Tuesday, July 30, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ३0 जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ३० जुलै  🌸* 

*राम  कर्ता  हे  जाणून  चित्तीं ।  जगांत  संत  ऐसें  वर्तती ॥*

जेथे मीपणाचे ठाणें । तेथें दुःखाचें साम्राज्य असणे । हा आहे नियम । म्हणून मी सांगतो राखावा नेम । सर्वस्वी व्हावें भगवंताचें । 'मी, माझें' सोडून साचें ॥
बाह्य मीपणानें जरी सोडलें । पण अभिमानानें वृत्ति बळावली । तेथें घाताला सुरुवात झाली ॥ 

बुद्धि करावी स्थिर । नामीं असावें प्रेम अनावर ।
राम कर्ता जाणूनि चित्तीं । जगांत संत ऐसें वर्तती ॥ 
साधनीं सावधान जाण । हेंच साधकाचे मुख्य लक्षण ॥
बाह्य वेषानें कसाहि नटला । जगाला भुलविता झाला ।
तरीं जोंवरी नाहीं चित्त स्थिर । कसा पावेल रघुवीर ? ॥ 

आजवर केल्या गोष्टी फार । भल्या बुर्या असतील जाण । त्याचा न करावा विचार । पुढें असावें खबरदार ॥ 
मानावी परस्त्री मातेसमान । दुसर्याचेंन पाहावें उणेपण । परनिंदा टाळावी । स्वतःकडे दृष्टी वळवावी ॥
गुणांचे करावें संवर्धन । दोषांचे करावें उच्चाटन । याला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ॥ 

प्रपंच न मानावा सुखाचा । तो असावा कर्तव्याचा ॥
वृत्ति असावी स्थिर । चित्तीं भजावा रघुवीर ॥
असा करा कांही नेम । जेणें जवळ येईल राम ॥ 

प्रपंचाची धरितां कांस। दुःखचि पावे खास ॥ प्रपंच हाच आधार । प्रपंचाविण निराधार । ऐशी होई ज्याची वृत्ति । समाधान न ये त्याचे हातीं ॥

तुम्ही सुज्ञ भाविक जाण । एवढें ऐकावें माझें वचन ॥
दुष्ट मतीची उत्पत्ति । ही दुर्जनाची संगति । भावें धरितां रघुपति । सर्व संकटें दूर जाती ॥ 
वृत्ति असावी खंबीर । ज्याचा आधार रघुवीर ॥ 

दुर्जनांचे जैसें मन । पाषाणास न फुटे द्रव जाण । तैसें प्रपंची इच्छी जो सुख । जें आजवर कोणासन मिळाले देख ॥ 
प्रपंचाचे दुःख जाण । तें मीपण असल्याची खूण जाण ॥ 

जगांत वर्तावें, घरांत असावें । व्यवहारांत व प्रपंचांत वागावे । परि न कोठे गुंतावें ॥ 
फार दिवसांचा वृक्ष झाला । घरांतील घडामोडी दिसती त्याला ।जैसें तो न सोडी आपलें स्थान । तैसें वागावें आतां आपण ॥ 

ज्याचें घरी रामाचा वास । तेणें न राहावें कधीं उदास ॥ 
सदा राखावें समाधान । मुखीं भगवंताचें नाम ॥ आतां प्रेम ठेवा नामीं । कृपा करील चक्रपाणी ॥ 
आतां करा चित्त स्थिर । हृदयीं धरा रघुवीर ॥ रामावांचून न आणावा विचार । हाच माझा आशिर्वाद ॥

*२१२.  जेथे  नाम  तेथे  राम ।  हा  ठेवावा  विश्वास ।  कृपा  करील  रघुनाथ  खास ॥*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ३१ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ३१ जुलै  🌸*

*आपण  भगवंताचे  झालो  तरच  सुखी  होऊ .*

आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे. परमात्मा साधायचा आहे, आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत, हे पक्के समजावे.
आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन मानतो, म्हणून आपले चुकते. 

एका गृहस्थाला मुलाबाळांसह मुंबईला जायचे होते. आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली, पण मुंबईस जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला. गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले, त्या गृहस्थाला नाही तसे वाटले.

वसिष्ठांनी रामाला सांगितले की,"रामा, तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निःसंग रहा."
 'मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे, निःसंग आहे,' ही दृढभावना ठेवून प्रपंच करावा.

 जमीन सोडून कुणाला राहता येत नाही, त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही. पण त्यात 'राम कर्ता' मानून वागणारा तो पारमार्थिक, 'मी कर्ता' असे मानून वागणारा तो प्रापंचिक.
 'मी कर्ता' असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो, सुखरूप होत नाही, तर त्याचा कर्ता मी नाही हे सिद्ध झाले !

प्रपंच हा अर्धवट आहे, पूर्ण फक्त राम आहे. 
मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारटपणा जात नाही, तसे प्रपंचाचे आहे. म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण, ते अखंड करावे. 

प्रपंचात आपण किती कष्ट करतो ! तितका मोबदला मिळत नाही, तरीही कष्ट करतो. परमार्थात तसे नाही. परमार्थ जितका जितका करावा तितके तितके समाधान अधिकाधिक असते. 
आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्युमुखीही प्रपंचच आठवेल. म्हणून प्रपंचाचा हव्यास धरू नये. 

