Monday, February 11, 2019

ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान

!! रामकृष्णहरि !!

* ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान *

श्रीसद्गुरु माउली आपल्या सद्शिष्याला ज्ञानदान करतात. म्हणजेच अविद्यारुप माया व अज्ञानाचा नाश करुन डोळ्यांतील कंवळ व गुणदोष रुपी मळाचा दृष्टीदोष दुर करतात. निर्दोष निर्मळ व पवित्रतम् आत्मज्ञानाद्वारे सद्शिष्याला आत्मरुपी निजधन दाखवुन परब्रम्ह्याची दृष्टीभेट करवतात. आणी त्यायोगे स्वस्वरुपी स्थिरावुन, परम् भाग्य ठेवा प्राप्त करुन देतात.

फेडियेला डोळीयांचा कवळ ।
धुतला गुणदोषांचा मळ ।
लावूनि स्तनीं केलों सीतळ ।
निजविलों बाळ निजस्थानीं ॥

माउली ज्ञानोबाराय म्हणतात,
माझ्या डोळ्यांवरील अविद्यारुप मायेची जवनिका दुर करुन, ज्ञानचक्षु वा दिव्यदृष्टी द्वारा ब्रम्हज्ञानाचा हाच परम् गुह्य निजठेवा मला सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपाप्रसादे प्राप्त झाला.
दिव्यचक्षु दृष्टी निवृत्तीने दिधली !
अवघीच बुझाली विष्णू माया !!

श्रीसद्गुरु संत निवृत्तीनाथ महाराजांकडुन माउली ज्ञानोबारायांनी पवित्रोत्तम ब्रम्हज्ञान आत्मसात केलं. आणी सुखरुप असं हे अमृत संजिवन ब्रम्हज्ञान दातृत्व भावाने संपुर्ण विश्वाला प्रदान करुन ज्ञानोबाराय विश्वाची माउली झाले.
निवृत्ती प्रसादे पावलो या सुखा ।
उजळलिया रेखा ज्ञानाचिया ।।

ज्या ब्रम्हबोधाने माउली ज्ञानोबाराय ज्ञानाचे इश्वर म्हणजेच "महाराज ज्ञानेश्वर" पदी स्थित झाले, अश्या ह्या अनुपमेय तत्वज्ञानाचा उपदेश ज्यांच्या कृपाप्रसादाने ज्ञानमार्तंड माउली ज्ञानोबारायांना
लाधला असे ज्ञानदानी विश्वगुरु संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज हे सुद्धा अनुपमेयंच.

निवृत्ती उपदेश ज्ञानिया लाधला !
तत्वीं तत्व बोधला ज्ञानदेव !!

श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराजांचे चरणी
शिरसाष्टांग दंडवत.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"