#नाममहिमा
नाम महिमा सांगणारा हा एक अनुभव मी इथे देत आहे..
नामाचा महिमा किती थोर आहे .. त्याचे उदाहरण म्हणजे माझ्या काकू.. चुलत काकू होत्या पण सख्या काकूंइतकेच आमच्या वर प्रेम केले... त्यांच्या कडून शिकण्यासारखे म्हणजे नाम कसे घ्यावे,कसे मुरवावे, आणि शेवटी शरीर हे नाममय होऊन जावे...
फक्त नामाच्या जोरावर आणि सद्गुरूं वर दृढ व अढळ विश्वास याने माझ्या काकूंना मी मृत्यु मुखातून परत येतांना पाहिले आहे...
त्या व माझे काका आणि आता सुन मुलगा मुलगी नातवण्ड सगळेच ब्रम्हचैतन्य महाराजांचे अनुग्रहित आहेत ... ७ ७ दिवसाचा नाम सप्ताह, हरी हाट, अन्न संतर्पण, सन्त सेवा, १०८ अखण्ड रामायण पाठ, १०८ मास पारायण, १०८ नव्हान्न पारायण, साधन द्वादशी,१३ कोटी लिखित रामनाम संकल्प, १३ कोटी सामूहिक रामनाम जप किती आणि काय ..१२ ज्योतिर्लिंग, चारधाम यात्रा, देवाचे सगळे शक्तिपीठ, उज्जैन चे चौरांशी महादेव अजून किती तरी तीर्थ यात्रा केलेल्या. काकू स्वभावाने कश्या खंबीर,कडक, निर्धारी होत्या.. एकदा काशी ला यात्रा साठी गेल्या तेंव्हा एका देवळाच्या बाहेर चपला हरवल्या.. मे जून च्या महिन्यात त्यांनी चपलेशिवाय सगळी यात्रा पूर्ण केली... एकच उत्तर ही देवाची इच्छा आहे म्हणून त्यांने सगळ्यांच्या चपला न नेता फक्त माझीच चप्पल नेली..आता तीर्थ यात्रा पूर्ण झाल्या शिवाय पायात चप्पल घालणार नाही...
सतत काही ना काही काका काकू कडे चालू असायचे.. नर्मदा काठी राहत असल्यामुळे नर्मदा परिक्रमा करणारे भाविक आणि मोठे मोठे किती तरी सन्त यांच्या कडे मुक्कामाला असायचे.. त्यांची सेवा म्हणजे संतांना आपल्या हातानी अभ्यंगस्नान घालायचे व त्यांचे भोजन राहण्याचा व्यवस्था सगळे यांच्या कडे असायचे... आम्ही बऱ्याच गोष्टी त्यांच्या कडे बघून शिकलो...
या काकूंना १९९० मधे कळले कि दोन्ही किडनी काम करत नाहीत.. डॉ नी सांगितले कि फार तर ४ महिने काढतील .. संसार अर्धा .. मुलाचे व मुलीचे शिक्षण सुद्धा अर्धेच झाले होते..अजून लग्न वगैरे इतर गोष्टीं चा विचार ही नव्हता.. अतिशय काळजीत आम्ही सगळे च होतो .. त्याची कल्पना करू शकता कि घरात काय वातावरण असेल... आईच त्या..मुलांच्या काळजी ने इतक्या खंबीर काकू .. पण त्या ही सैरभैर झाल्या..
पण महाराजांवर दांडगा विश्वास..
एक दिवस त्यांची शेजारीण सहज त्यांना भेटायला आली .. तिने घरात शिरल्यावर एक फोटो पाहिला .. तिने विचारले हे कोण? काकू म्हणाल्या हे तात्या साहेब केतकर.. (तात्या साहेब केतकर महाराजांचे पट्टशिष्य भाऊसाहेब केतकर यांचे सुपुत्र, त्यांना प्रति महाराज म्हणायचे इतका त्यांचा अधिकार मोठा होता)
तिने पुढे विचारले हे कुठे असतात? काकू म्हणाल्या ते आता नाहीत बरेच वर्ष झाले त्यांनी देहत्याग केला ..ते आता हयातीत नाही... तर ती म्हणाली नाही कसे... हे मला इंदौर ला अमुक ठिकाणी भेटले आणि मला म्हणालेच तुमच्या शेजारी त्या काकू राहतात त्यांना माझा निरोप दे कि घाबरू नको अजून तुला खूप आयुष्य आहे..नामाच़्या ताकतीने तुझा संसार पूर्ण होईल .. नातवण्ड बघशील.. निश्चिंत रहा... नामावरचे प्रेम तुला तारेल.. हे मला महाराजांनी सांगितले आहे कि तिला तुझ्या मार्फत निरोप दे...
त्या शेजारणी ने विचारले तुम्ही कोण? तर ते म्हणाले तात्या भेटले होते असे सांग...
काकूंनी विचारले कधी भेटले वगैरे..तर ती म्हणाली महिना झाला .. मी आल्यावर घरात कामाला लागले तर विसरले कि तुम्हाला निरोप द्यायचा आहे... आज अचानक उगीच तुम्हाला कधी भेटते अशी बैचैनी झाली म्हणून भेटायला आले तर हे सगळे आठवले कि तुम्हाला निरोप द्यायचा आहे...
काकू निशब्द झाल्या आणि आम्ही अवाक्...
(मला लिहितांना आत्ताही शहारे येत आहेत)
आणि हे शब्द खरे ठरले.. १९९९ मधे सगळा संसार व्यवस्थित झाल्यावर जवाबदारी संपल्यावर त्यांना देवाज्ञा झाली..
नाम किती मुरले पाहिजे ह्याचे उदाहरण म्हणजे त्या शेवटी अंथरूणाला खिळल्या होत्या.. आम्ही भेटायला जायचो तर प्रचण्ड यातना होत असून ही सतत हसून गप्पा गोष्टी करायच्या.. मुख्य सांगायचे म्हणजे कुठल्या ही क्षणी मृत्यु येऊ शकतो त्या वेळेस मुखात नाम हवे एक क्षण ही वाया घालवायचा नाही म्हणून गप्पा मारतांना दोन वाक्यामधे येणाऱ्या पॉज़ मधे ही त्या नाम घेत असायच्या.. त्यांचे ओठ सतत नामात हलत असायचे... अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा डॉ आले होते त्यांनी डिक्लेयर केले कि त्या गेल्या ..मेडिकली कुठले ही जीवनाचे लक्षण शरीरात नव्हते ..श्वास सम्पूर्ण बन्द झाला होता .. तरी ही त्यांचे ओठ पाच मिनीट हलत होते.. काकांनी कान लावला तर नाम ऐकू आले.. डॉ सुद्धा चकित होते कि हा काय प्रकार आहे... नाम किती मुरायला हवे आणि किती सवय असायला हवी कि मृत्यु नन्तर सुद्धा मुख, जीभ नाम घेत होती हे त्याचे प्रत्यक्ष उदाहरण आहे...
गुरू प्रदत्त साधनेवर मंत्रावर नामावर किती प्रेम हवे किती विश्वास हवा किती समपर्ण हवे हे काकूंना आम्हाला स्वत:चे उदाहरण देऊन शिकवले...
त़्या म्हणायच्या महारांजानी हात धरलाय ना आता मुक्ति मिळे पर्यन्त काळजी नाही... पुढच्या जन्मी कुत्रं झाले की मांजर झाले तरी महाराज हात सोडणार नाही ही खात्री आहे मला...ते जे करतील ते माझ्या हिताचेच असणार...
श्रीराम जय राम जय जय राम।
Forwarded messege
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"