Monday, January 28, 2019

*|| मानवी जीवनावर दिशांचे परिणाम ||*

*|| मानवी जीवनावर दिशांचे परिणाम ||*

पृथ्वीच्या पोटातून विविध प्रकारचे प्रवाह वाहत असतात. त्यांचा अभ्यास करून दिशांचे परिणाम ठरविले गेले आहेत.

*पूर्व दिशा :-* पूर्व दिशेकडून वाहणारे प्रवाह हे प्रकाश मार्गाचे आहेत, देव-देवतांचे आहेत. त्यामुळे पूर्व दिशेकडे तोंड करून जप, ध्यान केले असता खूप चांगले अनुभव येतात, ज्ञानप्राप्ती होते, प्रकाशाचा मार्ग मिळतो, देव-देवतांची कृपा होते.

*ईशान्य दिशा :-* ईशान्य दिशेकडून वाहणारे प्रवाह पूर्व दिशेप्रमाणेच दैवी असतात, प्रकाशमान असतात व ईश्वरीय असतात.

*उत्तर दिशा :-* उत्तर दिशेकडून वाहणारे प्रवाह हे सिद्धपुरुषांचे असतात, ऋषींचे असतात. या दिशेकडे तोंड करून जप-ध्यान केले असता दैवी कृपा व ज्ञान प्राप्त होते. पूर्व, ईशान्य व उत्तर दिशा या मोक्षप्राप्ती करून देणाऱ्या आहेत. 

*पश्चिम दिशा :-* या दिशेकडून वाहणारे प्रवाह साधकाला संपत्ती, ऐश्वर्य व किर्ती प्राप्त करून देतात. देव-देवतांची कृपा प्राप्त करून देतात.

*वायव्य दिशा :-* वायव्य दिशेकडे तोंड करून जप केला असता पश्चिम व उत्तर या दोघांची मिश्रफळे प्राप्त होतात.

*दक्षिण दिशा :-* दक्षिण ही पिशाच्च यांची दिशा आहे. वाईट शक्तींची दिशा आहे. या दिशेकडे तोंड करून साधना केली असता दुसऱ्याचे वाईट करण्याची शक्ती प्राप्त होते. असा मनुष्य कधीही दुसऱ्याचे चांगले करु शकत नाही. दक्षिण दिशेकडे तोंड करून साधना केली असता मनात कधीही चांगले विचार येत नाहीत, फक्त वाईट विचारच मनात येतात. *काळी विद्या (Black magic),* *चेटूक विद्या (Witchcraft)* अशा दुसऱ्याचे वाईटच करण्याच्या विद्या, पिशाच्च विद्या, काळ्या शक्ती प्राप्त करू इच्छिणारे साधक दक्षिण दिशेकडे तोंड करून साधना करतात. अतिशय दृष्ट अशा शक्तीचें प्रवाह दक्षिण दिशेकडून वाहतात.

*नैऋत्य दिशा :-* दक्षिण दिशेपेक्षाही भयंकर अशा शक्तींचे प्रवाह नैऋत्य दिशेकडून वाहतात. या दिशेला राक्षशांची दिशा असे म्हंटले जाते. राक्षसी आत्मे या दिशेला राहतात. दक्षिण दिशेप्रमाणेच या दिशेची फळे आहेत. दक्षिण किंवा नैऋत्य दिशेकडे पाय करून कधीही झोपू नये. पिशाच्च बाधा व रोग होतात.

*आग्नेय दिशा :-* या दिशेला अग्नीची दिशा मानलेले आहे. अग्नितत्वाची उपासना करणारे लोक या दिशेकडे तोंड करून साधना करतात. यक्ष- यक्षिणींची साधना आग्नेय दिशेकडे तोंड करून घेतली जाते.
सर्वसामान्य माणसांच्या जीवनावर दिशांचे परिणाम फारसे दिसून येत नाहीत.
साधकांना मात्र दिशांचे भान ठेवावेच लागते.

*संकलन :- श्री दत्तावधूत वाड्मय*

*|| अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"