Thursday, January 24, 2019

उदकशांती



उदकशांती। म्हणजे काय ती केव्हा व का करतात. ......
उदकशांती बद्दल लोकांना फार माहिती नसते.
ती का करावी ?
कधी करावी ?
कोणी करावी ? इत्यादी बरेच प्रश्न लोकांना पडतात किंवा माहितीच नसल्याने त्यांच्या कडून हा महत्वाचा विधी राहून जातो.
*उदकशांती म्हणजे पाण्याची केलेली शांती.*
आपण एखाद्या अंत यात्रेत सहभागी झालो तर घरी येऊन लगेच अंघोळ करतो. आपला देह लगेच शुद्ध करतो. पण जर घरातच अशी घटना घडली तर काय काय शुद्ध करणार आपण आणि कसे ?
आपण ज्या जागेत राहतो त्या जागेची शुद्धी करणे म्हणजे उदकशांती करणे.
🌹उदा.
आपण रोज अंघोळ करतो.
रोज दात घसतो.
कपडे धुतो.
अंथरून पांघरूण नित्य नियमाने धुतो.
रोज लादी पुसतो.
*पण ज्या घरात राहतो त्या घराची शुद्धी करत नाही कधीच*
*का?*
कारण...
माहिती नसते, टाळाटाळ करतो, दुर्लक्ष करतो किंवा होते.
वापरून वापरून घराची ऊर्जा रोज खर्च होऊन होऊन संपलेली असते. मग ती वास्तू तुम्हाला लाभ दायक ठरत नाही. त्याचे परिणाम हळू हळू गंभीर जाणवायला लागतात.
अशी कित्येक उदाहरणे आहेत माझ्या समोर.
वास्तूशांती केली तरीपण त्रास होतोय असा प्रश्न घेऊन येतात लोक.
किती वर्षे झाली वास्तूशांती करून ?
उत्तर असते 5 वर्षे, 8 वर्षे, 10 वर्षे इत्यादी.....
*एकदा जेवल्यावर पुन्हा महिनाभर जेवायला नको असे होते का कुठे ?*
जसा मोबाईल ला चार्जर लागतो,
जसे देहाला अन्न लागते,
*तसच वास्तूला सुद्धा जमलेला मळ काढून शुद्ध करावे लागते वेळो वेळी.*
साध्या पाण्यात कार्बन सोडून त्याचा सोडा बनतो,
साध्या पाण्यात काही टाकले की सरबत बनते,
सध्या पाण्यातूनच फिनाईल बनते..
*तसेच साध्या पाण्याला मंत्रांनी प्रभावित करून ते पाणी घरात शिंपडावे, म्हणजे उदकशांती*
ही शांती फक्त घरात कोणी मृत झाल्यावरच नाही ..
*तर प्रत्येकाने आपल्या घरी नियमित दर तीन वर्षांनी करायला हवी*
काहिजण भाड्याची जागा घेतात, मग ती राहण्यासाठी असो किंवा व्यवसायासाठी असो, ती शुद्ध न करता वापरली तर कित्येक वेळा त्याचे परिणाम भयानक समोर येतात. किती तरी उदाहरणे आहेत समोर ज्यांना भाड्याच्या घरात किंवा दुकानात खूप वेगवेगळा त्रास सहन करावा लागला आहे.
आजारी पडणे, अपघात होणे, मृत्यू होणे, घरात बाधा असल्याचे अनुभवाला येणे इत्यादी खूप त्रास समोर आले आहेत.
*त्यामुळे भाड्याने जागा घेतल्यावर केवळ गणपती पूजन न करता उदकशांती करावी*
काहीजण म्हणतात आमच्याकडे सत्यनारायण पूजा दर वर्षी होते.
उत्तम आहे.
पण मल्टी व्हिटॅमिन आणि पॅरासिटेमोल ह्यातील जो फरक आहे तोच सत्य नारायण पूजा आणि कोणत्याही शांतीत आहे.
पूजा आपले पुण्य संचित वाढवते आणि शांती दोष दूर करते.
त्यामुळे सर्वांनी जागरूकतेने ह्याचा विचार करावा.
उदक शांतीसाठी तिथी व दिवस महत्वाचा तिथी तृतीया एकादशी द्वादशी पौर्णिमा वार बुधवार शुक्रवार रविवार बुधवार सर्वात उत्तम .
|| इत्

शुभं भवतु ||

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"