प्रपंचातल्या वस्तू आज ना उद्या जाणार हे जाणून, त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावे. ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी. प्रपंचात, प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा, गेल्याचा शोक न करावा. देह प्रारब्धावर टाकावा.
 हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ति आहे; आपण रामाचे व्हावे. राम ठेवील तसे समाधानाने राहावे. 

हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे; तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे.
सर्व ईश्वराचे आहे, माझे काही नाही, असे समजणे म्हणजे ईश्वरार्पण करणे आहे.
 आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ, नाहीतर दुःखी होतो. 

धान्यातले दगड, माती, पाकड, निवडून बाजूला काढून, धान्य जे सार, ते घ्यावे;
 त्याचप्रमाणे, अहंकाराचे खडे, ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड, आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो. ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच !

*२१३.  'रामा ,  सर्व  तुझेच  आहे ,  तू  देशील  ते  घेईन .'  अशी  भावना  ठेवावी .  यानेच  अत्यंत  समाधान  होते .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Sunday, July 28, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २८ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २८ जुलै  🌸*

*नाम  घेणार्याच्या  मागेपुढे  मी  उभा  आहे .*

गूढ शोधून काढण्याकडे मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात. ते कुठून येतात हे कळत नाही. 
म्हणजे, केवळ दृश्यामध्ये असणार्या गोष्टींचे देखील मूळ आपल्याला उकलत नाही. 
मग जे अदृश्यच आहे त्याचे मूळ आपल्याला कसे कळणार ? 

मी बोलतो कसा, माझे मन कुठून येते, हे देहबुद्धीत राहणार्यांना कळणे कठीण आहे. 
नामामध्ये जे स्वतःस विसरले त्यांनाच मी खरा कळलो. 

स्वतःच्या प्रपंचाचे कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता.
 पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो, त्याप्रमाणे प्रपंचामधे कसेही केलेतरी दुःखच पदरात पडते. 

आपण समजून उमजून ज्या चुका करतो, त्यांचा दोष आपल्याकडे असतो. न समजता जी चूक होते त्याचा दोष येत नाही. 

प्रपंचाच्या आसक्तिने दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ति ठेवतो, हा दोष नव्हे काय? आपले कुठे चुकते ते पाहावे आणि जे चुकते ते सुधारावे. 

प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठे मिळतात ? 
त्या मिळणे न मिळणे आपल्या हातातच नसते. 
मग अमुक हवे किंवा नको असे कशाला म्हणावे ?
रामाचेच होऊन राहावे म्हणजे झाले ! 
जो रामाजवळ विषय मागतो, त्याला रामापेक्षा त्या विषयाचेच प्रेम जास्त असते असे सिद्ध होते.

मी तुमच्याकडे येतो. पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवीत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा; म्हणजे सतत नामस्मरणात रहा.

 मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. मला रामावाचून दुसरे जिवलग कोणी नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. 

तुम्ही भगवंताचे नाम घ्यावे यापलिकडे खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की, वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. जो माझा म्हणतो , त्याला नामाचे प्रेम असलेच पाहिजे. 

जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका, आणि घ्यायचे झाले तर नामच घ्या.
 माझा नियम असा आहे की, परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल. माझ्या गावी पैसा पिकत नाही. पण भक्ति मात्र खास पिकते.
 
ज्याच्याजवळ भगवंताचे नाम आहे त्याच्या मागेपुढे मी उभा आहे. मी तुमच्याजवळ आहेच; तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसते नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो.

शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे, मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे; ती मी सांभाळीन.

*२१०.  जेथे  नाम  तेथे  मी ।  हा  भरवसा  बाळगून  असावे  तुम्ही ॥*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।‌‌।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २९ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २९ जुलै  🌸*

*मला  कुणाचे  दुःख  पाहवत  नाही.*

पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावे, आणि भगवंताचे नाम घ्यावे, ह्या तीन गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करील  त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही. 
जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो, त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट, इतरांच्या पेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे. 

कमी आहे त्याची काळजी न करता, जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता, जो येईल तसा खर्च करतो, तो मनुष्य ते सर्व मला देतो. 

मला विकत-श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही; पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो. 
माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे खूप होती; पण मी कधीही काळजी केली नाही. 

मी आजपर्यंत पैशासाठी कुणापुढे जीभ विटाळली नाही. उद्या जर कोणी एक लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले, तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाचे चार आणे मिळवून पोट भरीन. 

मला आवडते की, एक लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावे, भिक्षा मागावी, आणि अखंड नाम घ्यावे. हे करायला कोण तयार आहे ? 

मी आपला नामाचा हट्ट कधी सोडला नाही. मी जरी जास्त गरीबांचा आहे, तरी मला प्रपंचांत कधी दैन्यपणा आवडत नाही. दुसर्याकरिता निःस्वार्थी पणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही.

व्यवहार दृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की, मला कुणाचे दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही. माझ्यातले प्रेम काढले तर मग 'मी' नाहीच ! 

मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणार्या माणसाला माहेरी आल्यासारखे वाटले पाहिजे; तो परत जाताना त्याच्या डोळ्यांत पाणी आले पाहिजे.

दुसर्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही; ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात. पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे. 

माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक ! मी पुढे असो वा नसो, जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटीही सांगतो :
तुम्ही कसेही असा पण भगवंताच्या नामाला सोडू नका. 
रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी, ही माझी त्याला प्रार्थना आहे. 
तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे. या कष्टांचा मोबदला रामरायच तुम्हाला देईल. तुम्ही सर्वजण आनंदात राहा, हा माझा तुम्हा सर्वांना आशिर्वाद आहे.

*२११.  माझा  असा  अनुभव  आहे  की,  जो  मनुष्य  आपले  आहे  ते  रामाला  देतो  त्याला  राम  पुरवतो.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २७ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २७ जुलै  🌸*

*आपण  मागावे  फक्त  एका  रामाजवळ .*

आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी. आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे. किंबहुना,
 लहान मुलाला जशी आई, मोठ्या मुलाला जसा बाप, बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनीमाला जसा सज्जन मालक, नोकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू मित्र, तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे. 
म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावे. भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन, त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा, हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री-पुरुषाला समजणे अशक्य आहे. 

जगात घडून येणार्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे.

 इतकेच नव्हे, तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल, ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते, त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. 

सर्व काही राम करतो, खरे कर्तेपण रामाचे, हे नीट लक्षात आणून, भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाहीसे व्हावे. 

खरोखर, आपल्या रामाला काय कमी आहे ? आपण मागावे फक्त एका रामाजवळ ! तो देईल अथवा न देईल. जे देईल त्यांत समाधान मानावे. दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधी मागू नये. त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे. मात्र देणार्याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये.

माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही. माझ्या गुरूंनी मला नामच दिले, तेच नाम मी सर्वांना देत आहे. तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीने भेटेल. तोंडाने नेहमी 'राम राम' म्हणत जा. भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असा माझा अनुभव आहे. म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री - पुरुषांनी घ्यावे. 

कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा. गाईचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी, फक्त भगवंतासाठी असावी. 

आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहो, जी जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत असावे. 
ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात, त्या वेळी कलियुग सुरू झाले असे समजावे. सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात. विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशा वेळी, भगवंताच्या नामाचे माहात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच; पण 
परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील, तो प्रत्येक संकटातून सहीसलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा.

*२०९ .  राम  कर्ता  म्हणेल  तो  सुखी ,  मी  कर्ता  म्हणेल  तो  दुःखी .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २४ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २४ जुलै  🌸*

*सद्‌गुरूला  शरण  जावे .*

प्रत्येकजण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करीत असतो. परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का ? नाही. म्हणून, सांगायचे कारण असे की, 
जर आपण विषयांकरिता इतके झटतो, तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का ? संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा. 
एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरू कल्पिला, तो सांगेल तेच साधन मानावे. 

गुरू देहातच असावा हे मानणे चूक आहे.गुरू हे देहात कधीच नसतात. 
गुरू प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे. अशी भावना ठेवून वागले, म्हणजे गुरू कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला येणे भाग पडते. 
गुरू सांगेल तसे आपण नेहमी साधन करीत राहावे. तसे साधन करीत राहिले म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती होते. गुरू नामाशिवाय दुसरे काय सांगणार ? त्यातच आपण सदा राहावे. जो खरा साधनात राहतो, त्याला ह्या सर्व गोष्टी आपोआपच साधत असतात. म्हणून आपण गुरूला अनन्यशरण जाऊन, तोच सर्व करतो आहे हे मानून,जे होईल त्यात आनंद मानीत जावा. 
भगवंताबद्दल जिज्ञासा उत्पन्न होणे ही खरी भाग्याची गोष्ट आहे. असा जिज्ञासू शिष्य भेटला तर गुरूला देखील आपले स्वतःचे सार्थक झाले असे वाटते. श्रीरामचंद्राची जिज्ञासू अवस्था पाहून वसिष्ठांना फार आनंद वाटला; आणि ते साहजिकच आहे. 
एकच देव, एकच साधन, आणि एकच गुरू मानला, त्याचप्रमाणे, आपण एका नामात राहण्याचा प्रयत्न करावा.

 मुलगा हसतखेळत असताना बाप त्याला घेतो, पण रडू लागला की खाली ठेवतो; याच्या उलट, मुलगा रडत असला तर आई त्याला घेते.हाच देवामध्ये आणि संतामध्ये फरक आहे.

