*ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ*
*🚩🙏महामृत्युंजय मंत्र🙏🚩*
जप करण्याच्या ज्या वेगवेगळ्या विधी आहेत, जे वेगवेगळे संपुट, बीज लावले जातात त्यापैकी एक असा
*|| ॐ हौं जूं सः ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ ||*
पण हा जप करण्याचा एक विशिष्ट विधी आहे, स्पष्ट अधिकार आहेत. तो फक्त गुरुमुखातून घ्यावा लागतो. तो षट्कर्णी होऊ न देता अभिमंत्रित करवून शक्तीसहीत दिला जातो. शिवाय म्हणताना देखील काय दक्षता घ्यायच्या, तो कसा म्हणायचं, उच्चार कसे करायचे, स्वर, आरोह, अवरोह, चाल, ताल आदी गोष्टी सांगितल्या जातात, आपले ध्यान कसे केंद्रित करायचे ते देखील सांगितले जाते.
अवेळी, अकाली, अशुद्ध, अपवित्रतेने, आचार-विचार-आहार-विहार न पाळता मंत्रजप केल्याने त्याचे परिणाम अतिशय गंभीर आणि घातक होतात.
महामृत्युंजय मंत्राचे सहा अंग आणि अभिप्राय : महामृत्युंजय मंत्राच्या (१) वर्णाचे, (२) पदाचे, (३) वाक्याचे, (४) चरणांचे, (५) अर्ध्या ऋचांचे आणि (६) संपूर्ण ऋचांचे असे सहा अंग आणि त्याचे वेगवेगळे अभिप्राय आहेत.
ओम त्र्यंबकम् मंत्राचे ३३ अक्षर आहेत, जे महर्षि वशिष्ठ यांच्या अनुसार ३३ देवतांचे द्योतक आहेत. त्या तेहेतीस देवतांमध्ये अष्टवसू (८), ११ रुद्र, १२ आदित्य, १ प्रजापति आणि १ षटकार आहेत. या तेहेतीस देवतांच्या साऱ्या शक्ति महामृत्युंजय मंत्रामध्ये निहीत होतात. ज्याने महा महामृत्युंजय मंत्राचा पाठ करणारा दीर्घायु तर प्राप्त करतोच पण त्याच बरोबर तो निरोगी, ऐश्वर्ययुक्त, धनवान देखील होतो. महामृत्युंजय पाठ करणारा प्रत्येक दृष्टिने सुखी आणि समृध्दिशाली होतो. भगवान शिवाची अमृतमययी कृपा त्याच्यावर निरन्तंर बरसत असते. या मंत्रातील प्रत्येक अक्षराच्या मृत्तिका स्वरूप शक्तीची माहिती अशी आहे:
त्रि = ध्रव-वसु = प्राणाचे द्योतक = मस्तिष्क स्थित
यम = अध्वर-वसु = प्राणाचे द्योतक = मुख स्थित
ब = सोम-वसु = शक्तिचे द्योतक = दक्षिण कर्ण स्थित
कम = जल-वसु = वसु देवतेचे द्योतक = वाम कर्ण स्थित
य = वायु-वसु = वसु देवतेचे द्योतक = दक्षिण बाहु स्थित
जा = अग्नि-वसु = वसु देवतेचे द्योतक = वाम बाहु स्थित
म = प्रत्युवष वसु = शक्तिचे द्योतक = दक्षिण बाहु मध्य स्थित
हे = प्रयास वसु = वसु देवतेचे द्योतक = मणिबन्ध स्थित
सु = वीरभद्र रुद्र = प्राण बोधक = दक्षिण हस्त अंगुलि मुल स्थित
ग = शुम्भ् रुद्र = रुद्राचे द्योतक = दक्षिण हस्त अंगुलि अग्र भाग स्थित
न्धिम् = गिरीश रुद्र = शक्तिचे मूळ द्योतक = वाम हस्त मूल स्थित
पु = अजैक पात रुद्र = शक्ति द्योतक = वाम हस्त मध्य भाग स्थित
ष्टि = अहर्बुध्य्त् रुद्र = रुद्राचे द्योतक = वाम हस्त मणिबन्ध स्थित
व = पिनाकी रुद्र = प्राण द्योतक = दक्षिण हस्त अंगुलि मुल स्थित
र्ध = भवानीश्वपर रुद्र = रुद्राचे द्योतक = वाम हस्त अंगुलि अग्र भाग स्थित
नम् = कपाली रुद्र = रुद्राचे द्योतक = उरु मूल स्थित
उ = दिक्पति रुद्र = रुद्राचे द्योतक = यक्ष जानु स्थित
र्वा = स्थाणु रुद्र = रुद्राचे द्योतक = यक्ष गुल्फ स्थित
