेच तेथिल पुजार्यास सांगितले पुजार्यास आश्चर्य वाटले की आज पर्यत असे कधी घडले नाही कारण
पुजा झाल्यावर तो नैवेद्य आपण खात होतो तो मारोतीराया खात होता पण पुजार्याने सगळे सविस्तर स्वामी महाराजांना सांगितले की पुजा झाल्यावर लगेच नैवेद्य आपण खात होतो पण आज खाल्ला नाही स्वामी महाराज विचारातच पडले की भक्तीचा कुठला प्रकार आहे आपला भक्त ऊपाशी आहे जेवलि नाही तर भगवंत कळवळतो
हा पुजारी निश्चितच अधिकारी भक्त असला पाहिजे .डोळ्यात पाणी आलेल्या व वारंवार मारोती रायाची क्षमा याचना करणार्या पूजार्यास स्वामी महाराज म्हणाले तुम्ही भक्तीचे अत्यूच्च शिखर गाठले आहे भगवंत भुकेने कळवळतो आहे आधी नैवेद्य भक्षण करा त्या शिवाय भगवंताची भूक शमणार नाही .स्वामी महाराजांनी हात जोडून म्हणाले सदगुरूराया आज आपण मला आगळ्या वेगळ्या भक्तीचे दर्शन घडविले माझे ईथे येणे धन्य झाले .
।। श्री गुरूदेव दत्त ।.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"