Pcod-अतिप्रवास, दगदग, चिंता जंक फूडचं वाढतं प्रमाण, सतत उपवास किंवा वारंवार खाणं यामुळे पी.सी.ओ.डी. सारखा गंभीर आजार होऊ शकतो.- वैद्य विनय वेलणकर
रोगातील सध्या मोठ्या प्रमाणात आढळणारी व्याधी म्हणजे 'पी.सी.ओ.डी'. सध्या दर दहा मुलींमध्ये एकीला ही व्याधी झालेली आढळते. अर्वाचिन शास्त्रात त्याला (पी.सी.ओ.डी.) म्हणजेच 'Pulustic Overgen Distage' असं म्हणतात. स्त्री शरीरामध्ये गर्भाशयाच्या बाजूनं बीजकोष असतात. मासिक पाळीनंतर दर महिन्याला या बीजकोषामधून स्त्रीबीज बाहेर जात असतं. या बीजकोषावर बारीक बारीक गाठी तयार होतात. त्यामुळे दर महिन्याला येणारी मासिक पाळी नियमित येत नाही. ३-३ किंवा ४-४ महिने मासिक पाळी येत नाही. त्यामुळे शरीरावर अनेक लक्षणं दिसतात. प्रामुख्यानं वजन वाढत जातं. क्वचित प्रसंगी ६-६ महिने मासिक पाळी येत नाही. त्यामुळे मनावर परिणाम होतो. चिडचिड होणं, मूड स्विंग होणं यासारखी लक्षणं निर्माण होतात. सध्याची बदलेली जीवनशैली, बदलेला आहार- विहार- राहणीमान -वेशभूषा या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणजे पी.सी.ओ.डी ही व्याधी आहे. अर्वाचिन शास्त्रानुसार शरीरातील अंत:स्त्रावी ग्रंथीतील संप्रेरकाच्या बदलामुळे अर्थात हार्मोनल इम्बॅलन्समुळे ही व्याधी होते.
आयुर्वेदानुसार या व्याधींचा विचार केला तर यामध्ये वातविकृती आणि अग्निविकृती या दोन गोष्टींचा विचार प्रामुख्यानं करावा लागतो. वातवृद्धी करणारी कारणं यामध्ये विचारात घ्यावी लागतात.
प्रामुख्यानं स्त्रीनं मासिक पाळी चालू असताना पालन करावयाच्या गोष्टी न पाळल्यानं शरीरात गंभीर परिणाम होतात. या काळात स्त्रीनं विश्रांती घेण्याची आवश्यकता असते. सध्या विविध प्रकारच्या सॅनिटरी पॅड्स वापरा आणि जिमनॅस्टिकसुद्धा करा यासारख्या जाहिराती दाखवल्या जातात. हाच प्रचार जनसामान्यात केला जातो. खरंतर मासिक पाळीच्या वेळी स्त्रीचे गर्भाशय आणि अन्य अवयवांची समस्या नाजूक असते. अशावेळी धावणं, प्रवास करणं, व्यायाम करणं निषिद्ध आहे. परंतु सध्याच्या गतिमान आयुष्यात हे टाळणं शक्य नसल्यानं त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागत आहेत.
अति चिंता हेसुद्धा यामागचं प्रमुख कारण आहे. सध्या स्पर्धेचं युग आहे. विविध प्रकारच्या विवंचना प्रत्येकात लहान वयापासून आहेत. शाळेत प्रवेश मिळण्यापासून ते व्यवसायापर्यंत चिंता प्रत्येकाच्या मागे आहे.
अति व्यायाम किंवा अव्यायाम हेसुद्धा प्रमुख कारण आहे. सध्या समाजात मैदानी खेळ, व्यायाम यांचा अभाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. यामुळे स्थौल्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. वेगवान वाहनानं प्रवास, वेळी-अवेळी जेवण, रुक्ष पदार्थांचं सेवन ही सर्व वात निर्माण करणारी कारणं आहेत.
अग्नितुष्टी करणाऱ्या कारणांमध्ये अति उपवास करणं वा वारंवार खाणं, एकसारखा आहार घेणं, अति शीतपदार्थांचा किंवा स्निग्धपदार्थांचा वापर करणं किंवा स्नेहविरहित आहार घेणं या दोन्ही गोष्टी पाहायला मिळतात.
फिगर मेण्टेन करण्याच्या कारणाखाली तेल-तुपाचं सेवन न करण्याचं फॅड तरुण मुलींमध्ये आहे. तसेच चीज, पनीर, बटर या पदार्थांचा वापर आहारात मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्याचा सुद्धा परिणाम या विकारात होतो.
या सर्वांचा परिणाम म्हणून पी.सी.ओ.डी चा त्रास होतो. वजन वाढतं. शरीर बेढब दिसतं. हे प्रमाण असंच वाढत राहिलं तर पुढे दाढी-मिश्यांचे केस येण्यास सुरुवात होते. मधे पाळी आली तर रक्तस्त्राव भरपूर होतो. ते थांबविण्यासाठी पुन्हा गोळ्या घ्याव्या लागतात.
ही पाळी येण्यासाठी अर्वाचिन शास्त्रानुसार ज्या गोळ्या घ्याव्या लागतात त्या विवाहापूर्वी घेऊ नयेत, त्याचे भयंकर दुष्परिणाम शरीरावर होतात. शस्त्रक्रियेशिवाय या शास्त्रात त्याला उपाय नाही. विवाहापूर्वी बीजग्रंथी (overy) काढून टाकता येत नाही. त्यामुळे अन्य उपचारांचा विचार करावा लागतो. त्यामुळे या आजाराकडे दुर्लक्ष करू नये.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"