Monday, May 6, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -35

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -३५
उग्र तारादेवीचे विवरण (वर्णन)
तारादेवीच्या उपासकाच्या दुष्कर्मावर श्रीपादांची शिक्षा आणि कटाक्ष
शरभेश्वरशास्त्रींची परवानगी घेऊन आम्ही पुढच्या प्रवासास सुरुवात केली. श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीतच आम्ही मार्ग आक्रमित होतो. थोडया दूरवर गेल्यानंतर आम्हाला एक आश्रम दिसला. त्या आश्रमात एक सिध्द महर्षि रहात होते. ते महर्षि पूर्णत: वैराग्यवंत असून त्यांनी कौपीन धारण केले होते. दोन शिष्य आश्रम द्वारात उभे होते. आम्हाला पहाताच त्यांनी आपण शंकरभट्ट आणि धर्मगुप्तच आहात ना ? असा प्रश्न केला. ''हो आम्हीच आहोत'' असे आम्ही सांगितले. त्यांनी आम्हाला आत नेले. तेथे तारादेवीची मूर्ति होती. ते सिध्द महर्षि तारादेवीचे उपासक होते, हे समजले. मध्यान्ह समय झाला होता. पूजा झाल्यानंतर भजनास प्रारंभ झाला आणि भजन संपल्यावर आम्हाला भोजन देण्यात आले.
सिध्द म्हणाले ''तुम्ही येणार असल्याची पूर्वसुचना आम्हाला श्रीपादांनी अगोदरच दिली होती. श्री प्रभूंच्या आदेशानेच आपले आदारातिथ्य करण्यात आले. मी तारादेवीचा उपासक आहे. भक्तांना ही माता सदैव मोक्ष प्राप्ती देऊन त्यांना तारते म्हणूनच ह्या मातेला ''तारादेवी'' हे नांव पडले आणि तेच व्यवहारात पण आले. हिच्या कृपेने अकस्मात वाकशक्ति प्रसाद रूपाने मिळते त्यामुळे हिचे ''नीलसरस्वती'' असे नांव पडले. ही माता भयंकर अशा विपत्तीतून भक्ताची रक्षा करते. पूर्वकाली ''हयग्रीव'' या नावाचे तिघेजण होते. 1) विष्णुमूर्तिचा अवतार हयग्रीव 2) हयग्रीव महर्षि आणि 3) हयग्रीव राक्षस. तारादेवीने हयग्रीव राक्षसाचा वध केल्यामुळे ती नीलविग्रहरूपिणी या नावाने प्रसिध्द झाली. या देवीच्या कृपेने अति सामान्य मानव सुध्दा बृहस्पती सारखा विद्वान होतो. भारत वर्षात तारादेवीची उपासना वशिष्ठ महर्षिंनी सर्वात प्रथम केली. त्या कारणाने ह्या मातेला वशिष्ठ आराधिता असे नांव पडले. मी तारादेवीचा उपासक आहे. परंतु मला तारा मातेचा दर्शन लाभ कधिहि झाला नाही. मी मिथीला देशातील महिषि या ग्रामातील उग्रतारासिध्द पीठचे दर्शन घेतले. या स्थानात तारा, एकजरा आणि नीलसरस्वती अशा त्रिमूर्ती एकाच ठिकाणी आहेत.मध्यभागी ऊंच मूर्ती आणि आजू बाजूला त्यापेक्षा थोडया लहान आकाराच्या मूर्ती आहेत. तेथेच वशिष्ठ महर्षींनी तारोपासना करून सिध्दी प्राप्त केल्या होत्या असे त्या गावातील वयोवृद्ध लोकांनी सांगितले.
मी इच्छा नसताना ती गाडी ओढण्याचे स्वीकारले. त्या बालकाच्या हातात एक छडी होती. त्या गाडीला ओढण्यासाठी मला फार श्रम पडत होते. तो दिव्य बालक त्याच्या हातातील छडीने मला सारखे मारीत होता. त्या दोघांचेच वजन वीस माणसांच्या बरोबरीचे होते. मोठ्या कष्टाने ती गाडी मी ओढत असता, दु:खावर मीठ चोळल्याप्रमाणे तो बालक छडीने जोरजोरात मारत होता. माझ्या पाठीतून रक्तधारा वाहु लागल्या आणि दु:खाचा भार वाहातच मी ती गाडी त्या बालकाच्या मातागृहापर्यंत आणून कशीबशी पोहोचविली.
त्या बालकाबरोबर आलेल्या सेवकाला माझी परिस्थिती सहन झाली नाही. परंतु तो बालक त्याच्या विनोदार्थ फार व्रूच्रतेने वागत होता. ह्या दुरात्म्यावर दया माया दाखविलीस तर तू पण शिक्षेस पात्र होशील असे त्या बालकाने सेवकाला बजावून सांगितले. मला कमरेच्या वर कांही वस्त्र नव्हते, रक्ताच्या धारा सारख्या वाहात होत्या, त्या बालकाने घरात जाऊन तिखट आणले आणि माझ्या अंगास लावले. माझ्या कमरेला मात्र महिषि ग्रामात मिळालेले पैंजण होते.