बर्फामधले पाणी काढले तर काहीच उरत नाही. त्याप्रमाणे, संतांमधले भगवंताचे प्रेम जर काढून टाकले तर त्यांच्यामध्ये मग काहीच उरत नाही. 
साधन करण्याचे कष्ट न होता वस्तू साध्य करून घेण्याचा मार्ग म्हणजे सत्संगती हा होय. आपल्या मनावर संगतीचा फार परिणाम होतो. नुसता हेतू काम करीत नसून संगत काम करीत असते. 
संगत दोन प्रकारची आहे; घातक आणि उत्तम. विषयी माणसाची संगत ही घातक होय, आणि सत्संगत ही उत्तम होय.
 सत्संगतीमध्ये असताना,आपल्या ठिकाणी दोष आहे असे ज्याला कळेल तो लवकर सुधारेल. 
आपण ज्या सत्पुरुषाकडे जातो त्याने सांगितलेले मनापासून आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न केला, तरच त्याच्याशी खरी संगत केली असे म्हणावे. 
संताची प्रचीती पाहणे म्हणजे आपले प्रपंचातले काम मनासारखे होणे हे नव्हे. ज्या घटकेला आपले चित्त शुद्ध होते, त्या घटकेला संताची खरी प्रचीती आली असे समजावे.

*२०६ .  संतांना  ओळखण्यासाठी  अनुसंधानाशिवाय  दुसरे  साधन  नाही .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Saturday, July 27, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २७ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २७ जुलै  🌸*

*आपण  मागावे  फक्त  एका  रामाजवळ .*

आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्याकरिता व्हावी. आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे. किंबहुना,
 लहान मुलाला जशी आई, मोठ्या मुलाला जसा बाप, बाईला जसा प्रेमळ नवरा, मुनीमाला जसा सज्जन मालक, नोकराला जसा त्याचा स्वामी, एखाद्याला जसा विश्वासू मित्र, तसा रामराया प्रत्येकाला वाटला पाहिजे. 
म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावे. भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन, त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा, हे सगुणोपासनेशिवाय सामान्य स्त्री-पुरुषाला समजणे अशक्य आहे. 

जगात घडून येणार्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे.

 इतकेच नव्हे, तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल, ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते, त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही. 

सर्व काही राम करतो, खरे कर्तेपण रामाचे, हे नीट लक्षात आणून, भगवंताकडे कर्तृत्व द्यावे आणि आपण मीपणाने नाहीसे व्हावे. 

खरोखर, आपल्या रामाला काय कमी आहे ? आपण मागावे फक्त एका रामाजवळ ! तो देईल अथवा न देईल. जे देईल त्यांत समाधान मानावे. दुसऱ्या कोणाच्याही जवळ आपण कधी मागू नये. त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे. मात्र देणार्याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये.

माझ्या आयुष्यात मी नामाशिवाय दुसरे साधन केले नाही. माझ्या गुरूंनी मला नामच दिले, तेच नाम मी सर्वांना देत आहे. तुम्ही ते नाम घ्या, तुम्हाला राम खात्रीने भेटेल. तोंडाने नेहमी 'राम राम' म्हणत जा. भगवंताच्या नामामध्ये जीवाचे कल्याण आहे असा माझा अनुभव आहे. म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री - पुरुषांनी घ्यावे. 

कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा. गाईचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी, फक्त भगवंतासाठी असावी. 

आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहो, जी जाणीव राहण्यासाठी त्याचे नाम सतत घेत असावे. 
ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात, त्या वेळी कलियुग सुरू झाले असे समजावे. सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात. विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते कृत्य करण्याची त्यांची तयारी असते. अशा वेळी, भगवंताच्या नामाचे माहात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचेच; पण 
परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील, तो प्रत्येक संकटातून सहीसलामत पार पडेल यात शंका नाही. म्हणून प्रत्येकाने नामाला चिकटून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंताचे प्रेम जोडा.

*२०९ .  राम  कर्ता  म्हणेल  तो  सुखी ,  मी  कर्ता  म्हणेल  तो  दुःखी .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Friday, July 26, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २५ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ‌।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २५ जुलै  🌸*

*भगवंताचे  नाम  सोडू  नका .*

संकल्प ही फार मोठी शक्ति आहे. इच्छा जर खरोखर अती प्रबळ झाली, तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसेच, भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत भेटतो.

 प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळविल्या, तरी त्या स्वभावतःच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही. 
याच्या उलट, भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे, आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात, आणि नंतर आपोआप नाहीशा होतात. 
म्हणून नेहमी 'भगवंत मला हवा' अशी इच्छा करीत जावे. त्याचे नाम घेणे, म्हणजे 'तू मला हवास' असे म्हणणेच होय. 

खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला, तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो. 
आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो, ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे, म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही. 

नामात एक विशेष आहे. विषयाकरता जरी नाम घेतले तरी विषय प्राप्त होऊनही ते आपले काम, म्हणजे तुमचे मन निर्विषय करणे, ते करीतच असते, म्हणून कशाकरता का होईना, नाम घ्या. पण निर्विषय होण्याकरिता घेतले तर काम शीघ्र होईल. 

साधन तेच, आणि साध्यही तेच. नामच एक सत्य आहे, यापरते दुसरे सत्य नाही, यापरते दुसरे साधन नाही, असा दृढ भाव असावा. 

आपण कोणचेही कृत्य करीत असताना, ज्याकरता ते आरंभले ते जसे नेहमी आपल्या डोळ्यासमोर असते, त्याप्रमाणे नाम घेताना, ते आपण कशाकरता घेतो त्याची जाणीव अखंड असावी. ही जाणीव अखंड ठेवणे, मी भगवंताचा आहे हे जाणणे, याचे नाव अनुसंधान. 

