Monday, May 13, 2019

दहीभात ने जेवण का संपवावे !!!!!

पुर्वी रोज भोजन करताना शेवटी भात खाणे व तोही दहीभात खाणे अत्त्यावश्यक असायचे. आणि तो भात कोणी नको म्हटलं तरी आग्रहपूर्वक वाढला जायचा! आग्रह करताना सांगितले जायचे, " शेवटचा दहीभात खाण्याने सासरवाडीला श्रीमंतीचे भाग्य येते. आणि त्या श्रीमंतीचा पहिला सिंहाचा हिस्सा जावईबापूंनाच लाभतो ! " 
मग मात्र तो जावई, निमूटपणे व आनंदी होऊन शेवटचा दहीभात खात असे ! 
.
आपल्या धर्मात अशी कितीतरी उदाहरणे आहेत की जी धर्माने सहजासहजी लोकांच्या रोजच्या जीवनात, न टाळता येणारी म्हणून बसविली आहेत!

मग, काय आहे, नेमके, या शेवटाच्या दहीभाताचे इंगित ? महत्व व गौडबंगाल ?

यामागे, खरेतर फार मोठे आयुर्वेदिक  शास्त्रीय कारण आहे ! 
पण ते तसे आरोग्यदायी व अत्त्यावश्यक म्हणून सांगितले असते तर तत्कालीन समाजाने स्विकारलेच असते, मानलेच असते, किंवा दैनंदिन अंगिकारले असतेच, याची खात्री नव्हती ! मग मानवी जीवनाला अत्त्यावश्यक बाब या पध्दतीने सातत्याने सांगितली गेली म्हणून ती आजवर सुखनैव चालू आहे, अंगिकारली जातेय !

मग नेमके ते भाग्य, सत्य काय आहे ?
जाणून घेण्यासाठी.... आता वाचाच हे...!
.
.

दहीभातात दडलंय आनंदाचे रहस्य; काय म्हणतात शास्त्रज्ञ?

आपण गणपतीच्या हातावर दही भात देतो. तसेच ब्राम्हण वर्ग दही भात खातात.व तो कसा योग्य आहे ते आता सिद्ध झाले आहे.

जगातील सर्वात जुने शास्त्र म्हणून ओळखले जाणाऱ्या आयुर्वेदात माणसाच्या जेवणाची अचूक पद्धत सांगितली आहे. यानुसारच पूर्वीच्या काळी जेवणाची सांगता दहीभात खाऊन केली जायची. यामागील कारणाचा कधी विचार केला आहे का? दहीभात खाल्ल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढते असे एका संशोधनात सिद्ध झाले आहे.

मानवी शरीराला आवश्यक असणारे ट्रिप्टोफॅन नावाचे एक रसायन दह्यामध्ये असते. पण आश्चर्याची गोष्ट अशी की हे रसायन मानवी शरीरात तयार होत नाही. याचाच अर्थ असा की, आपण खाल्लेल्या गोष्टींपासून हे रसायन आपल्या शरीराला मिळते. शरीरातील इतर घटकांसोबत त्याचे मिश्रण झाल्यावर सेरटोनिन आणि मेलाटोनिन ही रसायने तयार होतात. त्यातील सेरटोनिन मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय उत्तम आहे. त्याने आपला मूड चांगला होणे, झोप चांगली लागणे, स्मरणशक्ती वाढणे यांसारखे फायदे होतात. ट्रिप्टोफॅनने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्याला मेंदूत जाणाऱ्या रक्तापर्यंत जावे लागते. ते इतर रसायनांएवढे सोपे नाहीये. त्यासाठी ट्रिप्टोफॅनचे कर्बोदकांबरोबर विघटन व्हावे लागते. कर्बोदकांच्या मदतीने ट्रिप्टोफॅन मेंदूच्या रक्तापर्यंत पोहोचते.

आता तुमच्यापैकी अनेकजणांना असा प्रश्न पडेल की कर्बोदक सांगितल्यावर दही भाताबरोबरच का खावे? याचे प्रमुख कारणे म्हणजे तांदळामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. म्हणून दहीभात खाल्ल्याने मेंदूत सेरटोनिन जास्त प्रमाणत तयार होते. असे केल्याने मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यात तुम्ही मदत करता. त्यामुळे यापुढे जेवणाची सांगता करताना थोडातरी दहीभात जरुर खा.

दहीभात खाण्यामुळे मेंदूचा काम करण्याचा वेग वाढतोच शिवाय आनंदी राहण्यासही मदत होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"