*श्री गुरूदेव दत्त*
*दैवी जीवनाचे १८ नियम लक्षात ठेवा..?*
देह सोपवावा प्रारब्धावर।मन गुतंवावे सद्गुरू चरणावर!!
*दैवनी जीवनाचे अठरा नियम शांत*
*समाधानी , सद्गुणी , संपन्न , आध्यात्मिक , सुखी अशा जीवनाला दैवी जीवन असे म्हणतात.*
हे दैवी जीवन प्राप्त होण्यासाठी पुढील अठरा नियमांचे तंतोतंत पालन व्हावे लागते . हे अठरा नियम रक्तात भिनले असता ईश्वरी कृपेचा वर्षाव होतो .
१ ) सतत श्वाच्छोश्वासावर लक्ष ठेवावे व मनातल्या मनात परमेश्वराचे नामस्मरण करावे.योग्य वेळ येताच कोणीतरी पुढील मार्ग दाखविणारा भेटतो .ही योग्य वेळ येईपर्यंत सोऽहम् साधना , नामस्मरण , स्तोत्रपठण व एकाग्र चित्ताने करण्याचा प्रयत्न करावा .
२ ) सतत दान करत राहावे.दानाने संपत्ती वाढते.दानाने पाप फिटते. दानाने शांती समाधान प्राप्त होते . दानाने अध्यात्मात प्रगती होते .
३ ) प्राप्त परिस्थितीत का परिस्थितीत समाधानात राहण्यास शिकावे.समाधानात राहण्याची कला साध्य झाली असता कठीण परिस्थितीवर मात करता येते.
४) पूर्वजन्मातील कर्मानुसार सुख , दुःख , लाभ , हानी , जय , अपजय , आरोग्य , अनारोग्य , यश , अपयश या गोष्टी प्राप्त होत असतात . दान व ईश्वरभक्ती या दोन गोष्टींनी यातील नकारात्मक गोष्टींवर विजय प्राप्त करता येतो . म्हणजे दु : ख , हानी , अपयश व अनारोग्य इत्यादी गोष्टींवर विजय मिळविता येतो . यासाठी सतत सत्कर्म करत राहावे
५ ) स्वत : आनंदात राहावे , इतरांना आनंद देत राहावे , इतरांच्या उपयोगी पडत राहावे . तुमचा प्रत्येक परोपकार ईश्वराकडे नोंद होत असतो व आपल्याला आनंद प्राप्त होत असतो .
६ ) आहार , निद्रा , भय व मैथुन या गोष्टी प्राणीही करतात . त्यांचेही कुटुंब असते . समूह जीवन असते व त्यांनाही चिंता , काळजी असतात . मनुष्यात व प्राण्यात फरक इतकाच की मनुष्य परोपकार , दान व ईश्वरभक्ती करून परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश प्राप्त करू शकतो . हे भाग्य प्राण्यांना प्राप्त होत नाही.परंतु पूर्वजन्मातील सत्कर्मामुळे जे प्राणी सत्पुरुषांच्या सहवासात राहतात , त्या प्राण्यांना मरणोपरांत मनुष्य जन्म प्राप्त होतो .
७ ) नि : स्वार्थ असणे , परोपकारी असणे , प्रेमळ असणे हे ईश्वरीकृपेचे लक्षण समजावे .
८ ) सर्व येथे राहणार । काही न येई बरोबर । । सत्कर्म आणि सदाचार । हेचि जीवाचे सांगाती । । शाश्वत आणि अशाश्वत गोष्टी समजण्याचा प्रयत्न करावा.
९ ) एकाच आसनावर स्थिर बसून श्वासावर लक्ष ठेवून दररोज थोडावेळ ध्यान करावे . हळूहळू वेळ वाढवत जावे . तीन तासापर्यंत अशाप्रकारे ईश्वर चिंतन जमले की साधक ही अवस्था प्राप्त होते .
१० ) मन निर्विचार करण्याचा प्रयत्न करावा . कसलाही विचार न करता बराच वेळ राहता आले , की प्रकाश ब्रह्माचा साक्षात्कार होतो . मनात कुठलीही कल्पना अथवा विचार उठू देऊ नये . हे व्यवस्थितरीत्या जमू लागले , की सिद्ध साधक अशी अवस्था प्राप्त होते .
११ ) खूप खोल व दीर्घ श्वास घ्यावा व सावकाश सोडावा . असे बराच वेळ करत बसावे . असे केल्याने मन निर्विचार होऊ लागते . मन एकाग्र होते व हळूहळू निर्विकल्प समाधी लागू होते जर भाग्य खूपच अपवित्र असेल तर शुद्धिकरणासाठी सद्गुरू सेवा करणे आवश्यक आहे.