वास्तविक आपण भगवंताचेच आहोत, पण भ्रमाने मला 'मी विषयाचा आहे' असे वाटू लागले. संत 'तू विषयाचा नाहीस, भगवंताचा आहेस,' असे सांगतात. हीच संतांची खरी कामगिरी; आणि याकरता ते नाम सांगतात, 

नाम घेणे म्हणजे 'मी विषयाचा नाही, भगवंताचा आहे' असे मनाला सांगणे, मनात तशी जाणीव उत्पन्न करणे, आणि ही जाणीव टिकवण्याकरता पुनः पुनः मनाला तेच सांगणे, म्हणजे तेच नाम सतत घेणे.

भगवंत खरोखरच मनापासून ज्याला हवा आहे, त्याचे काम झालेच पाहिजे. 
आपल्याला जगातला मान, लौकिक, पैसा, विषय इत्यादि काही नको असे वाटते का ? तसे नसेल तर, 'भगवंत मला हवा आहे' असे नुसते तोंडाने म्हणणे बरोबर नाही. 

ज्याला भगवंताचे प्रेम जोडायचे असेल त्याने जगाचा नाद सोडायला पाहिजे. जगाच्या मागे लागाल तर आपले साधन बुडवून बसाल. तुम्ही सतत भगवंताचे नाम घ्यावे आणि मनापासून भगवंताला आळवावे, तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे.

*२०७ .  जो  जो  संकल्प  उठेल  तो  तो  रामस्मरणयुक्त  असला  पाहिजे .*

*।‌।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २६ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २६ जुलै  🌸*

 *साधन  -  चतुष्टय .*

कोणतीही इमारत बांधीत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. 

शास्त्राने चार प्रकारचे साधन सांगितले आहे. 
प्रथम, नित्यानित्य वस्तुविवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या वाबतीत आपण उदास व्हावे आणि नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावे.
 नंतर, या जगातल्या किंवा स्वर्गातल्या भोगाची वासना नाहीशी करावी. हे दुसरे साधन होय. आपले मनबाह्य विषयांकडे धाव घेते; तिथून त्याला खेचून आणावे आणि भगवंताकडे लावावे. 
आपण चूक केली नसतानाही कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावे, गुरूच्या सांगण्यावर विश्वास ठेवावा, हर्ष विषाद न मानता संतोषाने राहावे; हे तिसरे साधन होय. 
शेवटी, भगवंताच्या भेटीची खरी तळमळ लागावी. 
ही सर्व साधनसामग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल.
 ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावे लागते. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. मनामधली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये.

नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्यजन्माचे ध्येय नव्हे. जनावरेदेखील आपापला प्रपंच करतातच. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातल्या कष्टांचे सार्थक होते. 
सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही. खरोखर, 
भगवंताच्या नामामध्ये फार मोठे सामर्थ्य साठविलेले आहे. त्याचे नाव घेऊन जो जगात वावरेल, त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असे नाही, परंतु भगवंत त्याची लाज राखील यात शंका नाही. 

प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. 

रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावे लागते, पण हे आपल्याला सर्वाच्या शेवटी आठवते, म्हणून सुखदुःख बाधते. म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. 

प्रपंचाची तर्हा अशी असते की, आज सुख झाले म्हणून जरा बरे वाटले, की लगेच उद्या दुःखाचे ताट पुढे वाढून ठेवलेले असते. म्हणून, एका डोळ्यात सुखाचे अश्रू, तर दुसर्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावे. 

प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते, तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे ? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे, आणि बरावाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे. 

जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणार्याचे राम कल्याण करतो, एवढे माझे सांगणे शेवटर्यंत विसरू नका.

*२०८ .  अती  प्रेमाने  नाम  घ्यावे.  नामात  तल्लीन  झाल्यावर  देहाची  सुखदुःखे  बाधणार  नाहीत .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Sunday, July 21, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २१ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २१ जुलै  🌸*

*वेदाप्रमाणे  नामही  अनादी,  अनंत,  अपौरुषेय  आहे.*

शास्त्रामध्ये असे सांगून ठेवले आहे की, कृत युगामध्ये ध्यानाने, त्रेता युगामध्ये हवनाने आणि द्वापार युगामध्ये देवतार्चनाने भगवंताची प्राप्ती होते. 
परंतु कलियुगामध्ये त्यांपैकीं काहीच साध्य होणे शक्य नसल्याने, भगवंताचे केवळ नाम घेतले असता मनुष्याला त्याचे दर्शन घडते. 
शास्त्राच्या या सिद्धांताचा संतांनी स्वतः अनुभव घेतला आणि लोकांना सांगितले की, 

साडेतीन कोटी जप केला असता चित्तशुद्धी होते; आणि तेरा कोटी जप केला असता, भगवंताचे दर्शन होते. 

