Thursday, January 24, 2019

शुध्दिचे सोवऴे*


🙏श्री राम🙏
🌼 *शुध्दिचे सोवऴे* 🌼

*सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन सोवऴे या विषयावर लेख देत आहे.*

सांप्रत काऴात नित्य व्यवहारात व धर्मकृत्यात  *"शौच"* म्हणजे *शुचिर्भूतपणा* कसा असावा याबद्दल शास्त्रकारांनी काय म्हटलय हे नीट पाहुया.....

*बरेचदा "मन शुध्द असलं किंवा भावना शुध्द असली कि झालं" सोवऴ काय करायचय....?*
 अशी विचारणा होते. 

*मी शुध्द मनाने सर्व करतो मग हे सोवऴ्याचे नियम मी का पाऴावेत? हा प्रश्न विचारला जातो.*

याचं नीट समर्पक उत्तर वाचावे मग आपण ते पाऴावे किंवा पाऴु नये हा सर्वस्वी आपला हक्क राहिल.......

*आपण नातेवाईंकाकडे  वाढदिवसानिमित्त भोजनाकरता गेलात. पान वाढल्येत,  तेवढ्यात त्या यजमानांना  "लघुशंका किंवा शौचाकरता (संडास) जाव लागलं" व ते हात पाय न धुता तसाच बाहेर आले  व आपणास भोजन वाढु लागले. तर आपणाला चालेल का?*
 (त्यांचे मन शुध्द आहे भावनाही शुध्द आहे)  
*मग आपण ते अन्न आनंदाने ग्रहण कराल का....?*
विचारांती ठरवणे.....

*आपली मोतिबिंदु किंवा एखादी लहान मोठि शस्त्रकिया होणार आहे. डॉक्टर बाहेरुन आले ते तसेच आपल्याला उपचार करणार असतील  (निर्जंतुक कपडे व उपकरणे न वापरता) तर आपण ते चालवुन घेवु का?*
(डॉक्टरांची भावना चांगलीच आहे, मन शुध्द आहे) 
*मग आपण विरोध न करता ही शस्त्रक्रिया करुन घेणार का.......!!*
नीट विचार करा व मनाशी ठरवा......

*स्वयंपाक उत्तम झालाय, हेतु तुम्ही पोटभर जेवा हा आहे. चांगल्या मनाने तो स्वयंपाक केलाय, परंतु त्यात वारंवार "केस" मिऴु लागले तर आपण काय कराल......??*
हे प्रश्न स्वत:करता आहेत.

*शास्त्रकारांनी तीन प्रकारच्या शुध्दि आजीवन आचरण करा, अस म्हटलय....*

१   *अन्न शुध्दि*
२   *चित्तशुध्दि*
३.  *द्रव्य शुध्दि*

या तीनही फार महत्वाच्या आहेत. यालाच *"शौच"* म्हटले आहे.

*अन्नशुध्दि* :
*याबाबत सुलभता आहे. स्नान करुन, ताज्या पाण्याचा वापर करुन, केस बांधुन (मुक्तकेशा वर्ज्य), अन्नपूर्णेचे स्मरण करुन चिडचिड न करता.*  (काय मेली कटकट अाहे वगैरे न उच्चारता)
 *मी बनवलेल्या अन्नाचा आस्वाद प्रत्यक्ष भगवंत "वायुरुपाने "घेणार आहेत.* 
*माझ्या घरची माणस हे अन्न ग्रहण करणार आहेत. पशु-पक्षांनाही यातला एक भाग देणार आहे...* 
(गोग्रास, काकबली)... हा विचार करुन, धुत वस्त्र नेसुन जो स्वयंपाक आपण करतो तो *"सात्विक व शुध्द"* या संज्ञेत येतो.

*जे आपण अन्न ग्रहण करतो त्याच अन्नापासुन शरीरात रक्त बनते व शरीराचे पोषण होते. बुध्दि, चित्त या गोष्टींवर अन्नाचा परीणाम होतो. सतत हॉटेलचे तेलकट, तिखट अन्न खाणारे हे चिडचिडे बनतात.व त्यामुळे तब्येतही बिघडते.....*

*द्रव्यशुध्दि*  : 
*आपण पैसा कोणत्या मार्गाने मिऴवतोय हे देखील फार महत्वाचे आहे.जे लाचखोरी, चोरी, लुट वगैरे अयोग्य मार्गांनी मिऴवलेले धन हे घराण्याचा नाश करते.*

*चोरी करुन मिऴालेल्या पैशाने देवाला पंचपक्वान  वाढलीत, तरी भगवंत ते स्विकारणार नाहीत. उलट मेहनत व श्रम करुन मिऴवलेल्या "वरणभाता चा नैवेद्य, भाजी भाकरीचा नैवेद्य" भगवंत प्रेमाने घेतील.*
*अयोग्य मार्गाने मिऴवलेल्या संपत्तीमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. पुढची पिढी विकृत, अपंग किंवा रोगी जन्मलेली अनेक या उदाहरणे समोर आहेत.*

मनुस्मृतित पाचव्या अध्यायात *ज्ञान, तप, अग्नि, आहार, मृत्तिका, मन, जल, सारवण, वायु, कर्म, सूर्य व काल* या गोष्टी प्रत्येक प्राण्यांच्या शुध्दिची साधने सांगीतली आहेत.
हे कसे ते लगेच स्पष्ट करतो म्हणजे शंका उरणार नाही.....

