Wednesday, July 10, 2019

केव्हा साधना करू नये आणि नामस्मरण करु नये

.... चालत्या वाहनात साधना करू नये , नामस्मरण करावे . रु प्रवासात अभंग म्हणावेत ; आरती , स्तोत्र इत्यादी म्हणू नयेत. साधनेत नाम घेतले तर चालते पण मानसपूजा करू नये . short cut मारू नयेत . स्नान करताना आरती म्हणू नये . पुस्तकांचा अभ्यास विषय नीट समजून घेऊन करावा . जमेल तसा महामंत्राचा मानसिक जप अखंड करावा . काहीही विचारायचे असल्यास आपल्या सद्गुरूंशिवाय दुसरीकडे जाऊ नये . हा उचित अभिमान आहे . कोणाकडेही भीक मागू नये . आपले बाप ( सद्गुरू ) सर्वसमर्थ आहेत . काही न मागता स्तोत्र म्हटले तर देवतांना आनंद होतो . नाही तर त्या देवताही सावकाराप्रमाणे लेन - देन करून मोकळ्या होतात . आपल्या बापाला ( सद्गुरुंना ) सर्व कळते . ते सर्वप्रकारे आपल्याला सांभाळतात . भगवंतांचे अखंड स्मरण ठेवावे . आपण जे करतो आहेत ते आपल्या सद्गुरुंना आवडेल काय ? याचा विचार करून वागावे. आपली प्रत्येक वृत्ती भगवंतांकडे जाण्यायोग्य असली पाहिजे . जे झाले ते आपल्याच कर्मामुळे झाले अशा विचाराने राहावे . पायांना लागलेली वाळू काढण्यासाठी किती वेळा समुद्रात जाणार ? ती पुसून टाकावी . प्रपंचाचा विचार किती करणार ? तो झटकून टाकवा . अखंड आनंद हा केवळ सद्गुरुंपाशीच असतो. 
- श्रीवामनराज ( कृपायोग व गुरुभक्तिविषयक मराठी त्रैमासिक )

*नाम घेण्याचा निश्चय करावा

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  ९  जुलै  🌸*

*नाम  घेण्याचा  निश्चय  करावा.*

जे दृश्य असते ते आज ना उद्या नाश पावते. 

दृश्य हे स्वतंत्र नसते. भगवंताच्या अधीन असते. म्हणून, जगात जी जी गोष्ट घडते ती ती भगवंताच्या इच्छेनेच घडते हे आपण ओळखावे. 

आपला देह दृश्यच आहे, आणि त्याला चालविणारा भगवंत देहात आहे; त्याच्या अनुसंधानात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हे अनुसंधान राहणे भगवंताच्या नामाने साधते, म्हणून तुम्ही सर्वांनी नाम घेण्याचा निश्चय करावा.

आपले चित्त नामामध्ये गुंतले म्हणजे देहाला प्रारब्धाच्या स्वाधीन करता येते. ही युक्ति ज्याला साधली त्याला सुखदुःखाची बाधा उरली नाही. संतांना देखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते, पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख होत नाही. 

व्यवहाराच्या मार्गाने जात असता भगवंताचे नाम कधी विसरू नये. आपल्या प्रयत्नाला जे फळ येईल ती भगवंताची इच्छा समजून, जे पदरात पडेल त्यात समाधान मानावे. 

आपण प्रपंची लोक आहोत, म्हणून प्रपंचाला उचित असणारा प्रयत्न केल्यावाचून कधी राहू नये. पण प्रपंच हेच आपले सर्वस्व आहे हे न समजता, त्यामध्ये भगवंताला विसरू नये. 

परमार्थाला सदाचरणाची फार जरूरी आहे. उगीच भलत्याच्या सांगण्याला भुलू नये, आणि अनीति - अधर्माच्या मार्गाला जाऊ नये.
 
संत जे सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून, मुखात नाम ठेवावे आणि सदाचरणाने वागून प्रपंच करावा. असे जो वागेल त्याचे कल्याण राम खात्रीने करील हे मी सर्वांना वचन देतो. 

बहुतेकांना प्रपंचासाठी देव पाहिजे असतो. खरोखर, हे सर्व हिंग-जिऱ्याचेच गिऱ्हाईक आहेत; देवासाठी देव पाहिजे असे म्हणणारा खरा कस्तुरीचा चाहताच कोणी ,भेटत नाही.

