Tuesday, February 12, 2019

गुरुमहात्म्य

।।श्री स्वामी समर्थ!।
।  गुरुमहात्म्य  -
  प्रत्येक जीव या मृत्यू लोकांत जन्म घेतो, तो मुक्त होण्यासाठीच. मुक्ती हे अंतिम ध्येय असते. आपल्या कर्मानुसार जीवाला जन्म मिळतो. आणि हा जन्म जर चुकला, व मुक्तीसाठी जीवाने काही सदकर्म केले नाही तर पुन्हा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात फिरावे लागते. 
   यातून पार होण्यासाठी सद्गुरुकृपा मात्र पाहिजे. गुरुकृपा वेगळी व गुरुप्राप्ती वेगळी. 
    सद्गगुरुच आपल्याला मुक्ती मार्गावर आणू शकतात. अश्या सद्गुरूंचे महात्म्य म्हणजे त्या परब्रम्हाचे महात्म्य होय. ते वर्णन करण्यासाठी आपल्याजवळ शब्द सामर्थ्य हवे. 
    ईश्वराने आपला प्रतिनिधी म्हणून सद्गुरूंची योजना केली. आपण मात्र, प्रापंचिक नजरेने गुरूला व्यक्ती म्हणून पाहतो, त्यामुळे आपल्या मर्यादित बुद्धीने आपण गुरूंच्या कथनाचा अर्थ काढतो.  गुरू ही व्यक्ती नसून ते तत्व आहे. हे न समजून आपण आपल्या अज्ञानामुळे ज्या पद्धतीने गुरू सेवा करावी, तसे न करता, आपल्या विचारांची पातळी हीन दर्जाची असल्याने, अज्ञानामुळे, गुरू असूनही, जशी व्हावी तशी भक्ती, सेवा न झाल्याने आपलयाला त्या परब्रम्हाची अनुभूती होत नाही. परिणामी आपण मुक्त होत नाही. 
    गुरुमंत्राचा जप व गुरुबद्दल भक्तिभाव याने जसा जसा आपला जप वाढेल तसे तसे आपले ज्ञान वाढत जाते, परिणामी, नकळत आपली बुद्धी शुद्ध होत जाते, त्याचा आपल्या आचार व विचारांवर फरक दिसू लागतो. विचारांची चंचलता कमी होते. मन स्थिर होऊ लागते. मनाची एकाग्रता वाढीला लागते.
    देहभाव, म्हणजे देहा बद्दलचे ममत्व कमी होते. याचे मुळे गुरुबोध मनामध्ये ठसायला लागतो. आपल्यातील स्व ची भावना कमी झाली, की गुरुच आपल्याला कृपांकित होऊन पुढची वाट दाखवतात. आचरणाने व विचाराने स्वतःला गुरूच्या प्रति शरणागत झाल्याने हा बदल होतो. यामुळे एकरूपता वाढते. 

।।श्री स्वामी समर्थ।।

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"