Saturday, June 15, 2019

*श्री सिद्ध मंगल स्तोत्राचा भावार्थ

*श्री सिद्ध मंगल स्तोत्राचा भावार्थ*

जो श्रीमद् अनंत महाविष्णु आहे,
श्री म्हणजे लक्ष्मी ज्याने धारण केली आहे,
जो नरसिंह अप्पल राज शर्मांचा पुत्र आहे,
श्रीविद्याधरी,राधा,सुरेखा या बहिणींकडुन जो राखी बंधन स्विकारतो,
सुमती मातेच्या वात्सल्य अम्रुतावर ज्याचे भरण पोषण झाले आहे,
सत्यरुषीश्वर,पार्वतीपुत्र लाभ असे आजोबा,मातामह श्रीबापनाचार्य यांचा पौत्र,
चरणांवर श्री म्हणजे लक्ष्मी धारण केलेला म्हणुन "श्रीपाद",
भारद्वाज महर्षींनी पार पाडलेल्या सवित्रुकाठक यद्न्याचे फल म्हणुन भारद्वाज गोत्रात अवतार धारण करणारा,
"२४९८","दो चौपाती देव लक्ष्मीगण" या संखेचा उच्चार करत
स्रुष्टीचे रहस्य सांगणारा,
पुण्यरुप आजी सौ राजमांबा यांच्या पुण्यगर्भातुन ज्या सुमती महाराणी जन्मल्या,त्यांचा पौत्र,
जो सुमती मातेचा मुलगा आहे,
जो नरहरी अप्पलराज शर्मांचा मुलगा आहे,
जो देव दत्तात्रेय आहे,
जो प्रभु आहे,
जो पिठापुरी नित्य विहार करतो,
जो आकर्षुण घेतो,
मंगलरुप धारण करणा-या श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो,ते दिग्विजयी होवोत।

*॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥* 
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"