जो बरा होणार नाही अशा रोग्याला बरा करतो तो डॉक्टर खरा. अगदी विषयातल्या माणसांनासुद्धा जो बाहेर काढतो तो संत खरा. 
त्याच्याजवळ जाऊन नुसते 'मी शरण आलो आहे' असे म्हटले तरी पुरे होते. 

हल्लीच्या आणि पूर्वीच्या प्रपंचात तसा फरक नाही; पण पूर्वी लोक देवाला विसरत नसत, अलिकडे ते जास्त संकुचित झाले आहेत. पूर्वी खेडेगावामध्ये स्वाभाविकपणे एकमेकांच्या उपयोगी पडावे अशी बुद्धी असायची, पण आता काळ पालटला आहे. 

तुम्हा इतक्या लोकांना नामस्मरण करताना पाहून मला एक समाधान वाटते की, मला जी गोष्ट आवडते ती इतक्या लोकांना आवडू लागली आहे. 

मी सांगितलेले तेवढे करीन असा निश्चय करा. कशाचीही काळजी करू नका. मी तुमचा भार घेतलेला आहे ही जाणीव ठेवून आनंदाने प्रपंच करा.

*१९१.  भगवंताच्या  नामाचा  नाद  लागला  तर  दुःखाची  जाणीव  कमी  होईल.  दुःखाची  जाणीव  नसल्यावर,  दुःख  असले  म्हणून  बिघडले  कुठे ?*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

काय आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य?

काय आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य? 
1972 चा काळ  अंधश्रद्धा निर्मुलनवाल्यांचा  होता. त्या वेळी त्यांची दृष्टी पडली  माऊलींच्या समाधी वर, संजीवन समाधी म्हणजे काय हे समजुन न घेता त्यांनी   डायरेक्ट आळंदी गाठली
त्यावेळी झालेली सविस्तर घटना थोर शास्त्रज्ञ आर एन शुक्ल यांनी सांगितली ती अशी 

त्यावेळी वारकरी सांप्रदायाची थोर व्यक्ती ह.भ.प मामासाहेब दांडेकर हे होते त्यांनी शुक्ल साहेबांना फोन केला आळंदीची समाधी उखडण्यासाठी काही अंधश्रद्धा निर्मुलन चे लोक येत आहेत, त्यांचे असे म्हणणे आहे कीजर संत ज्ञानेश्वरांनी जिवंत समाधी घेतली तर ते शरीर रूपाने जिवंत असतील किंवा त्यांच्या
शरीरातील हाडे तरी सापडतील
मामासाहेबां समोर खुप मोठा प्रश्न पडला होता यांना रोखायचे कसे त्यावेळी शुक्ल साहेब यांनी मामासाहेबांना सांगितले
माऊली पाहुन घेतील. दुसरा दिवस उजाडला
सकाळीच दोन अडिचशे माणसांचा ट्रक पुण्याहुन आळंदीला जाणार आहेत असे समजल्या वर त्यांच्या अगोदर मामासाहेब दांडेकर व शास्त्रज्ञ शुक्ल साहेब आळंदीला पोहचले होते.

शुक्ल साहेबांनी सोबत तीन मीटर्स घेतले होते. त्यातला एक होता गीगरम्यूलर काऊंटर त्यात
एक्सरे अल्फा, गॅमा, बीटा नावाचे जे किरण किंवा उर्जा असते ते एखाद्या ठिकाणी आहेत की नाहीत हे शोधून काढु शकतो. ते मीटरवर
दाखवले जाते. त्याला गीगरम्यूलर स्किंटीलेशन काऊंटर असे नाव आहे. 

तो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी पासून सहा फुट अंतरावर ठेवला. 

दुसरा मीटर ज्याला थर्मिस्टर
बोलोमीटर म्हणतात. तो घेतला होता. त्याने अल्ट्राव्हायोलेट इन्फारेड आहेत की नाही हे पहाता येते. तो ही मीटर समाधी जवळ ठेवला.

तिसरा फ्रिक्केन्सी मीटर रडार हा मीटरही त्या ठिकाणी ठेवला. 

