Sunday, January 27, 2019

महामृत्युंजय मंत्राचा मराठीत अर्थ*

*ॐ त्र्यंम्‍बकं यजामहे*
*सुगन्धिं पुष्टिवर्धनम्*
*उर्वारुकमिव बन्‍धनान्*
 *मृत्‍योर्मुक्षीय मा मृतात्*
--------------------------
*महामृत्युंजय मंत्राचा मराठीत अर्थ*
---------------------------------
महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तिशाली असा मंत्र आहे. या मंत्राचे अनेक नाव आणि प्रकार आहेत. याला रुद्र मंत्र असेही म्हणतात .
 
त्र्यंबकम मंत्र हा भगवान शिवाचे त्रिनेत्र दर्शवितो. 
याला कधी कधी मृत संजीवनी मंत्र ही म्हणतात कारण
यात गेलेले प्राण परत आणण्याची क्षमता आहे. 
महामृत्युंजय म्हणजे मरनावर विजय मिळविणे . 
 
महामृत्युंजय मंत्र जाप हा निरोगी आणि दीर्घायुष्य मिळविण्यासाठी करतात. 
महामृत्युंजय म्हणजे त्र्यंबकेश्वर.श्री त्र्यंबकेश्वराला दुखाचा आणि दानवाचा विनाशक म्हणतात.
--------------------------
१) महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने अकाल मृत्यू येत नाही आणि यामुळे शरीर निरोगी राहते.

 २)स्नान करताना या मंत्राचा जप केल्यास आरोग्य लाभ होतात.

३) दुधाकडे पाहून या मंत्राचा जप करून हे दूध प्यायल्यास शरीरावर वृद्धावस्थेचा प्रभाव दिसत नाही. 

४) यासोबतच विविध बाधा या मंत्र जपाने दूर होतात. 
---------------------------------
 *जाणून घ्या, कोणत्या परिस्थितीमध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करावा...*

*- ज्योतिष शास्त्रानुसार*

१) जन्मकुंडलीतील ग्रहदोष, ग्रहांची महादशा, अंतर्दशेचा अशुभ प्रभाव दूर करण्यसाठी.

२)- स्थावर मालमत्तेचे वाद संपवण्यासाठी.

३)- कुटुंब, समाज आणि संबंधामधील कलह दूर करण्यासाठी.

४)- एखाद्या गंभीर आजाराच्या पीडेपासून मुक्ती मिळवण्यासाठी.

५)- महामारीच्या प्रकोपापासून दूर राहण्यासाठी.

६)- वात(वायू), पित्त (ताप), आणि कफ (शीत) दोषामुळे निर्माण झालेल्या रोगांपासून दूर राहण्यासाठी.

७)- वैवाहिक संबंधामध्ये बाधक नाडी दोष किंवा इतर बाधक योग दूर करण्यासाठी.

८)- मानसिक तणाव आणि क्रोधामुळे निर्माण झालेली अस्वस्थता नष्ट करण्यासाठी.

९)- अपघात किंवा आजारामुळे जीवावर आलेल्या संकटातून मुक्तीसाठी." 
--------------------------------
*महामृत्युंजय मंत्र किती वेळा जपावा*

शास्त्रांमध्ये भिन्न-भिन्न कार्यांसाठी भिन्न- भिन्न संख्यांमध्ये मंत्राचे जप करण्याचे विधान आहे. तसेच कोणत्या कार्यांसाठी महामृत्युंजय मंत्र किती वेळा जपावे याचा उल्लेख करण्यात आला आहे.

* भीतीपासून मुक्तीसाठी 1100 (अकराशे) वेळा जप केला जातो.

* रोगांपासून मुक्तीसाठी 11000 (अकरा हजार) वेळा जप केला जातो.

* पुत्र प्राप्तीसाठी, प्रगतीसाठी, अकाली मृत्यू टाळण्यासाठी सव्वा लाख या संख्येत मंत्र जपणे अनिवार्य आहे.
 
*मंत्रानुष्ठानासाठी शास्त्रांप्रमाणे नियम पाळणे आवश्यक आहे,*
 *अन्यथा लाभाऐवजी हानी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून प्रत्येक कार्य शास्त्रसम्मत केले पाहिजे. यासाठी एखाद्या योग्य आणि विद्वान व्यक्तीचे मार्गदर्शन घेतले पाहिजे.* 

जर साधक पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने साधना करेल तर इच्छित फल प्राप्तीची शक्यता वाढते.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"