.किर्तनकारांनी कीर्तनाचे किती पैसे घ्यावे ? वेळात वेळ काढुन वाचा सविस्तर -
संत तुकाराम महाराज यांचे कीर्तन ऐकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज येत असत. छत्रपती तुकोबारायांना मागेल ते देण्यास तयार होते, पण तुकोबांनी छत्रपतींकडून एक रुपयाही घेतला नाही. आपल्या संसाराचं वाटोळं केलं, पण जगाला अभंग गाथा रुपी अमूल्य ज्ञान दिलं.
मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. काही अपवाद सोडले तर आजचे कीर्तनकार खूप पैसे घेतात. 10 हजार, 15 हजार, 20 हजार. अहो 2 तासासाठी एवढे पैसे. अनेक जणांना महिन्याला 10 हजार पगार मिळतो तर, कीर्तनकार 2 तासाचे 10 हजार घेतात.
जे जास्त पैसे घेतात त्यांना आपण ज्ञानी (भारी) महाराज समजतो. मग तुकोबाराय तर एक कवडी सुद्धा घेत नव्हते. मग ते हलके महाराज होते का?
खरं सांगायचं तर किर्तनकारामध्ये हलकं/ भारी काही नसतं. कोणाशी वाईट वागू नका, आई वडिलांची सेवा करा, आपल्यापासून इतरांना दुःख होईल असं काही करू नका, भगवंताची भक्ती करा, हे असं सर्वचजण सांगतात.
सर्वांनी एक लक्षात ठेवावे... मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रात दुष्काळ सदृश स्थिती आहे. गावोगाव सप्ताह होतात, ते व्हायलाच पाहिजेत. पण 20 हजार आणि 25 हजाराचे कीर्तनकार आणण्यापेक्षा 2 हजार 5 हजाराचे आणा. आणि विनाकारण होणारा खर्च वाचवा.
खरंतर किर्तनकारांनी पैसेच घ्यायला नाही पाहिजे, इतर कोणताही व्यवसाय करून त्यावर उपजीविका भागवली पाहिजे आणि विनामूल्य हरिकीर्तन केले पाहिजे.
तुकोबारायांचा एक अभंग आहे.
"जेेथे कीर्तन करावे। तेथे अन्न न सेवावे।।१।।
बुका लावू नये भाळा। माळ घालू नये गळा।।२।।
तटावृषभासी दाणा। तृण मागो नये जाणा।।३।।
तुका म्हणे द्रव्य घेती। देती तेही नरका जाती।।४।।"
या अभंगात तुकोबाराय सांगतात की , ज्याठिकाणी कीर्तन केले त्याठिकाणी जेवण सुद्धा करू नये. शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात की, जे कोणी हरिकीर्तनाचे पैसे घेतात, आणि जे देतात, ते दोघेही नरकात जातात.
कृपया सर्वांनी यावर विचार करावा,
🙏🙏🙏🙏🙏
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"