*🤲🏻आईसाहेब 🤲🏻*
*!! श्री स्वामी समर्थ !!*
🍃🍃🍃🌼🍃🍃🍃
*हे स्वामीराया....!*
*' मला '* माझ्या वाढत्या वयाची
जाणीव दे. बडबडण्याची *माझी*
सवय कमी कर
आणि प्रत्येक प्रसंगी मी
बोललच पाहिजे ही *माझ्यातली*
अनिवार्य इच्छा कमी कर.
*हे दत्ता....!*
दुसर्यांना सरळ करण्याची
जबाबदारी फक्त *माझीच* व
त्यांच्या खाजगी प्रश्नांची
दखल घेउन ते मीच
सोडवले पाहिजेत अशी
प्रामाणिक समजूत *माझी होऊ देऊ नकोस*
टाळता येणारा फाफटपसारा
व जरुर नसलेल्या तपशिलाचा
पाल्हाळ न लावता
शक्य तितक्या लवकर मूळ
मुद्यावर येण्याची *माझ्यात*
सवय कर.
इतरांची *दुःख व वेदना*
शांतपणे ऐकण्यास मला
मदत करच पण त्यावेळी
*माझ तोंड शिवल्यासारखे*
बंद राहु दे. अशा प्रसंगी
माझ्याच निराशा, वैफल्यांचे
रडगाणे ऐकवण्याची *माझी*
सवय कमी कर.
*स्वामीराया...!*
*केंव्हा तरी माझीही चूक होउ शकती रे*
*कधीतरी माझाही घोटाळा होऊ शकतो,*
*गैरसमजुत होऊ शकतो ह्याची जाणीव माझ्यात ठेव.*
*हे परमेश्वरा,*
अगदी शेवटपर्यंत *माझ्यात*
प्रेमाचा ओलावा, गोडवा,
लाघवीपणा राहू दे.
मी संतमहात्मा नाही
हे मला माहीत आहेच,
पण
*एक बिलंदर बेरकी खडूस माणूस* म्हणून *' मी '*
*मरू* नये अशी माझी
प्रामाणिक इच्छा आहे.
*हे आई....!*
*' मला '* विचारवंत होण्यास माझी
ना नाही गं...
पण मला लहरी
करू नकोस.
*दुसर्याला* मदत करण्याची इच्छा
आणि
*बुद्धी* जरूर मला
दे
पण
गरजवंतांवर
हुकूमत गाजवण्याची
*इच्छा मला देऊ नकोस गं....*
शहाणपणाचा महान ठेवा
फक्त माझ्याकडेच आहे
अशी माझी पक्की खात्री
असूनसुद्धा, *स्वामीराया ,*
ज्यांच्याकडे खरा सल्ला
मागता येइल असे
मोजके का होईना
पण *चार मित्र दे.*
*बस ऐवढीचं प्रार्थना आहे गं आई.....!*
*----स्वामी हो ----*
*!! श्री स्वामी समर्थ !!*
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"