🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
अपराध क्षमा आता केला पाहिजे
गुरू हा केला पाहिजे ।
अबध्द सुबध्द गुण वर्णियले तुझे ।।ध्रु।।
नकळेची टाळविणा वाजला कैसा
गुरू हा वाजला कैसा ।
अस्ताव्यस्त पडे नाद झाला भल तैसा।। 1 ।।
नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर
गुरू हा कंठ सुस्वर ।
बरा नाही झाला वाचे वर्ण उच्चार ।। 2 ।।
निरंजन म्हणे देवा वेडे वाकुडे
गुरू हे वेडे वाकुडे
गुणदोष नसावा हा सेविका कडे।। 3।।
अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरू हा केला पाहिजे ।अबध्द सुबध्द गुण वर्णियले तुझे ।।
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"