#दत्त_जयंती
आपणास माहितच असेल की या कलयुगात भक्ताचा उध्दार करण्यासाठी आद्य देव श्री ब्रम्हा, विष्णु, शिव या त्रिमूर्तीनी श्री दत्तात्रेय यांचा अवतार घेतला. ब्रम्हदेव 'सोम(चंद्र)' झाला. श्रीविष्णू 'दत्त' झाला आणि महेश 'दुर्वास' झाला. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, "आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा 'दत्त' येथेच राहील. तोच त्रिमुर्ती आहे असे समज." अनुसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमुर्ती दत्त मात्र आई-वडिलांची सेवा करीत तेथेच राहिले. ब्रम्हदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त अत्रि-अनुसूयेचा पुत्र, श्रीविष्णूचा अवतार असूनही त्रिमुर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. अत्रि म्हणून आत्रेय व अत्रि-अनुसूयेला देवांनी तो दिला म्हणून 'दत्त'!तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परम्परेचे मूळ पीठ आहे.
श्रीदत्तात्रेय पासून पुढे तीन अवतार झाले प्रथम श्रीगुरू श्रीपाद श्रीवल्लभ महाराज हा अवतार, द्वितीय श्रीगुरू नृसिंहसरस्वती महाराज, व तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज. हे तिन्ही अवतार श्री गुरू दत्तात्रेय यांचे आहेत. त्यांची संक्षिप्त माहिती खालील प्रमाणे ...
१) श्री गुरु दत्तात्रेय...
माता पिता - अनसूया/अत्रि.
जन्म स्थान - माहुर (नांदेड)
निवासक्षेत्र - गिरनार (गुजरात)
वेष - अवधूत
जयंती - मार्गशीर्ष शु. १५ (दत्त पौर्णिमा)
२) श्रीपादवल्लभ....
माता पिता - सुमती/अप्पलराज.
जन्मस्थान - पीठापुर (आन्ध्र प्रदेश)
निवासक्षेत्र - कुरगड्डी (कुरवपूर) कर्नाटक.
वेष - ब्रम्हचारी
जयंती - भाद्रपद शु. ४ (गणेश चतुर्थी)
३) श्रीनृसिंहसरस्वती....
माता पिता - अंबा/माधव.
जन्मस्थान - लाड कारंजा (वाशीम महाराष्ट्र)
निवासक्षेत्र - नरसोबावाडी, औदुंबर गाणगापूर...
वेष - संन्यासी
जयंती - पौष शु. २
४) श्री स्वामी समर्थ अक्कलकोट....
माता पिता - ( --------- )
जन्मस्थान - कर्दळीवनात वारुळातून प्रगट
निवासक्षेत्र - अक्कलकोट (२२ वर्षे )
वेष - संन्यासी दिगंबर
जयंती - चैत्र शु. २
🔶 पिठापूर, कुरवपूर, कडगंची, गाणगापूर व अक्कलकोट श्री स्थाने अतिशय पवित्र व जागृत आहेत.
🔶 कुरवपूर येथे तर साक्षात श्रीपादवल्लभांनी 14 वर्ष अनुष्ठान केले आहे. ही जागा नामस्मरण, पारायणासाठी खूप चांगली आहे...