मला आपण महत्त्व देऊ नका; पण ज्या थोर संतांच्या नावावर मी नामाविषयी सांगतो, ते ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, आणि समर्थ रामदासस्वामी, यांच्यासारखे संत कधी वेदबाह्य बोलतील, हे शक्यच नाही.
 वेदांना जे परमात्मस्वरूप अगोचर आहे ते स्वरूप संत तद्‌रूपाने जाणतात. 
सध्याच्या परिस्थितीमध्ये संयमाची बंधने सुटत चालली आहेत, म्हणून संतांनी कळवळून 'नाम घ्या' असे सांगितले. 
वेद भगवंताचे वर्णन करतात. नामदेखील भगवंताचेच अस्तित्व प्रकट करते. प्रत्येक वेदमंत्राच्या आरंभी 'हरिः ॐ' असते, ते नामच आहे. 
जसा वेद हा अनादि, तसे नाम अनादि. जसा वेद हा अपौरुषेय, तसे नाम हे अपौरुषेय. जसा वेद हा अनंत, तसे नाम हे अनंत आहे. प्रत्यक्ष शिवाने नाम घेतले, म्हणून ते अनादि साधन आहे. 

इतर साधनांना आणि वैदिक कर्मांना आहाराविहाराची बंधने आहेत, भगवंताच्या नामाला ती नाहीत. नाम हे आगंतुक नाही. आदिनारायणाने वेद सांगण्याच्या वेळी जो ॐ चा ध्वनी केला तेच नाम होय. 
म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की, आपण नाम घेत जावे. किंबहुना,आपण नाम घेतले तरच वेदांचा खरा अर्थ आपल्याला कळेल अशी माझी खात्री आहे. वेद म्हणजे भगवंताची स्तुती होय. ती करीत असताना, म्हणजे वेद म्हणत असताना, आपले लक्ष शब्दांकडे असावे. आपण नेमके तेवढेच विसरतो. 

नाम घेणार्या लोकांनी शास्त्राच्या विरुद्ध वर्तन करू नये. आपल्याला शक्य आहे तितके वैदिक कर्म करावे, परंतु चित्तशुद्धी होण्यासाठी त्यावर पूर्णपणे विसंबून न राहता त्या कर्माच्या जोडीला भगवंताचे नाम घ्यावे. 

भगवंताला लबाडी खपत नाही. आपले मन स्वच्छ नसेल तर भगवंत हात आखडता घेतो, पण खरी अनन्यता असेल तर पोटभर पुरवितो. 

इतक्या तन्मयतेने नाम घ्या की, 'मी नाम घेतो आहे' हे सुद्धा विसरून जा.

*२०३.  इतर  साधनांनी  लवकर  साधल्यासारखे  वाटेल  पण  ते  तात्पुरते  असते.  नामाने  थोडा  उशीर  लागेल,  पण  जे  साधेल  ते  कायमचे  साधेल,  कारण  नामाने  मुळापासून  सुधारणा  होते.*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २२ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २२ जुलै  🌸*

 *गुरू  आपल्याला  अंतिम  सुख  दाखवितात .*

एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती. 'ती काढण्याकरिता मी आत उडी मारतो,' असे तो म्हणू लागला. 
त्यावर तिथे होता तो एक मनुष्य म्हणाला, 'तू असे करू नकोस, आत पडून बुडून जाशील.' तरीपण तो ऐकेना, 
एवढ्यात त्याचा बाप तिथे आला. त्यानेही मुलाला पुष्कळ सांगून पाहिले, 
पण तो ऐकेना, मग त्या मुलाला बापाने धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेले. 

आता, मुलाला मारले म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का ? "एकुलता एक मुलगा, नवस करून झालेला,त्याला जाऊ दिले असते तर काय झाले असते ?" असे म्हणाल का ? नाही ना ?

तर मग गुरू करी काय करीत असतो ? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असते; म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचविण्यासाठी चार गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकले, तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवितो.
आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढीतच असतो. 
आपण तर चांगले शिकले-सवरलेले; त्या मुलाप्रमाणे अज्ञान नसून चांगले वयस्कर; तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. 

गुरूने सांगितले, 'लग्न करू नकोस', तर आपण 'लग्न कधी होईल' म्हणून त्याच्या पाठीस लागत असतो. आणि शेवटी तर 'गुरूला समजतच नाही' असे म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते ! 

सध्या दिसते तेच सुख आपण खरे असे मानीत असतो. पण अंतिम सुख काय, हे गुरूला कळत असते. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करीत असतो. 
तेव्हा, आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणे हेच श्रेयस्कर आहे. 
तो जे साधन सांगेल तेच करीत राहावे, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. 

गुरू आज्ञा करतो म्हणजे काय करतो ? तर आपले मन जिथे गुंतले असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो.

भगवंत भक्ताची संकटे नाहीशी करतो, 
म्हणजे त्याची प्रापंचिक संकटे दूर करतो असे नाही. ती काय, सहज दूर करता येतात; 
पण भक्ताला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ति भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संतपदाला पोहोचतात.
 
एकाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडे तरी विद्वान झाले पाहिजे, 
त्याप्रमाणे, संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. 
संतांचा मुख्य गुण म्हणजे, ते भक्तिला चिकटलेले असतात. 
सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्यात्या देशकालमानाने निरनिराळे असतात, पण आतले भगवंताचे प्रेम मात्र सर्वांचे एकच असते.

