Thursday, January 24, 2019

*राष्ट्रमाता जिजाबाई*


*राष्ट्रमाता जिजाबाई*



*आज प्रातस्मरणीय राष्ट्रमाता जिजाबाई यांची भारतीय पंचांगाप्रमाणे जयंती!!!*

जिजाबाईंचा काळ लक्षात घेतला तर सुलतानी आणि अस्मानी संकटाचा. जिथे
जिजाबाईंच्या जाऊबाईंना (सरदार शहाजीराजांच्या वहिनीला) गोदावरीच्या घाटावरून
मुसलमान सरदारांनी पळवून नेली होती, तिथे सामान्य मनुष्याची आणि त्याकाळातील
आयाबहिणींची अवस्था काय असेल याची कल्पना केली तरी आपल्या अंगावर काटा उभा
राहतो. *"मोगलाई आहे का ?"* असा प्रश्न जिथे दमनशाही होते, तिथे विचारला जातो.
पण त्याकाळापासून हा शब्द प्रचलित आहे म्हणजे त्या शब्दाची *दाहकता*
त्यावेळेला किती असेल, याची आपण कल्पनाच केलेली बरी. आजच्या पिढीला *'मोगलाई'*
या शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्यांना बाराव्या शतकापासूनचा इतिहास
अभ्यासावा लागेल.

संत ज्ञानेश्वरांपासून भागवत धर्माची, म्हणजेच भक्तिमार्गाची मुहूर्तमेढ
पुन्हा रोवली गेली.

*संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।१।।*
*ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिलें देवालया।।२।।*
*नामातयाचा किंकर । तेणें रचिलें तें आवार ।।३।।*
*जनार्दन एकनाथ । खांब दिधला भागवत ।।४।।*
*तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।५।।*
*बहिणी म्हणे फडकती ध्वजा । निरूपण केलें वोजा ।।६।।*

*-     संत बहिणाबाई*

सात्विक शक्तीचे बीज संवर्धन

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"