🏵 श्रीगुरुदेवदत्त 🏵
पादुका दर्शन हां दत्त संप्रदायामधील एक अत्यंत वेगळा अनुभव आहे। विविध श्री दत्त क्षेत्री विविध प्रकारच्या पादुका ::
१ ) श्री विमल पादुका = औदुम्बर
२ ) श्री मनोहर पादुका = वाड़ी
३ ) श्री निर्गुण पादुका = कारंजा
४ ) श्री निर्गुण पादुका = गाणगापुर
५ ) श्री निर्गुण पादुका = लातूर
६ ) श्रीपाद श्रीवल्लभ पादुका = कुरवपुर
७ ) श्री करुणा पादुका = कड़ गंची
८ ) श्री स्वामी समर्थ पादुका = अक्कलकोट
९ ) श्रीपाद श्रीवल्लभ पादुका = पीठा पुर
१० ) श्री दत्त पादुका = गिरनार
११ ) श्रीशेष दत्त पादुका = बसव by कल्याण
१२ ) अवधूत पादुका = बाळे कुन्द्री
१३ ) प्रसाद पादुका = वासुदेव निवास ।।
🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹
🙏.गुरुपादुकांचे महत्व.🙏
श्री दत्तात्रेयांच्या उपासनेत अनेक ठिकाणी पादुका पूजनास महत्व आहे. श्री दत्तात्रेय हे गुरु स्वरूपात सर्वत्र आढळत असल्यामुळे त्यांच्या चरणपूजेचा महिमा वाढलेला आहे. दत्त सांप्रदायात गुरूपेक्षा गुरुचरणांनाच महत्वाचे स्थान आहे. म्हणून दत्त पंथीयात श्रीगुरु व त्यांच्या चरणपादुका यांना फार महत्व आहे. श्री गुरूंच्या वा इष्ट देवतेच्या पादुका पूजण्याचा प्रकार फार पूर्वीपासूनचा आहे. श्रीराम वनवासात असताना भरताने त्यांच्या पादुका सिंहासनावर ठेवून आदर भाव दर्शविला होता.
अतिशय प्रिय व्यक्तीविषयी, थोर व्यक्ती विषयी आदर दाखविणे म्हणजे त्यांच्या पायावर डोके ठेवणे. यातील आणखी एक रहस्य असे की, श्रेष्ठ सत्पुरुषांची सारी दैवीशक्ती त्यांच्या चरणात एकवटलेली असते. त्यांच्या चरण-स्पर्शाने कंपनाद्वारा ती शक्ती भक्तांत संचारत असल्याचा अनेकांना अनुभव आलेला आहे. म्हणूनच अनेक दत्तस्थानांत दत्त मूर्तीपेक्षा दत्तपादुकांना महत्वाचे स्थान मिळाले आहे.
गिरनार शिखरावर दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत.
गाणगापूर येथे श्री नृसिंहसरस्वती यांनी निर्गुण पादुकाच मागे ठेवल्याची कथा आहे.
नृसिंहवाडीलाही दत्त पादुकांचीच पूजा केली जाते.
देवगिरीवर जनार्दनस्वामींच्या समाधी स्थानी पादुकाच आहेत.
विष्णुचा जसा शाळीग्राम.... तसे दत्तोपासनेत दत्तांच्या पादुकांना महत्वाचे स्थान आहे. या दत्त पादुकांची पूजा सगुण व निर्गुण स्वरूपात केली जाते. म्हणूनच 'मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही ॥' असे नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले जाते.
🙏पादुकांना नमस्कार कसा करावा?🙏
(पादुका हे शिव आणि शक्ति यांचे प्रतीक असते अन् नमस्कार करतांना त्रास होऊ नये; म्हणून पादुकांच्या खूंटयांवर डोके न ठेवता पादुकांच्या पुढच्या भागावर डोके ठेवून नमस्कार करणे.) 'डावी पादुका ही शिवस्वरुप आणि उजवी पादुका ही शक्तिस्वरुप असते. डावी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट तारक शक्ति आणि उजवी पादुका म्हणजे ईश्वराची अप्रकट मारक शक्ति होय.पादुकांच्या अंगठयातून (पादुकांच्या खूंट्यातून आवश्यकते प्रमाणे ईश्वराची तारक आणि मारक शक्ति बाहेर पडत असते. ज्या वेळी आपण पादुकांच्या अंगठयावर डोके टेकवून नमस्कार करतो, त्या वेळी काही जणांना त्यातील प्रकट शक्ति न पेलवल्याने त्रास होऊ शकतो. यासाठी पादुकांना नमस्कार करताना शक्यतो डोके पादुकांच्या अंगठयावर न टेकवता पादुकांच्या पुढच्या भागावर (जेथे संतांच्या पायांची बोटे येतात) तेथे टेकवावे.
॥ श्री गुरुदेव दत्त ॥ श्री स्वामी समर्थ ॥
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"