Saturday, January 26, 2019

कशी कराल गणेश आराधना

----------------------------------------
*कशी कराल गणेश आराधना :*
------------------------------------------

 *सगुणोपासना कि निर्गुणोपासना…!*



त्रेतायुगात गणेशाने सिंदुरासुराचा वध करण्याकरीता मयुरेश हा अवतार घेतला. अवतारसमाप्तीच्या वेळेस गणेशाने राजा वरेण्य व राणी पुष्पिकेला गणेशगीता कथन केल्याचे वर्णन आहे. 

त्यावेळी राजा वरेण्याने गणेशास विचारले, "हे गणेशा, तुझ्या व्यक्त आणि अव्यक्त रुपापैकी कोणत्या रुपाची आराधना केलेली तुला आवडेल?"  

*त्यावर गणेशाने सगुणोपासना (भक्तीमार्ग) व निर्गुणोपासना (ज्ञानमार्ग) यावर खालीलप्रमाणे निरुपन केले :*

 *सगुणोपासना (भक्तीमार्ग) :*

माझ्या साकार रुपाची भक्तीभावाने सेवा करतो त्याची आराधना मला मान्य आहे. कारण तो भक्त पंचमहाभूतांचे हित करणारा, आपले हृदय माझ्यात निमग्न करणारा व इंद्रियास आपल्या अंकीत ठेवणारा उपासक असतो. जो सर्व भावांच्या आणि विकारांच्या पलिकडे गेला आहे तो भक्तीमान मला प्रिय आहे. 

पंचमहाभूते, पंचप्राण, पंच कमेंद्रीये, पंच ज्ञानेंद्रिये आणि मन या सर्वांच्या सत्वाचा स्विकार करुन माझी भक्ती करणे योग्य. तसेच
एखाद्या भक्तास काही जरी समजत नसले, तो फारसा ज्ञानी नसला तरी सर्व विद्वानात तो श्रेष्ठ आहे. भक्तीने भजन करणारा चांडालदेखील मला ब्राहृणाहून श्रेष्ठ वाटतो. यासाठी राजा, भक्तीनेच तू मला येऊन मिळावेस हेच श्रेयस्कर. अंत:करण निश्चयाने मला समर्पण कर. 

  *निर्गुणोपासना (ज्ञानमार्ग) :*
 
सगुणोपासना शक्य नसल्यास, अभ्यास व समभाव यांच्या योगाने मला येऊन मिळण्याचा प्रयत्न कर; सर्वगामी, कूटस्थ, निश्चल, अव्यक्त, अक्षर, अनिर्देश्य अशा तत्वाची मत्परायण होऊन जो उपासणा (निर्गुणोपासना) करतो तोही मलाच येऊन मिळतो. सगुणोपासनेने जे साध्य होते तेच निर्गुणोपासनेने होते. परंतु, निर्गुणोपासना ही अत्यंत कष्टसाध्य आहे. आणि हे ही करण्यास असमर्थ असलास तर तू सर्व कर्मे मला अर्पण कर. हे ही करण्यास असमर्थ असलास तर, त्रिविध कर्मांच्या प्रयत्नाने फलत्याग कर.

अभ्यासाहून बुद्धी, बुद्धीहून ध्यान श्रेष्ठ आहे. सर्व कर्मे त्यागाहून श्रेष्ठ व या सर्वांहून शांती श्रेष्ठ आहे. जो निरहंकारी, कोणाचा द्वेश न करणारा, ममतारहीत आहे, जो सर्व द्वंद्वांना नाहिसे करुन समत्वदृष्टी झालेला आहे. सत्व, रज व तम या तीन गुणांतील तत्वांचा स्वीकार करुन माझी भक्ती करणे योग्य. मी तेजाच्या रुपाने सर्व वस्तुमात्रात असतो.

*सगुणोपासनेस अनुसरुन*

गणेशपूजनात २१ अंकाचे महत्त्व मिळाल्याचे दिसून येते. 

२१ या अंकाची उक्ती 

 ज्ञानेंद्रीये, कमेंद्रीये, पंचप्राण, पंचमहाभूते व मन यासर्वांपासून एकवीस (२१) या अंकास गणेशपूजनात महत्त्व मिळाल्याचे दिसून येते. 

२१ या अंकाची उक्ती खालीलप्रमाणे :
२१= (५+५+५+१)
५ – ज्ञानेंद्रीये (त्वचा, नाक, कान, डोळे, जीभ)
५ – कमेंद्रीये (हात, पाय, वाणी, उपस्थ, गुद, मन)
५ – पंचप्राण (प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान)
५ – पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश)
१ – मन

अशा प्रकारे २१ अंकाचा उपयोग करुन उपासना केल्यास गणेशाची सगुणात्मक उपासना केल्याचे फळ प्राप्त होते.
माहिती संदर्भ :- आंतरजाल
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
-------------------------------------------------

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"