"विडा (खायचे पान )"
"खई के पान बनारस वाला, खुल जाये बंद अकल का ताला", अमिताभ बच्चनचे हे गाणे, आपण सर्वांनी पाहिले असेल ऐकल असेल, तर आज या विड्याचा महिमा आपणास व्हावा व त्याचे औषधी महत्त्व हे आपणास व्हावे, यासाठीचा हा लेख आहे, खायचे पान हे वाईट नाही, बरेच जण त्यात भरपूर काही मालमसाला टाकतात. त्यामुळे पान् बि चारा उगाच बदनाम झालेला आहे. बरेच गावठी वैद्य हे कावीळ किंवा दमा यात त्यांची झाडपाल्याची औषधे ही वि ड्यातून घ्यायला सांगतात. पुरुषात शुक्रधातूचे दृष्टी असल्यास, मूलबाळ होत नाही. त्यांना आम्ही काही औषधे वि ढ्यातून घ्यायला सांगतो व त्याचा खूप चांगला परिणाम हा रुग्णात दिसून येतो.
1) पानांची शेती करणारी मंडळी:-
या मंडळी बाबत, जी मला माहिती मिळाली, ती ऐकून मी खरच धन्य झालो. याबाबतची माहितीही सर्वांना सांगायलाच हवी. ही लोक पानास देव म्हणून पुजतात. देवळाच्या बाहेर चपला काढून जाणे, हे आपण सर्वजण करतो. परंतु ही मंडळी पानाच्या मळ्यात जाण्याअगोदर, चपला काढतात. व पाया पडून, वाकूनच मळ्यात प्रवेश करतात. पानांच्या वेलीस लांब फळ लागते, त्यास ही लोकं 'नथ ' म्हणतात. तो वेलीचा दागिना आहे असे समजून, यांच्या स्त्रिया या नाकात नथ घालत नाहीत. खरंच, सगळंच विलक्षण! झाडाझुडपांना देव मानणाऱ्या, या लोकांना माझा सलाम!
2) वाताचा त्रास:-
वाताचा त्रास असणाऱ्या बऱ्याच रुग्णांमध्ये, शरीर हे जड होते हातापायात मुंग्या येतात, शरीर थरथरते, त्या लोकांना एक छानसा उपाय सुचवतो. त्यांनी दोन चमचे विड्याच्या पानांचा रस, एक चमचा आल्याचा रस, कणभर हिंग व पाव चमचा तूप हे मिश्रण एकत्र करून चांगले घोटावे, व कोमट करून गरम पाण्याबरोबर घ्यावे, ने माने घेतल्यास खूप लोकांना चांगला फरक पडल्याचे अनुभवलेले आहे, मात्र पित्ताचा ज्यांना त्रास होतो, त्यांनी हा उपाय करू नये.
3) मुखशुद्धी कर:-
बऱ्याच जणांना, धाब्यावर चा गाडीवरच्या खाण्याचा खूप शौक असतो. अशा लोकांची पचन क्रिया ही काही दिवसांनी बिघडून जाते, मग त्यांच्या तोंडाचा खूप घाण वास येत असतो, चारचौघात बोलायचे म्हणले तरी, लाज वाटते. अशांनी साध्या त्रिफळा चूर्णाने गुळण्या कराव्यात, व जेवणानंतर विड्याची पाने, जायपत्री, कंकोळ, वेलची चा तुकडा या बरोबर खावे. व पचन क्रिया सुधारण्यासाठी काही औषधे घ्यावीत. थोड्याच दिवसात फरक पडलेला दिसून येईल.
4) सर्दी -खोकला- दमा:-
विडा हा गरम असल्याने, कफ कमी करण्याचे चांगले काम करतो. विड्याच्या पानाचा रस कोमट करून घेतल्यास, सर्दी खोकला, दमा यावर उत्तम आराम पडतो. एक स्त्री दम्याने खूप हैराण झाली होती, तिचे शरीर हे खूपच बारीक झाले होते, तिला मी माझ्या काही औषधांबरोबरच, काही घरगुती उपाय सांगितले ते असे, विड्याच्या पानाबरोबर वेलची चे दोन चार दाणे, व दोन चिंम ट्या अडुळशाची पावडर ही सकाळ-संध्याकाळ घ्यायला सांगितली, व दिवसातून पाच ते आठ लवंगा या चघळायला सांगितल्या, असे बरेच दिवस केल्यानंतर, तिचा दमा हा बराचसा कमी झाला, पाच सहा महिन्यानंतर ती मला रस्त्यात भेटली, तिनेच मला "काय डॉक्टर बरे आहात ना? "अशी हाक मारली थोडा वेळ गेल्यानंतर माझ्या लक्षात आले, एवढी लक्षणीय सुधारणा तिच्या तब्येतीत झाली होती.