अध्यात्मात प्रगती होऊ प्रगती होऊ नये म्हणून आपलेच प्रारब्ध अशा कारचे खेळ खेळत असते . प्रारब्धाच्या या पुकारे विविध प्रकारचे खेळ खेळत असते यावर लक्ष ठेवून या प्रारब्धावर मात करण्यासाठी सद्गुरू ची नियमित सेवा करावी लागते .तसेच सिद्धपुरुषांच्या कृपेने विहंगम मार्ग प्राप्त होतो व निर्विकल्प समाधी लागते . गुरु अथवा सिद्धपुरुषाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू नये . जेव्हा शिष्याची तयारी होते तेव्हा गुरु आपोआप भेटत असतो . म्हणून सद्गुणांची कास धरा म्हणजे सिद्धपुरुषांनी कृपा करावी एवढी पात्रता येईल व निर्विकल्प समाधीचा मार्ग सापडेल . पुष्कळ वेळा असेही घडते की एखादा करुणासागर सिद्धपुरुष भक्तांना आपणहून भेटतो . परंतु भक्तांची पूर्वकर्मे जर दूषित असतील किंवा घराण्याचे प्रारब्ध जर खूपच अशुद्ध असेल तर ते अशुद्ध प्रारब्ध सत्पुरुषाची सेवा करू देत नाही किंवा सतपुरुषाबरोबर अहंकाराने वागण्याची दुर्बुद्धी देते व शेकडो जन्मानंतर आलेली संधी भक्त गमावतो . एकदा का अशी संधी गमावली की पुढचे शेकडो जन्म ईश्वराचे फटके खाण्यात जातात .
१२ ) सिद्धपुरुषा बरोबर आत एक व बाहेर एक असे कधीही वागू नायबअसे वागल्याने वातावरणातील देव-देवता नाराज होतात . देव - देवता अशा भक्तांची साथ सोडून देतात . वातावरणातील दुष्ट शक्ती अशा भक्तांच्या मन , बुद्धीवर ताबा मिळवितात . मग या भक्ताच्या हातून अशा काही गोष्टी घडतात की त्याची सर्व पुण्याई नष्ट होऊन जाते . त्याला काहीही चांगले दिसत नाही . सर्वत्र दोष , दुर्गुण त्याला दिसू लागतात . पराकोटीच्या सज्जनां मध्ये सुद्धा त्याला दोष दिसू लागतात . त्यांना नावे ठेवण्यात त्याला आसुरी आनंद प्राप्त होतो . अशी माणसे मग सत्पुरुषांबरोबर व सज्जनांबरोबर आत एक व बाहेर एक अशा पद्धतीने वागू लागतात व खूप कष्टाने मिळवलेली पुण्याई नष्ट करतात . यावरून एक गोष्ट लक्षात येईल , की मनाचा सरळपणा हा एक अत्यंत बहुमूल्य सद्गुण असून , हा सद्गुण ज्याच्याकडे आहे अशी माणसे अत्यंत सात्त्विक व खूप पुण्यवान असतात .
१३ ) मनुष्य जन्म म्हणजे ईश्वरप्राप्तीचे प्रवेशद्वार असून , या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा मानवाने प्रयत्न करावयास हवा . प्रयत्नांची पराकाष्ठा करावयास हवी .
१४ ) सद्गुणांनी मनुष्य देव बनतो . देवाला बाहेर शोधू नका | सद्गुणांची कास धरा आणि सत्कर्म करा देव तुमच्या हृदयात येऊन राहील .
१५) अनुलोम विलोम प्राणा मन शुद्ध होण्यास मदत । लोम प्राणायाम करा , या प्राणायामाने शरीर व मन शुद्ध होण्यास मदत होते . आहार सात्त्विक हलका व पचेल असा असावा . अमली पदार्थांचे सेवन नये . दया , क्षमा , शांती , करुणा , अहिंसा , प्रेम . ईश्वरभक्ती या सद्गुणांनी मानव महामानव बनतो . हे सद्गुण प्राप्त करण्यासाठीच ईश्वराने आत्म्याला मानवाचा जन्म दिलेला असतो .
१७ ) पृथ्वी हे एक विश्वविद्यालय असून मानवता शिकण्यासाठी विविध योनीतील आत्म्यांना ईश्वर मानवरूपामध्ये जन्म देतो व पृथ्वीवर शिकण्यासाठी पाठवितो . येथे जे शिकत नाहीत त्यांना भयंकर शिक्षांना तोंड द्यावे लागते . येथे जे अहंकाराने वागतात , स्वार्थाने वागतात , दुष्टपणा करतात अशा सर्वांना खूप कडक शिक्षा होत असतात .
१८ ) सत्ता , संपत्ती व प्रसिद्धी यांच्या मागे माणसे धावत असतात . परंतु याच गोष्टी अशांती , अस्थिरता व भिती निर्माण करतात . या गोष्टी मानवाला ईश्वरापासून दूर नेतात . माणसाने थोडे दूर रहावे . यांच्या मागून धावून मागून धावणारी माणसे स्वत : चे इतके नुकसान करतात हजारो वर्षांनंतरसुद्धा हे नुकसान भरून येत नाही .वरील अठरा नियमांचे जे लोक श्रद्धेने पालन करतील .ते इहलोकी व परलोकी सुखी होतील
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"