तोपर्यंत अंधश्रद्धावाली मंडळी डाॅक्टर, दोन तीन इंग्लीश माणसे, घोषणा देतच मंदिरा पर्यंत पोहचली. 

सर्व जमावाला दाराजवळच
मामांनी थांबवले आणि सांगितले समाधी बद्दल आम्ही जे सांगतो तो प्रयोग करा. आणि मग तुमचे काम करा. 

तो पर्यंत शुक्ल साहेबांनी समाधी झाकण्यासाठी तीन वेष्टणे आणली
होती. एक जस्ताचे, एक पितळेचे आणी एक लोखंडाचे. 

शुक्ल साहेब त्या कार्यकर्त्यांना म्हणाले या ठिकाणी तीन मीटर्सही ठेवले आहेत.समाधी वर एकेक झाकण टाकून मीटरवर काय दिसते ते पाहावयाचे आहे. तुम्ही पहाल त्यावेळी आम्ही येथे थांबणार नाही. बाहेर थांबू.

त्यांच्यातील दहा बारा प्रमुख मंडळी पुढे आली. त्यांना गाभा-यात घेतले आणि त्यांना माहिती देऊन मामा व शुक्ल साहेब गाभा-याबाहेर निघुन आले. आम्ही सांगितल्या प्रमाणे त्यांनी प्रयोग करून पाहिला.

लोखंडी, पितळी, जस्ताचे आवरण काढल्यावर एकच ठराविक रिडींग मीटर दाखवायचे. आत कोणी नसल्याने काटा हलविण्याचा प्रश्न चनाही. त्या लोकांन पैकी कोणी मीटरला हात लावत नव्हते मग काटा रिडींग का दाखवीत आहे. रिडींग दाखविणारे चैतन्य स्फुरणस्पंदने कोठून येत आहेत असा गहन प्रश्न अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांना पडला. यामध्ये कसलाच जादुटोणा हातचलाखी नव्हती हे त्यांच्या लक्षात आले. 

शास्त्रीय भाषेत हे प्रयोग त्यांना करून दाखविल्यावर त्यांच्या लक्षात आले संजीवन समाधी म्हणजे काय? हे जेव्हा त्यांना समजावून सांगितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या ठिकाणी निश्चित पणे चैतन्य आहे. उर्जा आहे, स्पंदने आहेत,म्हणून च त्यांचा आलेख मीटर्सवर जाणवतो. चैतन्य दिसत नसले तरी त्याचे अस्तित्व असते. क्ष किरण दिसत
नसले तरी त्यांचे अस्तित्व नाकारू शकत नाही. तसेच संत ज्ञानेश्वरांची संजीवन समाधी आहेच त्यांचे अस्तित्व मनुष्यच काय विज्ञान सुद्धानाकारू शकत नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाने सर्व अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कार्यकर्त्यांचा संभ्रम दुर झाल्या नंतर ही सगळी मंडळी दर सहा महिन्याला समाधी च्या दर्शनाला येवु लागली. तीन परदेशी नागरिकां पैकी एकाने स्वताला आळंदीला वाहून घेतले. पुन्हा कधीच कुणी माऊलींवर आक्षेप घेण्याचे धाडस केले नाही. वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यु ह.भ.प. मामासाहेब दांडेकरांनी आलेल्या सर्व अंधश्रद्धा निर्मुलनाच्या सदस्यांना पुन्हा एकदा संजीवन समाधी म्हणजे काय हे समजुन सांगताना म्हणाले एखाद्या साधु संत संजीवन समाधी घेतो, तेव्हा योगशास्त्राप्रमाणे तोपंचमहाभूतात्मक होतो. शरीर पृथ्वी आप तेज वायु आकाश या पंचमहाभूतांपासून तयार झालेले आहे. जेव्हा तो संजीवन समाधीत उतरतो तेव्हा तो सजग असतो. समाधीत बसल्यावर व्यक्ती निर्विकल्प होते. निर्देही होते याचा अर्थ त्याच्या शरीरातील पृथ्वी आप तेज वायु हे जे भाग असतात ते बाहेरच्या ब्रम्हांडातील पृथ्वी आप तेज वायु आकाश यात एकरूप होऊन जातात. त्यामुळे समाधी च्या जागी काहीही शिल्लक रहात नाही.   
रामकृष्णहरि. ..........!!!