श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला आहे अत्यंत उत्कट अनुभव देणारा हा ग्रंथ सर्वत्र वंदनीय आहे. काही लोकांचे असे गैरसमज आहेत की गुरुचरित्र फक्त ब्राह्मणांनीच वाचावे अशा अफवा पसरवणारे लोक अर्धशिक्षित आणि कसलाही अभ्यास नसलेले असतात.मात्र काहीतरी पिल्लू सोडून देण्याने समाजात विनाकारण गैरसमज होतात आणि गोंधळ निर्माण होतो. स्वतः दत्त महाराजांनी जात-पात कधीही मानली नाही. त्यांच्या भक्त मंडळींत कितीतरी जातींची मंडळी होती. प्रत्येकाला त्यांनी अत्यंत सुंदर प्रबोधन केले. मात्र श्री गुरुचरित्रांतील काही अध्याय समजण्यास अत्यंत कठीण आहेत. विशेषता छत्तिसावा अध्याय किंवा वेदांचे अध्याय यांचे अर्थ संस्कृत जाणणाऱ्याला किंवा धर्माच्या अभ्यासकाला जेवढे लवकर कळतील तेवढे सामान्यांना कळणार नाहीत मात्र दत्तप्रभूंच्या भक्तांवर त्यांनी केलेली कृपा याचे जे अध्याय आहेत ते अत्यंत उच्च प्रकारची भक्ती निर्माण करणारे आहेत म्हणून स्त्रियांनीसुद्धा गुरुचरित्र वाचू नये हा स्त्रियांना कमी लेखण्याचा हेतू नाही तर परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंबे स्वामी महाराज यांनीही स्त्रियांनी गुरुचरित्र वाचू नये असा उपदेश करण्यामागे शास्त्रीय कारणे आहेत.एक म्हणजे स्त्रियांची शरीर रचना रोज साडेतीन तासांची विशिष्ट बैठक घालण्यासाठी योग्य नसते तसेच संसारात अनेक जबाबदाऱ्या स्त्रियानाच पार पाडायच्या असतात आणि अशा पद्धतीने रोज तीन तास असे सात दिवस त्यांना बसणे शक्य नसते तसेच त्यांचा मासिक धर्म अमुक दिवशी येईल अशी खात्री नसते आणि पारायणाला बसल्यानंतर अशी अडचण आल्यास पारायण अर्धवट राहते व पुन्हा सुरू करावे लागते तसेच श्री गुरुचरित्र हा ग्रंथ विरक्ती निर्माण करणारा आहे आणि स्त्रियांना अशा प्रकारची विरक्ती येणे हे कुटुंबासाठी योग्य नसते.मात्र "स्त्रियांना नाही वेगळे कर्म पती देतो अर्धा धर्म"या न्यायाने बायका संसारातच खूप पुण्य जोडीत असतात म्हणून स्त्रियांनी संपूर्ण पारायण करण्यापेक्षा महाराजांनी ज्यांच्यावर कृपा केली अशा भक्तांच्या मधुर कथा जरूर वाचाव्यात त्यामुळेही गुरुचरित्र वाचल्याचे फळ मिळू शकते मात्र जे अध्याय समजत नाहीत त्यावरून नुसती नजर फिरवणे आणि अर्थबोध न होणे हे टाळण्यासाठी स्त्रियाच नव्हे तर पुरुषांनाही कथा वाचण्याचा सल्ला टेंबे स्वामिंनी दिला आहे.वारंवार " स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे का का वाचू नये "असे प्रश्न महिला विचारतात म्हणून आज विस्ताराने उत्तर दिले आहे मात्र ज्या स्त्रीचा मासिक धर्म थांबला आहे आणि ती बैठकीस सक्षम आहे तसेच संस्कृतचा अभ्यास असून अर्थबोध होण्याची विद्वत्ता आहे तिने गुरुचरित्र वाचल्यास तार्किक दृष्ट्या अडचण नाही. दत्त महाराज संन्यासी असल्याने पावित्र्य,सोवळे-ओवळे पाळले जावे ही अपेक्षा असते बायकांना सर्व अवधाने सांभाळून तेवढा वेळ व स्वास्थ्य मिळणे कठीण असते.हा सगळा विचार करूनच काही नियम घातले आहेत.म्हणून स्त्रियांनी गुरुचरित्राचे अध्ययन करावे पण सप्ताह पारायण करू नये असा सल्ला दिला आहे. दत्तप्रभू सर्वांचे आहेत म्हणून आणि गुरुचरित्रात त्यांनी अनेक स्त्रियावरही
कृपा केली आहे हे लक्षात घेता ते स्त्रियांचा किती मान ठेवत होते हे लक्षात येते म्हणून अर्धवट अभ्यास केलेल्यांनी मनात येईल तसे अपप्रचार करू नयेत.धर्माने सर्वत्र स्त्रियांना अत्यंत मान दिला आहे त्या समाजाचे भूषण आहेत एकदा लोकमान्य टिळकांच्या नातीने विचारले,"स्त्रियांना सीता व्हा असे सांगतात, पुरुषांना राम वासे का सांगत नाहीत?"त्यावर लोकमान्य म्हणाले," बाळा सीतेच्या जीवनातूनच राम निर्माण होतो."आपली आई आजी पत्नी मुलगी ह्या पुरुषांचे श्रद्धास्थान असतात म्हणून स्त्रियांसाठी शास्त्रकारांनी घातलेले काही नियम हे त्यांच्या आयुष्याचा विचार करूनच आणि जबाबदाऱ्या पाहूनच घातले आहेत कुठल्याही महापुरुषाने स्त्रियांना धर्मात सहकारी करून घेऊ नये असे म्हटलेले नाही. उलट पुजेला बसताना सुद्धा स्त्रियांना स्वतंत्र उपचार करावे लागत नाहीत.फक्त पतीच्या हाताला हात लावून पुण्यप्राप्ती करता येते. कारण संसार उत्तम रीतीने करणाऱ्या स्त्रिया महान पुण्य जोडत असतात म्हणून श्रीगुरूचारित्रा संबंधी कोणतेही विकल्प स्त्रियांनी मनात ठेवू नयेत व पुरुषांनी पसरवू नयेत ही विनंती. श्री गुरुचरित्र हा महान अनुभव देणारा परम पवित्र ग्रंथ आहे.तो सर्वांनाच वंदनीय आहे म्हणून पारायण करणाऱ्या लोकांनाही नियम सांगितले आहेत की त्यांनी एकभुक्त रहावे, सप्ताह काळात अत्यंत पवित्र राहावे,ब्रह्मचर्य पालन करावे, दिवसभर गप्पा-टप्पा न करता चिंतन करावे रात्री डावा कान भुईला लावून झोपावे आणि पहाटे लवकर स्नान करून शास्त्रोक्त रीत्या भस्म लावून वाचन सुरू करावे आणि अर्थबोध होईल इतक्या सावकाशपणे प्रत्येक ओवी हृदयात रुजवावी सप्ताह समाप्तीचे वेळी निश्चये दत्तमहाराज शुभ अनुभव देतात दत्त महाराजांना बर्फी फार आवडते म्हणून नैवेद्याला बर्फी आणावी आणि सप्ताह समाप्तीनंतर शक्यतो एका ब्राह्मणाला आणि सवाष्णीला भोजनास बोलावून त्यांना दक्षिणा द्यावी. अशाप्रकारे नियमाला अनुसरून आणि सप्ताह करावा.मात्र स्त्रियांनीसुद्धा कथा जरूर वाचाव्यात.नमस्कार.(शरद उपाध्ये.)
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"