तेवढयातच त्या दिव्य बालकाची पुण्यमूर्ती आजी राजमांबा बाहेर आली. तिचे दुसरे नाव पुण्यरूपिणी असे होते. तिचे दर्शन झाल्या बरोबर माझ्या शरीरातील आग शांत झाली. तिचे यजमान बापनार्युलु या नावाचे सुप्रसिध्द सत्यऋषिश्वर होते. ते म्हणाले ''बाबा तू कोणत्या गावचा आहेस, कोठून आलास ? थोडावेळ विश्रांति घेऊन भोजन करून जावे.'' त्यांनी हिंदुस्थानी भाषेचा वापर केला. त्या सेवकाने, श्रीपादांनी दिलेल्या कठीण वागणुकीचे वर्णन त्यांच्या आजी आणि आजोबां जवळ केले.
तेव्हा श्रीपाद म्हणाले ''आजी ! हा सेवक चक्क खोटे बोलतोय, ह्या माणसाच्या अंगातून रक्त आले नाही. त्या घामाच्या धारा होत्या. मी त्याला तिखट लावलेच नाही. ती चंदनाची उटी होती. हवे असेल तर त्या सेवकाला पहावयास सांगा.'' त्या सेवकाने पाहिले. श्रीपादांनी सांगितलेलेच तंतोतंत खरे झाले. तेवढयात बापनार्युलु म्हणाले ''श्रीपादा ! तू सत्यव्रति आहेस. तिथे रक्ताच्या धारा म्हणालास की रक्ताच्या धारा दिसतील. चंदनाची उटी म्हटलेस की तीच दिसेल. तू जे म्हणशील तेथे तेच दिसते म्हणजे तू साक्षात उग्रतारा देवीचे रूप आहेस असेच वाटते. उग्रतारा देवीच्या अनुग्रहाने वाकसिद्धी प्राप्त होते असे ऐकले होते. पण साक्षात समोरच पाहिले. उग्रतारादेवी प्रमाणे तू केवळ संकल्प मात्रानेच कोणत्याही वस्तुंचे स्वभावधर्म बदलू शकतोस. तुझा लीलाविनोद आता थांबवून त्या अभाग्यावर करुणाकटाक्ष कर.'' त्या वेळी श्रीपाद म्हणाले ''आजोबा ! आपण जास्तच बोललात. मी संकल्प करेन आणि तो संकल्प लगेच फलीभूत होईल असे म्हणालात. हे कोठपर्यंत खरे आहे ? का खोटे ? निर्णय शास्त्रांच्या सहाय्यानेच घेता येईल. असो हा अगंतुक एक सद्ब्राह्मण आहे, उग्रतारादेवीचा उपासक आहे हे सगळे ठीकच आहे, पण याने संन्यास दीक्षा आपल्या गुरुंच्या अनुमतीने न घेता त्याला जसे योग्य वाटले त्या प्रमाणेच त्याने संन्यास घेतला. याच्या पित्याने अनेक कष्ट सहन करून याचे लालन-पालन करून यास मोठे केले. याच्या मातेला गर्भावस्थेत फार कष्ट सहन करावे लागले. हा जन्मला तेंव्हा त्याच्या मातेच्या अंगातून बरेच रक्त गेले . रक्तचळलेल्या घावावर मिर्चिची पूड लावल्यास ते दु:ख कसे असते तसे दु:ख त्या मातेने तेंव्हा सहन केले होते. ते दोघेही आता या जगात नाहीत आणि पूर्व सुकृताने त्यांचा जन्म पीठिकापुरात झाला आहे.''
काशीत वास केल्याचे फळ
''नरसिंह वर्मांच्या घरात असलेला सेवक दुसरा कोणी नसून या अगंतुकाचा पूर्वजन्मीचा पिताच आहे. त्याची पत्नी यांची पूर्वजन्मीची माता आहे. मृत्यु पावलेल्या मोठ्या लोकांना पिंडप्रदान योग्य विधीने न करणे हे एक पापच आहे. ह्या अगंतुकाने संन्यास घेतला असल्याने माता-पित्यांचे पिंडप्रदान केले नाही. याचे पापकर्म आणि याचे पुण्यकर्मानेच याला येथे म्हणजे पादगयाक्षेत्री, श्री पीठीकापुरात ओढून आणले. याने थोडया दु:खानेच याच्या पापकर्मांचे फळ अनुभवले. याच्या संपूर्ण दुर्योगांचा परिहार झाला. शिशु नऊ महिने मातेच्या गर्भात असतो, तसेच काशीक्षेत्रात नऊ महिने नऊ दिवस आणि नऊ घटिका राहल्यास तो मनुष्य पितृशापातून मुक्त होतो. श्री पीठिकापुरम हे काशी क्षेत्रा समान आहे. ह्या अगंतुकाने त्याच्या पूर्वजन्मीच्या माता-पित्यांची सेवा केल्यास हा पितृदेवतांच्या शापातून मुक्त होईल.'' एवढे बोलून श्रीपाद प्रभू मौन झाले. मी प्रभूंच्या आदेशानुसार माझ्या गत जन्मीच्या माता पित्यांची सेवा केली. त्यांचा आशिर्वाद मिळाला त्यांच्या कडून मिळालेले पैंजण देवघरात सुरक्षित ठेवले . मला उग्रतारा देवीच्या अनुग्रहाने सिध्दी प्राप्त झाली. माझ्या तंत्रशक्तीच्या बळावर मी लोकांचे दु:ख, आजाराचा परिहार करू लागलो.
आपण इकडे येण्या पूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांनी मला दृष्टांत दिला, ते म्हणाले. ''शंकरभट्ट आणि धर्मगुप्त असे दोन यात्री या मार्गाने येथे येतील, त्यांचे योग्य आदरातिथ्य करून त्यांची येथे रहाण्याची सोय सुध्दा करावी तसेच माझे पैंजण त्यांना बक्षिस म्हणून द्यावे.''
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"