-----------------------------
*पंचमुखी हनुमान*
-------------------------------
*पंचमुखी हनुमानाच्या जन्माचा इतिहास*
*एका वास्तुशास्त्रावरील पुस्तकात पंचमुखी हनुमानाची माहिती मिळाली ती अशी :*
महिरावणाचा वध करायला हनुमान पाताळ लोकांत गेल्यावर तिथल्या पाच दिव्यांचा एकाच वेळी विनाश करून ते विझल्याशिवाय महिरावण मरणार नाही, हे हनुमानाला माहीत होतं. त्यामुळे त्यांनी पंचमुखी रूप धारण करून तिथल्या पाच दिव्यांचा एकाच वेळी विनाश केला. पाच वेगवेगळय़ा शक्ती एकत्र करून एकच रूप धारण केलेल्या हनुमानाने दक्षिणेच्या महिरावणाचा विनाश केला म्हणून दक्षिणेकडे तोंड करून पंचमुखी हनुमानाचा फोटो लावण्याची प्रथा प्रचलित आहे. पूजाघरात पंचमुखी हनुमान असला तरी घराच्या दक्षिणेस एक अॅडिशनल एकमुखी हनुमान लावतात तो त्यामुळेच. दक्षिण ही यमाची दिशा, शिवाय दक्षिण म्हणजे पाताळ म्हणून ही खास खबरदारी.
*पंचमुखी हनुमानाच्या उत्पत्तीची द्वितीय कथा*
एकदा पाच मुख असलेला एक भयानक राक्षस प्रकट झाला. त्याने कठोर तपश्चर्या करून त्याच्यासारखे रूप असणाराच त्याचा वध करू शकेल, असे ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवले. वरदान मिळताच तो राक्षस उन्मत्त होऊन सर्वांना भयंकर त्रास देऊ लागला. आम्हाला त्रासातून मुक्त करावे, अशी सर्व देवतांनी भगवंताला प्रार्थना केली. भगवंताने दिलेल्या आज्ञेनुसार मंगळवार, मार्गशीर्ष कृष्ण अष्टमीला पुष्य नक्षत्रात सिंह लग्न असतांना हनुमंताने पंचमुखी अवतार धारण केला.
त्यांची वानर, नृसिंह, गरुड, अश्व आणि वराह अशी पाच सुंदर मुखे होती. पंचमुखी हनुमान राक्षसाजवळ गेला आणि त्याने त्याचा वध केला.
----------------------------------------------
*पंचमुखी हनुमानाची पाच मुखं :*
------------------------------------------------
१. सात्त्विकता, पावित्र्यता, यश, भक्ती, औदार्य, त्याग आणि बलाचा संदेश देणारं मुख्य हनुमान मुख
२. निर्भयपणा आणि संकटाशी सामना करण्याचा संदेश देणारं प्रबळ शक्ती देणारं नरसिंह मुख
३. जादूटोणा, मंत्रतंत्र, पिशाच्च व विविध बाधांपासून हरण करणारं आणि त्यापासून सतत रक्षण करून आवरण कवच निर्माण करणारं गरुड मुख
४. सर्व क्षेत्रात प्रगती, संपत्ती, यश, धन, समृद्धी, ऐषाराम देणारं वराहमुख
५. अवकाशापासून येणा-या सर्व दुष्ट शक्तींना रोखून चांगल्या शक्तींना थारा देणारे हयग्रीवाचं मुख
*हनुमानाने पंचमुख आणि त्रिनेत्र*
*धारण करण्यामागील* *आध्यात्मिक भावार्थ*
हनुमानाची पंचमुखे अविद्येच्या पाच विकारांना पराभूत करणारी आणि संसाराच्या काम, क्रोध आणि लोभ या तीन वृत्तींपासून मुक्ती देणारी आहेत. प्रत्येक मुखाला असणारे तीन सुंदर नेत्र हे आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक या त्रिविध तापांतून मुक्त करणारे आहेत.
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी*
------------------------------------------------
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"