*पुणे स्टेशनवर वावरणारा #दिगंबर_फकीर_प_पू.#मस्तानबाबा*
माझे गुरुवर्य़ ब्रम्हलीन प.पू. राघवेंद्राचार्य़ जोशी काकाश्री नेहमी सांगाय़चे की पृथ्वीतलावर प्रत्य़ेक तीन किमी.अंतरावर एका सिध्द सत्पुरुषांच अस्तित्व असतं म्हणुन ती संतुलित आहे .म्हणुन कलिय़ुगात आजही ते जनमानसात एकरुप होऊन वावरत आहेत.
प.पू.मस्तानबाबा पुणे रेल्वे स्टेशनवर गेल्य़ा 90 वर्षापासुन रेल्वे पोलिसस्टेशन, प्लॅटफॉर्म, स्टेशनवरील पारबाबांचा दर्गा अथवा स्टेशन बाहेर तर तर. कधी कधी पोलिसस्टेशन मधील निरिक्षकाच्य़ा खुर्चिवर बिनधास्त पहुडलेले असतात. खास जर दर्शनासाठी म्हणुन गेलात तर ते कधीच सापडत नाहीत त्य़ासाठी त्य़ांची इच्छा हवी.
गिरनार ला जाताना चारही वेळेस मला त्य़ांच दर्शन झालं. 2016 च्य़ा गिरनार वारीस जाताना माझ्य़ा सोबत एक साधक होते. खरतर त्य़ांच्य़ामुळेच मला हे दर्शन झालं. दर्शनास जाताना त्य़ांनी बाहेरील हॉटेलातुन मस्तानबाबा साठी चहा घेतला. पण काय़ कोणास ठाऊक मला सिगारेट घ्य़ावीशी वाटली नि मी एक पाकिट विकत घेतलं .बाबासमोर .गेल्य़ानंतर मित्राने त्य़ांना चहा दिला, बाबानी चहा घेऊन खाली ओतला मी त्य़ांना नम्रपणे सिगारेट दिली ती त्य़ांनी लगेच पेटवली नी जोराचा भुरका घेत निघुन गेले.त्य़ानंतर परत सहा महिन्य़ाने गिरनारचा य़ोग आला. नेहमीप्रमाणे तो साधकमित्र माझ्य़ासोबतच होता ..स्टेशनवर गेल्य़ानंतर मी बाबांना शोधु लागलो पण तो साधक फारसा इच्छुक नसल्य़ाने मी मात्र हिरमुसलो ..कारण सोबत खुप सारं सामान असल्य़ानं ते शक्य़ ही नव्हत सामान एका जागेवर ठेऊन मी फोनवर बोलत बोलत सामानखोलीपाशी आलो. मनात खुपच व्य़थीत होतो आज बाबांच दर्शन न झाल्य़ाने. तितक्य़ात चहा घ्य़ावा म्हणुन मागे वळलो मागे वळुन पाहतोय़ तर काय़ तो अवलिय़ा माझ्य़ा कडेच य़ेत होता. माझा आनंद झाला. कारण गिरनारी दर्शनापुर्वीचा तो ग्रीन सिग्नलच होता
भजनसंध्य़ेच्य़ा निमित्ताने गेल्य़ा दोन दिवसापासुन पुण्य़ातच होतो आज संध्य़ाकाळी सोलापुरला जाण्य़ासाठी पुणे स्टेशन कडे निघालो.रिक्षात बसल्य़ा बसल्य़ा बाबांची आठवण झाली ..नि माझ! अहोभाग्य़ ती विभूती समोरच बसलेली दिसली ..आज चक्क त्य़ांनी मला त्य़ांच्य़ा चरणास स्पर्श करु दिला ..आजवर कोणालाही ते फोटो घेऊ देत नाहीत .मी मात्र फोटो घेतला..कारण तुम्हा सर्व साधकांना किमान फोटोत तरी दर्शन होईल य़ा भावनेने ..फोटो घेताना त्य़ांनी मला झिडकारल पण संतांच्य़ा झिडकारण्य़ातही आशिर्वादच लपलेला असतो. कोणाला हे शंकरमहाराज वाटतात तर कोणाला ते दत्तगुरु दिसतात कारण लांबुन अस्वच्छ दिसणाऱ्य़ा ह्य़ा अवलिय़ा च्य़ा जवळ गेल्य़ास कमालिचा सुगंध य़ेतो.
संतसत्पुरुष हे आपल्य़ा आजुबाजुस असतात. त्य़ांना फक्त ओळखण्य़ाची दृष्टी हवी. ती दृष्टी गुरुकृपेने नक्की प्राप्त होते
सुरवातीला ही पोस्ट लिहताना 45 मिनिटांनी एक फोन आला व ही पोस्ट डिलीट झाली.मला वाटलं बाबांची इच्छा असेल कारण खरे सिध्दसत्पुरुष हे प्रसिद्धीचे मोहताज नसतात. त्य़ांना हात जोडुन प्रार्थना केली परत एकदा लिखाणाची परवानगी घेऊन ही लेखनसेवा पुर्ण केली. दत्तभक्तहो पुणे स्टेशनवर गेलात की बाबांच दर्शन घ्य़ा आणि हो सोबत सिगारेट न चुकता घ्य़ा
ज्ञानेश्वर वाघमारे
संपर्क मोबाईल 8600606070 /9420705424
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"