Monday, January 21, 2019

उत्तरायण

सूर्य पृथ्वीच्या दक्षिण टोकाकडून परत उत्तरेकडे वळल्यानंतर म्हणजे उत्तरायण सुरु होऊन आज 12 वा दिवस!

अर्थातच शास्त्रीय सौर वर्षाच्या १० व्या (पौष) महिन्याची 12 तारीख! 
राज्यघटनेनुसार तयार केलेले भारताचे राष्ट्रीय कॅलेण्डर हे सौर कॅलेंडर असून ते सर्व धर्मातील भारतीयांनी सर्व ऑफिशियल कामकाजात वापरणे आवश्यक आहे.

हिंदू कॅलेंडर हे चांद्र कॅलेंडर आहे. आजची हिंदू तिथी मार्गशीर्ष वद्य 12! 
कोणत्याही देशातील हिंदू लोकांचे हे कॅलेंडर असल्याने जगभरातील हिंदू लोकांनी हे कॅलेंडर वैयक्तिक सण (वाढदिवस), सामाजिक समारंभ (थोर पुरुषांची जयंती उदा शिवजयंती), यासाठी वापरणे आवश्यक आहे.

ख्रिस्ती धर्माच्या संस्थापकाच्या जीवनाशी निगडित वर्षारंभ होणारे आणि सौर कॅलेंडर असूनही कोणताही ताळमेळ नसलेल्या ग्रेगोरियन कॅलेण्डरच्या वर्षातील आज अंतिम तारीख.

ग्रेगोरियन कॅलेण्डरचा वर्षारंभ ख्रिस्ती धर्मसंस्थापकाशी निगडित असल्याने ग्रेगोरियन कॅलेंडर हे फक्त ख्रिस्ती धर्माच्या नागरिकांशी संबंधित आहे. 

शिवाय काही महिने तर (जुलै, ऑगस्ट) युरोपियन सरदारांच्या नावाने आहेत, त्यामुळे तर ग्रेगोरियन कॅलेंडर फक्त युरोपातील ख्रिस्ती नागरिकांसाठी आहे. 

त्यामुळे ग्रेगोरियन कॅलेण्डरचा भारतीय नागरिकांशी काडीमात्र संबंध तर नाहीच शिवाय भारतातील ख्रिस्ती लोकांच्या वैयक्तिक जीवनाशीही संबंध नाही.

या ग्रेगोरियन कॅलेंडरमधील काही महिने तर चक्क चुकीच्या क्रमांकावर (सप्तम-सप्टेंबर, अष्टम- ऑक्टोंबर, नवमं- नोव्हेंबर, दशमं- डिसेंबर) आहेत.

मूळ रोमन कॅलेंडर १० च महिन्यांचे होते, ज्यात त्यांची देवता मंगळ (मार्स) याच्या नावाने सुरु होणारा मार्च हा महिना पहिला तर, डिसेम्बर (१० वा महिना हा अंतिम होता.

कालांतराने जेव्हा त्यांना सौर वर्ष १२ महिन्यांचे ३६५ दिवसांचे आहे असे लक्षात आले तेव्हा त्यांनी दोन अधिक महिने जोडताना ते दशमं (डिसेम्बर) महिन्यानंतर जोडण्या ऐवजी मार्चच्या आधी जोडले. काय हि बौद्धिक दिवाळखोरी!

महिन्यातील दिवस सुद्धा शास्त्रीय पद्धतीवर नव्हे तर युरोपातील राजांच्या लहरीवर ठरले. 

माझ्या नावाच्या महिन्यात अधिक दिवस हवेत असे ज्युलियस ने आणि ऑगस्टस ने सांगितल्यामुळे जुलै, ऑगस्ट ३१ चे झाले, तर ११ महिन्यांच्या दिवसांची बेरीज झाल्यावर उरलेले दिवस वर्षातील खरेतर शेवटच्या (पण धेडगुजरीपणे २ऱ्या क्रमांकावर घुसवलेल्या) फेब्रुवारीच्या वाट्याला आले २८/२९ दिवस!

अर्थातच जगातील कोणत्याही देशातील आणि कोणत्याही धर्माच्या मात्र शास्त्रीय/ वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आग्रह धरणाऱ्यापैकी कोणाचाही ह्या अतार्किक ग्रेगोरियन कॅलेंडरशी संबंध नाही.

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"