 १. *धान्य हे सूर्यप्रकाशाने शुध्द होते*
 (आजही आपण उन्हाऴ्यात धान्याला उन लावुन ठेवतो त्यामुऴे कीड लागत नाही).
 
२. *घामाने मलीन झालेली गात्रे पाण्याने शुध्द होतात*
 (हातपाय धुतले स्नान केले कि "फ्रेश "वाटते, त्यालाच शुध्दि म्हटले आहे).

३. *सोने, रुपे ही अग्नि व पाण्याने शुध्द होतात*
 (सोनार दागिने बनवताना अाधी आगीत घालतो, मग पाण्याचा वापर करतो म्हणजे धातु शुध्द होतो)

४. *तांब्ये, कासे वगैरे धातु पात्र क्षार व आंबट पदार्थाने होते* 
(आमसुल किंवा लिंबु-चिंच) अनेक साबण कंपन्याही लिंबाची शक्ती म्हणुन जाहिरात करतात.

५. *सत्य भाषणाने मन शुध्द होते.*

६. *ब्रह्मज्ञान हे बुध्दि शुध्द करते*.

७. *माता भगिनी या प्रत्येक महिन्यास रजस्वला झाल्यानंतर आपसुक शुध्द होतात.*

*दुसर्‍याने दिलेली पीडा आनंदाने सहन करुन जी क्षांती मिऴते त्यांनी विद्वान शुध्द होतात.*

*मलीन झालेली वस्त्रे धुवुन शुध्द होतात.*

*आपण, साबण कंपन्या किंवा डॉक्टरनी हातपाय स्वच्छ धुवा, हे सांगीतले तर एेकतो, पण आई बाबांनी हात पाय धुवुन मंदिरात जा अस म्हटल कि "विज्ञानवाद " जागा होतो.*

*तांब्याच्या भांड्यांना आमसुल किंवा चिंच, लींब लावुन स्वच्छ करा, हे शास्त्रवचन सांगणारे "वेडे "ठरवतो व लिंबुची शक्ती असलेले "साबण" मात्र आपण अभिमानाने मिरवतो.*

*केस बांधुन स्वयंपाक करा अस शास्त्रकार सांगतात ते वेडे असतात, पण कुक किंवा शेफ हे स्वयंपाक करताना डोक्यावर टोपी घाला, हे सांगतात ते मात्र लगेच पटतं.*
 (हेतु - स्वयंपाकात केस येउ नयेत हाच आहे).

*तसेच पूजेला बसताना स्वच्छ(सोवऴे किंवा धोतर उपरणे) वस्त्र सांगीतलय.*

*धुत शुक्ल म्हणजे धुतलेले स्वच्छ व शुभ्र असे वस्त्र नेसावे*

 (रेडिमेड सोवऴ्याची पँट चालत नाही).

 *रेशीम वस्त्रात "जंतु संसर्ग" होत नाही, हा एक भाग आहेच, शिवाय भारत हा उष्ण कटिबंधातील देश आहे. या ठिकाणी घाम जास्त येतो. त्यामुऴे कोट, पँट, टाय, सुट वगैरेंचा वापर केला असता "त्वचा विकार" होतात. सुती वस्त्रात घाम नीट टिपला जातो.....*

*लंडनमध्ये किंवा युरोपात थंडी भरपुर, पाणी सदैव गोठलेले असते, म्हणुन ते "शौचालयात "पेपरचा वापर करतात.*
 आपल्याकडे तसं नाहिये.
*युरोपात रोज स्नान करणे वातावरणाला अनुसरुन कठीण असते म्हणुन "शरीर दुर्गंध" येऊ नये, म्हणुन ते "परफ्युम" वापरतात.*

*वाऴवंटात पाण्याचे दुर्भिक्ष म्हणुन आखाती देशात मुस्लिम दर शुक्रवारी स्नान करतात.*
 
*आपण यातला कसलाच विचार न करता केवऴ मी पुरोगामी आहे, विज्ञानवादि आहे, हे सिध्द करायला यातल्या बरेच गोष्टी "अंगिकारतो".......*

*ह्या सर्व गोष्टीही शरीर "शुध्दित "(सोवऴ्यात) मोडतात..*

*चित्त शुध्दि* :  *ब्रह्मज्ञान प्राप्ती करता, शुध्द: अंतकरणाने, यम-नियम पाऴुन, सत्य बोलणे, सदाचार व सद्वर्तन यांची सांगड घालुन जे तप केले जाते त्याने चित्तशुध्द होते.*

*शास्त्रकारांना "मार्केटिंग" जमत नव्हते, त्यामुळे ते प्रतिगामी ठरले. उदा.हऴद किंवा चंदन लावा, त्याने त्वचा शुध्द होते, हे सांगणारे वेडे ठरले व टर्मरीक क्रिम व सँडल सोपचे कौतुक झाले.*

*शुध्दता ही आचरणाची गोष्ट आहे. ज्याला हे पटेल त्यानी आचरावे न पटेल त्यांनी वरील तीन प्रश्नांची समर्पक व स्वत:च्या मनास पटतील अशी उत्तरे शोधावी, हि विनंती.*

*मी एक अल्पज्ञानी आहे...*

*आपण सर्व विद्वान आहात.....*

*तेव्हा काही चुकले असल्यास क्षमस्व।*

     🙏श्री राम🙏
☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸☘🌸

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"