Tuesday, December 3, 2019

कर्म सिद्धांत

कर्म सिद्धांत
मला काही मेसेजस  आले कि आमचे नातेवाई बरेच आजारी असून सध्या बेडरिडन झाले आहेत. सगळ्या गोष्टी बिछान्यावरती कराव्या लागतात. तर त्यांची लवकर सुटका कधी होईल याबाबतीत काही तरी सांगा.जोतिष शाश्त्रात एक अलिखित नियम आहे तो म्हणजे कोणाचाही मृत्यू सांगू नये त्याप्रमाणे मी या गोष्टीला स्पष्ट पणे नकार दिला.

प्रत्येक जीवात्मा जन्माला येताना ठराविक श्वास घेऊनच जन्माला येत असतो.ते श्वास संपले कि लगेचच सध्याचा देह त्याग करून निघून जात असतो. पूर्वीच्याकाळी ऋषी मुनी श्वसनावरती नियंत्रण ठेवून आपले आयुष्य वाढवू शकत होते. आपण जे ध्यान करतो तेव्हा सुद्धा नकळतपणे आपले श्वसन नियंत्रण होत असते. म्हणजे जेव्हा आपण प्राणायाम वगैरे क्रिया करीत असतो तेव्हा नकळतपणे श्वसन नियंत्रण होऊन काही काळ श्वास बंद झाल्याने आपण आपले आयुष्य काही सेकंद ,मिनिटे,तास,दिवस ,आठवडे ,महिने किंवा वर्ष या क्रमाने वाढवत असतो.

आपले  नातेवाईक ,परिचित ,मित्र यांचे  अचानक झालेले मृत्यू आपल्याला चटका लावून जातात तर काही जण वर्षानुवर्षे अंथरुणाला खिळून असतात. नकळतपणे आपण सुद्धा त्यांची यातून सुटका झाली तर बरे असा विचार करत असतो. हि वेळ त्या व्यक्तीचे आणि त्याचबरोबर इतर व्यक्तींचे सुद्धा भोग असतात. ती व्यक्ती आणि त्यांची सेवा करणाऱ्या व्यक्ती यांचे एक कार्मिक कनेक्शन असते. ते आधीच्या जन्माचे कर्म या जन्मी त्या विशिष्ट वेळी फळाला आलेले असते. त्या व्यक्तीची जमेल तेवढी सेवा करून या कर्म बंधनातून आपली सुटका करून घेणेच योग्य असते.

एकेकाळी कर्तबगार असणाऱ्या व्यक्ती अंथरुणाला खिळून असतात आणि त्यांचे नातेवाईक त्यांची यातून कधी सुटका होईल या विचारात असतात. इथे एक मेख अशी सुद्धा आहे अशा व्यक्ती पुर्वाश्रमी कर्तबगार जरी असल्या तरी नकळतपणे त्यांची आपल्या कर्तव्यात चूक झालेली असते. किंवा आपले कर्तव्य बजावण्यात कमी पडलेले असतात. मग ती आई वडिलांची सेवा असेल किंवा बायको मुले ,बहीण ,भाऊ यांच्या प्रति अपेक्षित कर्तव्य यापैकी काहीही असू शकते. मग ह्याची शिक्षा नकळतपणे अशी भोगावी लागते. या जन्मात किंवा मग पुढच्या जन्मात. कोणत्याना कोणत्या स्वरूपात.

लग्न करून मुलेबाळे झाल्यावरती संसार सुखाचा त्याग करून दूर कुठेतरी साधना करायला जाण्याची इच्छा असणाऱ्या लोकांनी याच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एकवेळ तुम्ही परमार्थ केला नाहीतरी चालेल पण प्रपंच सोडून जाऊन आपले कर्तव्य न बजावणाऱ्या लोकांची पारमार्थिक उन्नती हि कालांतराने थांबते.  (अर्थात याला काही अपवाद असू शकतात पण अशा व्यक्ती पुन्हा जन्म घेऊन त्याचे परिमार्जन करून आपले हे कार्मिक कनेक्शन शून्य करून टाकतात.) त्यामुळे सर्वसंग परित्याग करणाऱ्या लोकांनी हि बाजू सुद्धा लक्षात घ्या.

त्याचप्रमाणे अंथरुणाला खिळलेल्या व्यक्ती,दुर्धर आजार झालेल्या व्यक्ती यांची अशी झालेली अवस्था याचा पूर्वजन्मांशी संबंध असू शकतो. गतजन्मात तुम्ही ज्या जीवाला कळत नकळत त्रास दिलेला असेल तर त्या जीवाचे शिव्या शाप कोणत्या ना कोणत्या जन्मात भोगावे लागतातच. आपल्याला सध्या होणार त्रास हा का होत आहे हे साधनेची विशिष्ट पातळी गाठलेली अध्यात्मिक प्रवृत्ती असलेली व्यक्ती सांगू शकते.

या सर्व गोष्टीत सद्गुरू/नवनाथ हस्तक्षेप करू शकतात .आपली फळाला आलेली कोणती कर्मे या जन्मात भोगू शकतो आणि कोणती नाही तसेच त्याची तीव्रता किती असावी हे मॅनिप्युलेशन करण्याचे काम सद्गुरू करू शकतात. लक्षात घ्या हि सुद्धा साधी गोष्ट नाही यात बऱ्याच गोष्टींचा विचार व्हावा लागतो. म्हणूनच नेहेमी म्हणायचं " सद्गुरू/नवनाथ शरण आलोय ;सांभाळून घ्या ".

काही व्यक्तींचे आपल्याशी उत्तम जमते आणि काही व्यक्तींशी अजिबात जमत नाही याचे पण कुठेतरी आधीच्या जन्माचे कार्मिक कनेक्शन जोडलेले असते. अशा वेळी आपण त्या व्यक्तीला आधीच्या जन्मात काहींना काहीतरी त्रास दिलेला असतो त्या त्रासाचा हिशेब चुकवण्याचे  काम ती व्यक्ती या जन्मी तुम्हाला त्रास देऊन पूर्ण करीत असते. अशावेळी त्या व्यक्तीची माफी मागणारी प्रार्थना करून आपण आपली या कार्मिक कनेक्शन मधून सुटका करून घ्यावी. म्हणजेच कर्म बंधनातून मुक्त होऊन जावे.

एक लक्षात घ्या आपल्याला ज्या व्यक्ती भेटत असतात किंवा संपर्कात येत असतात त्यांचा आपल्या पूर्व जन्माशी कधीना कधी संबंध आलेला असतो आणि एक कार्मिक कनेक्शन निर्माण झालेले असते. म्हणजे आपल्याला जे लोक भेटत असतात ते केवळ कोणत्याना कोणत्या स्वरूपाचा हिशेब चुकता करण्यासाठी मग तो चांगला असेल किंवा वाईट असेल. हे कर्म बंधन समजून घेणे आवश्यक आहे.

आपले आई वडील,भाऊ बहीण, बायको नवरा ,मुले यांच्याशी जो संबंध येत असतो त्याचा संबंध हा पूर्वजन्मांशी असतो. यातील प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला हिशेब चुकवायचा असतो मग तो चांगल्या किंवा वाईट कर्मांचा सुद्धा असू शकतो.

त्यामुळे आत्ताचा जो जन्म मिळाला आहे तो या सर्वांचे हिशेब चुकवण्यासाठी मिळाला आहे तो चुकवण्याचा प्रामाणिक पणे प्रयत्न करा आणि कर्म बंधनातून मुक्त व्हा.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"