*२०४ .  प्रापंचिक  जन  विषयप्राप्तीसाठी  झटतात.  पण  विषयमागूनही  जो  देत  नाही,  त्यापासून  परावृत्त  करतो,  तो  संत .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।‌।*

Saturday, July 20, 2019

कठीण परिस्थिती मधेच आपल्या कर्तव्यनिष्ठतेची परीक्षा असते.

एकदा इंद्रदेव सर्वांवर कोपले.
त्यांनी शाप दिला पुढची १२ वर्षे पाऊस पडणार नाही व तशी आकाशवाणी हि केली.

पृथ्वीवर सर्वदूर हाहाकार माजला.
सर्वजण हताश झाले.

१२ वर्षे पाऊस येणार नाही म्हणजे सर्व मणुष्य,प्राणी दुःकाळाने मरणार या विचाराने सर्व जण घाबरून गेले.

एक शेतकरी जंगलातून रोज पाणी भरून आणायचा आणि आपली गुरे व कुटुंबाला पाणी द्यायचा.

थोड्याच दिवसात जंगलातील पाणी साठाही संपून गेला.

शेतकरी पाण्याच्या शोधात जंगलात फिरू लागला असता त्याला एक विलक्षण दृश्य दिसले.

एक मोर आपल्या पिलांना नाचायला शिकवत हॊता.

त्या पिलांनी मोराला विचारले:-
जर १२ वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण नाचून किंवा नाच शिकून काय फायदा?

मोर म्हणाला:-
आपण जर आता पासून नाचणे किंवा नाच शिकणे बंद केले,
तर जेंव्हा १२ वर्षांनी पाऊस पडू लागेल तेव्हा आपण सारे नाचणे विसरूनच गेलो असु.

शेतकरी हा संवाद ऐकून अवाक झाला.
तो धावतच घरी आला,
शेतीची अवजारे गोळा केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मुलांना घेऊन शेतावर गेला.
आणि कोरडे शेत नांगरु लागला,
मुलांना शेतिची कामे शिकवू लागला.

मुले चकित होऊन बापाकडे पहात होती.
त्यांनी त्याला विचारले:-
बाबा जर १२ वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण आता शेत नांगरून मशागत करून काय फायदा?

शेतकरी म्हणाला:-
आपण शेतीची कामे शिकलो नाही किंवा करणे बंद केली,
तर १२ वर्षांनी पाऊस पडेल तोपर्यंत आपण सर्व कामे विसरून जाऊ.
आणि पुनः कमाला लागला.

इंद्रदेव आकाशातून या कुटुंबाला व शेतकऱ्याला काम करताना बघून अचंबित झाला.

तो एका ब्राम्हणाचे रूप घेऊन त्या शेतात आला आणि शेतकऱ्याला विचारले:-
तु आकाशवाणी ऐकली नाहीसका?

शेतकरी म्हणाला:-
होय ऐकली.
पण जर मी काम केलं नाही किंवा माझ्या मुलांना शेतीची कामे शिकवली नाही,
तर माझ्या पुढच्या पिढीला शेतीचे काहीच काम येणार नाही.
मग जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ते उपाशी राहतील.

इंद्र सुन्न झाला.
स्वर्गात आल्यावर विचार करु लागला कि,
जर मि १२ वर्षे पाऊस पाडला नाही तर मी सुद्धा पाऊस कसा पाडायचा ते विसरून जाईन.
मग सर्व सृष्टी करपुन जाईल,
जैव सृष्टी नष्ट होईल.

देवाने लगेचच विचार बदलला.
आपला शाप मागे घेतला आणि भरपूर पाऊस पाडायला सुरुवात केली.

तात्पर्य:-
बाह्य परिस्थिती कशीही असो आपण न चुकता आपले कर्तव्य  करीत राहायला हवं.

कठीण परिस्थिती मधेच आपल्या कर्तव्यनिष्ठतेची परीक्षा असते.

अंतिम अवस्था और इच्छा

जब *रामकृष्ण* को उनके अंतिम *गुरु तोतापुरी* का मिलना हुआ, तो रामकृष्ण करीब -करीब सिद्ध- अवस्था में थे। 