5) लहान मुलांसाठी:-
'पाली 'हे अष्टविनायकांपैकी एक क्षेत्र आहे, तिथून एक दहा वर्षाचा मुलगा, हा माझ्याकडे मागच्या वर्षी आला होता. माझ्याकडे येण्याअगोदर बऱ्याच जणांकडे जाऊन तो आला होता. त्यास सात ते आठ दिवसानंतर शौचास येई, शौचास क डक होत असल्याने त्याला त्रास होई, त्याला मी आहाराच्या चांगल्या सवयी, बस्तीचे काही उपचार व औषधोपचार दिले. व जोडीला एक प्रयोग सांगितला तो असा, मोठे खायचे पान घ्यायचे त्याचा देठ मोडायचा, त्या देठास तूप लावून ते शौचाच्या जागेवर सकाळी फिरवायचे, पंधरा दिवस सलग उपचार केल्यानंतर, आज वर्षे झाले त्याचे रोज पोट साफ होते, त्या मुलाच्या आजोबांनी ही मला खूप पेशंट मिळवून दिले.
6) गाय कांसाठी :-
गायक लोकांना, रात्रीचे जास्त गाणे करावी लागतात, सोबत सततचा प्रवास, पाणी बद्दल, प्रवासामुळे वारे लागणे, अशा बर्याच कारणांमुळे त्यांचा घसा दुखतो. अशांनी विड्याच्या पानाबरोबर एखाद्या मिरी चा तुकडा खाल्ला की कफ कमी होतो, व घसा मोकळा होतो.
7) आदिवासी रुग्णाचा अनुभव:-
आमच्या परिसरात, बरेच आदिवासी बांधव राहतात परंपरेने त्यांना बरेच झाडपाल्याचे ज्ञान मिळाले असते, जखम झाली कि जखम स्वच्छ पाण्याने धुतात, जखमे नुसार विड्याची पाने ती घेतात, पान बारीक करून त्यात हळद व तूप टाकले जाते. व जखमेवरती तेलावले जाते. बऱ्याच जणांच्या जखमा या साध्या प्रयोगाने बऱ्या होतात,
8) तांबूल सेवन:-
बऱ्याच जुन्या ग्रंथात "तांबूल सेवन "करायला सांगितलेले आहे, तांबूल सेवन म्हणजे तंबाखू नव्हे, हे या ठिकाणी प्रथम स्पष्ट करतो. विड्याची पाने ही कामवर्धक असतात, खाल्लेले अन्न पचायला सोपे करतात, तोंडास उत्तम चव निर्माण करतात, एक विड्याचे पान घ्यावे, त्यात चांगल्या प्रतीचा कळीचा चुना लावावा, थोडी सुपारी, थोडी कात, वेलची एक-दोन दाणे, लवंग, चवीनुसार बडीशेप, धन घ्यावे, जेवणानंतर हा विडा खावा. त्याने शरीरात शक्ती वाढल्याचा अनुभव येईल.
हे झाले वि ड्याचे महात्म्य !परंतु पान सर्वजणांना चालत नाही, बरं का? ज्यांना नाकातोंडातून रक्त पडत आहे, घशाला कोरड पडली आहे, डोळे आलेली आहेत, टीबीची लागण झालेली आहे, डोळे कोरडे पडलेले आहे. त्यांनी वि ड्याचे सेवन हे टाळलेले बरे. मला वाटतंय याबद्दलचे बरेच गैरसमज हे लोकांचे दूर झाले असतील, खायच्या पानांची भावना घेऊन "लघुसूतशेखर" नावाचे औषध आमच्याकडे तयार होते, जे पित्त वरील एक उत्कृष्ट असे औषध आहे, असो. मग जेवणानंतर वि ड्या बद्दल गैरसमज टाळून 'तांबूल सेवन' जरूर करा व लोकांनाही याबाबत जागृत करा.
आपला,
डॉ :- विलास जगन्नाथ शिंदे,
आयुर्वेदाचार्य,
जिजाई आयुर्वेद चिकित्सालय,
खालापूर -रायगड,
फोन :7758806466
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"