Thursday, January 24, 2019

कर्म



*प्रश्न : जर भगवंत प्रत्येकाच्या ह्रदयात आहे तर तो आपल्या हातुन वाईट कर्मे  होताना अडवत का नाही ?*

*उत्तर : या प्रश्नाचं उत्तर वैज्ञानिक दृष्टिकोणातुन पाहु म्हणजे चटकन समजेल.*

*आज शास्त्रज्ञांनी देखिल सिद्ध केले आहे की,*

*वीज ही (energy ) स्वत: काम करत नाही, वीजेबरोबर जे उपकरण (instrument) लावले जाते त्या उपकरणाकडुन काम केले जाते पण वीज नसेल तर ते काम होऊ शकत नाही*

*जर वीजेबरोबर हीटर लावला तर उष्णता निर्माण होते त्याच वीजेबरोबर जर कूलर लावला तर थंड हवा मिळते*

*ही थंड हवा किंवा उष्णता त्या उपकरणांवर अवलंबुन असते*

*कुलर किंवा हीटर हे वीजेवरच चालतात पण त्यांचं कार्य काय आहे याची दखलसुध्दा वीज घेत नाही. वीज तर दोन्हींमध्ये एकच आहे*

*त्याचप्रमाणे भगवंत ही चैतन्यसत्ता आहे तो स्वत: काहीच करत नाही त्याच्या बरोबर जीव नावाचे जे उपकरण लावलेले असते त्याच्यातल्या मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार या (अंतःकरण चतुष्ट्य) सुक्ष्म गुणांद्वारे कर्म हे केले जाते भगवंत फक्त ते करायची शक्ती या जीवाला देतो*

*म्हणुन आपण जसे कर्म करतो तसे फळ आपल्याला मिळते*

*कर्माच्या  स्वातंत्र्यामुळे भगवंत आपल्याला कर्म करण्यापासुन कधीच अडवत नाही...!*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"