Thursday, January 24, 2019

उमेदीचा दिवा




एका घरात पाच दिवे लावले होते.
एके दिवशी एक दिवा म्हणाला,मी इतके जळुन सुद्धा माझ्या प्रकाशाची कोणाला कदर नाही.त्यामुळे मी विझुन जाणेच चांगले.! आणि तो विझुन गेला.
तो दिवा होता उत्साहाचे प्रतिक.!
 हे पाहुन जो दुसरा दिवा होता, जो शांतीचे प्रतिक होता , त्यानेही हाच विचार करून तो सुद्धा विझुन गेला.
उत्साहाचा व शांतीचा दिवा विझल्या नंतर तिसरा दिवा जो हिमतीचा होता, तो ही आपली हिम्मत हरला आणि विझुन गेला.
उत्साह, शांती, हिम्मत हे विझल्या मुळे चौथा समृद्धीचा दिवा सुद्धा विझुन गेला.
सगळे दिवे विझल्या नंतरही पाचवा दिवा एकटाच जळत राहीला.पाचवा दिवा सगळ्यात छोटा होता, परंतु निरंतर जळत होता.
तेव्हा त्या घरात एका मुलाने प्रवेश केला. त्याने पाहीले , घरात एकच दिवा जळत होता. तो खुप खुष झाला. चार दिवे विझुन सुद्धा तो खुष होता की, कमीत कमी एक दिवा तरी चालु आहे.
त्याने त्या एका दिव्याने इतर चारही दिवे पुन्हा प्रज्वलीत केले. 
तो पाचवा दिवा कोण होता ?
तो होता उमेद.! तो उमेदीचा दिवा आपल्या घरात सतत प्रज्वलीत ठेवा. इतर दिवे आपोआप प्रकाशीत होतील.

          *🌹सु प्रभात🌹*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"