रु = भर्ग रुद्र = रुद्राचे द्योतक = चक्ष पादांगुलि मूल स्थित
क = धाता आदित्य = आदित्य द्योतक = यक्ष पादांगुलि अग्र भाग स्थित
मि = अर्यमा आदित्य = आदित्य द्योतक = वाम उरु मूल स्थित
व = मित्र आदित्य = आदित्य द्योतक = वाम जानु स्थित
ब = वरुणादित्य = आदित्य द्योतक = वाम गुल्फ स्थित
न्धा = अंशु आदित्य = आदित्य द्योतक = वाम पादंगुलि मुल स्थित
नात् = भगादित्य = आदित्य द्योतक = वाम पाद अंगुलि अग्रभाग स्थित
मृ = विवस्व्न (सुर्य) = आदित्य द्योतक = दक्षिण पार्श्वि स्थित
र्त्यो् = दन्दाददित्य् = आदित्य द्योतक = वाम पार्श्वि भाग स्थित
मु = पूषादित्यं = आदित्य द्योतक = पृष्ठै भगा स्थित
क्षी = पर्जन्य् आदित्य = आदित्य द्योतक = नाभि स्थल स्थित
य = त्वणष्टान आदित्य = आदित्य द्योतक = गुहय भाग स्थित
मां = विष्णु आदित्य = आदित्य द्योतक = शक्ति स्वरूप दोन्ही भुजा स्थित
मृ = प्रजापति = प्रजापति चे द्योतक = कंठ भाग स्थित
तात् = अमित = वषट्कार द्योतक = हदय प्रदेश स्थित
वर वर्णन केलेल्या स्थानावर उपरोक्त देवता, वसु आदित्य आदि आपल्या सम्पुर्ण शक्तिसहित विराजत असतात, 'पिंडी ते ब्रह्मांडी' या न्यायाने.
मंत्रगत पदांच्या शक्ति ज्या प्रकारे मंत्राच्या वेगवेगळ्या अक्षरांच्या (वर्णांच्या) वेगवेगळ्या शक्ति आहेत त्याच प्रकारे वेगवेगळ्या पदांच्या देखील वेगवेगळ्या शक्ति आहेत.
त्र्यम्बकम् = त्रैलोक्य शक्ति द्योतक = मस्तिष्क स्थित
यजा-सुगन्धात = शक्ति घोतक = ललाट स्थित
महे = माया शक्ति द्योतक = कानांमध्ये स्थित
सुगन्धिम् = सुगन्धि शक्ति द्योतक = नासिका (नाक) स्थित
पुष्टि = पुरन्दिरी शक्ति द्योतक = मुख स्थित
वर्धनम = वंशकरी शक्ति द्योतक = कंठ स्थित
उर्वा = ऊर्ध्देक शक्ति द्योतक = ह्रदय स्थित
रुक = रुक्तदवती शक्ति द्योतक = नाभि स्थित
मिव = रुक्मावती शक्ति द्योतक = कटि भाग स्थित
बन्धानात् = बर्बरी शक्ति द्योतक = गुह्य भाग स्थित
मृत्यो: = मन्त्र्वती शक्ति द्योतक = उरुव्दंय स्थित
मुक्षीय = मुक्तिकरी शक्ति द्योतक = जानुव्दय स्थित
मा = शक्ति सहित महाकालेश बोधक = व्दय जंघा स्थित
अमृतात = अमृतवती शक्ति द्योतक = व्दय पाद तलु स्थित
महामृत्युजय प्रयोग लाभ
*कलौकलिमल ध्वंयस सर्वपाप हरं शिवम्।*
*येर्चयन्ति नरा नित्यं तेपिवन्द्या यथा शिवम्।।*
*स्वयं यजनित चद्देव मुत्तेमा स्द्गरात्मवजै:।*
*मध्यचमा ये भवेद मृत्यैतरधमा साधन क्रिया।।*
*देव पूजा विहीनो य: स नरा नरकं व्रजेत।*
*यदा कथंचिद् देवार्चा विधेया श्रध्दायान्वित।।*
*जन्मचतारात्र्यौ रगोन्मृदत्युतच्चैरव विनाशयेत्।*
कलियुगात केवळ भगवान शिवाची पूजा फल देणारी आहे. समस्तं पापं एवं दु:ख भय शोक आदि चे हरण करण्यासाठी महामृत्युंजय विधिच श्रेष्ठ आहे. आणि म्हणून वर सांगितलेल्या (निम्निलिखित) प्रयोजनात महामृत्युजंय पाठ करणे महान लाभकारी आणि कल्याणकारी आहे.
*ॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐॐ*
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"