देवाशी संवाद ............
*माणूस :* देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का ?
*देव :* विचार ना .
माणूस : देवा , माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास . असं का केलंस तू देवा ?
*देव :* अरे काय झालं पण ?
*माणूस :* सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .
*देव :* बरं मग ?
*माणूस :* मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा मिळाली .
*देव :* मग ?
*माणूस :* आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण बेकार होतं .
*देव :* (नुसताच हसला )
*माणूस :* मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .
*देव :* बरं मग
*माणूस :* संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती . मी इतका थकलो होतो की ए . सी . लावून झोपणार होतो .
का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?
*देव :* आता नीट ऐक .
आज तुझा *मृत्यूयोग* होता . मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला . त्या गडबडीत अलार्म पण थांबला .
तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .
कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती . ते सँडविच वर निभावलं .
तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता .
संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .
*माणूस :* देवा मला क्षमा कर .
*देव :* क्षमा मागू नकोस . फक्त विश्वास ठेव . माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस . आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला
आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो .
मग *श्रवणाच्या* वेळी डुलक्या का येतात ?
तीन तासाच्या पिक्चर मध्ये जराही झोप येत नाही . ...
आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि
नको ते मेसेज फॉरवर्ड करतो .....
देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं
माणूस हा सवडीनुसार , वागत असतो ...!
चहात माशी पडली तर चहा फेकून देतो ,
पण साजूक तूपात माशी पडली तर तो
माशी फेकून देतो तूप नाही ..
अगदी तसच ...
आवडत्या माणसाने चूक केली तर
काहीही न बोलता ती पोटात घालतो पण
जर नावडत्याने केली तर आकांडतांडव
करून बोभाटा करतो.
' माझं ' म्हणून नाही " आपलं " म्हणून जगता आलं पाहिजे ...
जग खुप *' चांगलं '* आहे फक्त चांगलं *" वागता "* आलं पाहिजे ...
सगळं विकत घेता येतं पण
संस्कार नाही।
*समुद्र* आणि *वाळवंट* कितीही आथांग आसले
तरी वाळवंटात आणि समुद्रात *पिक* घेता येत नाही
देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा।
🙏🏻 ** 🙏🏻
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"