करीब-करीब में कहता हूं ख्याति हो गई थी कि रामकृष्ण पहुंच गये। रामकृष्ण को पता था कि अभी थोड़ी-सी कमी है, बस एक सीढ़ी और; मगर दूसरों को क्या पता! दूसरे तो देखते थे कि इतनी ऊंचाई इतनी ऊंचाई, आकाश में पहुंच गये हैं! उनको क्या पता कि एक सीडी और कम रह गई! तोतापुरी से जब रामकृष्ण का मिलना हुआ तो रामकृष्ण ने निवेदन किया कि बस एक सीडी और रह गई है, इसे मैं कैसे पार करूं?
तोतापुरी ने कहा : कठिन नहीं, ऐसे कठिन भी है। कठिन नहीं, क्योंकि इतनी सीढ़ियां पार कर आये तो अब एक पार करने में क्या अड़चन होगी? जैसे और सीढ़िया पार की हैं ऐसे यह भी सीढ़ी पार करो। सूत्र वही है। जैसे और सब चाहें छोड़ दीं, अब परमात्मा की चाह भी छोड़ दो।
और ऐसे कठिन भी है, क्योंकि और सब चाहें तो क्षुद्र थीं। धन की चाह छोड़ने में, पद की चाह छोड़ने में, प्रतिष्ठा की चाह छोड़ने में एक तरह का आनंद ही आया था, आह्लाद हुआ था-कि हल्के हुए, कि व्यर्थ का बोझ कटा, कूड़ा-करकट फेंका! मगर परमात्मा की चाह छोड़ना! जिसने इसे बचाने के लिए सब छोड़, अब उससे कहना इसे भी छोड़ दो! तो कठिन भी है। मगर चेष्टा करो तो हो सकता है।
रामकृष्ण ने कहा : मेरी सहायता करें। मुझ अकेले से न हो सकेगा। मैं तो आंख बंद करता हूं कि काली सामने खड़ी हो जाती है। मैं तो भूल ही जाता हूं। मैं तो रसलीन हो जाता हूं। मुझे तो द्वैत बना ही रहता है- भक्त का और भगवान का। अद्वैत घटता ही नहीं।
तोतापुरी ने कहा : मैं एक काम करूंगा। तू आंख बंद करके बैठ और जैसे ही मैं देखूंगा कि खड़ी हो गई प्रतिमा और द्वैत उठने लगा और काली की प्रतिमा, तेरी आराध्य की प्रतिमा सामने आ गयी, मैं आवाज दूंगा-रामकृष्ण उठा तलवार, कर दे दो टुकड़े! तो फिर देर पर करना, उठा लेना तलवार और कर लेना दो टुकड़े।
रामकृष्ण जैसे अदभुत व्यक्ति ने भी पूछा : लेकिन तलवार कहां से लाऊंगा? तोतापुरी ने कहा : यह खूब रही! और यह काली मैया कहां से लाया है? यह भी कल्पना है तेरी। सतत कल्पना करने से यह प्रतिमा खड़ी हो गई है। जहां से यह लाया वहीं से एक तलवार भी ले आ।
मगर रामकृष्ण ने कहा : मां को और तलवार से काट दूं! इससे तो खुद ही मर जाना पसंद करूंगा।
तोतापुरी ने कहा : फिर तेरी मर्जी। मगर यह करना ही होगा। अगर तू एक सीढ़ी और पार करना चाहता है तो यह काली को छोड़ ही देना होगा। अब यही बाधा है। यही तेरी आराध्य, यही तेरी पूजा और प्रार्थना, यही तेरी भक्तिअर्चना, यही बाधा है। तू कोशिश कर।
बार -बार रामकृष्ण आंख बंद करें, कोशिश करें, मगर कोशिश न हो पूरी। आंख बंद करें कि आंसुओ की धार, कि आनंद -मग्न हो डोलने लगें। और तोतापुरी कहें : फिर वही! अब तू यह किसलिए डोल रहा है? क्योंकि अद्वैत – भाव में डोलना वगैरह नहीं होता। और आंसू वगैरह की क्या जरूरत है? अद्वैत- भाव में तो सब थिर हो जाता है।
रामकृष्ण कहें : मगर मैं भूल ही जाता हूं आपकी याद नहीं रहती। आपने जो कहा वह भी भूल जाता है। जैसे ही आंख बंद करता हूं और मां के दर्शन होते हैं -अहा, बस फिर मुझे न आपकी याद रहती है न आपके उपदेश की याद रहती है।
तो तोतापुरी ने कहा कि मैं अब आखिरी उपाय करूंगा, क्योंकि कल सुबह मुझे जाना है। वे गये और रास्ते से एक काच का टुकड़ा उठा लाये। पड़ा होगा किसी बोतल का टूटा हुआ। और उन्होंने रामकृष्ण को कहा कि तू आंख बंद कर और जैसे ही मैं देखूंगा कि डोलने लगा, आंख में आंसू आने लगे, जैसे ही मुझे लगेगा कि अब प्रतिमा खड़ी हुई, मैं तेरे माथे को इस काच के टुकड़े से काट दूंगा। और जब मैं तेरे माथे को काटू? उस वक्त तू भी एक वार हिम्मत करके उठा कर तलवार दो टुकड़े कर देना। इधर मैं तेरा माथा काटू उधर तू मैया को काट देना।
बात तो बड़ी कठिन थी। बड़ी मुश्किल थी। अपनी मां को साधारणत: मारना बहुत मुश्किल है। और फिर काली मां को मारना तो और भी बहुत मुश्किल है। और यही तो जिंदगी भर की साधना थी रामकृष्ण की। और इस साधना में खूब फूल खिले थे और खूब रस बहा था, खूब आनंद उमगा था, खूब गीत जन्मे थे। इस सबको पोंछ देना एकबारगी! मगर तोतापुरी कल सुबह चला जाये… और तोतापुरी जैसा आदमी मिलना फिर मुश्किल है।
तो हिम्मत की, तोतापुरी ने काट दिया माथा। लहूलुहान, खून की धार बह गई रामकृष्ण के माथे से। और जब तोतापुरी ने माथा काटा तब उन्हें भी याद आई भीतर। उठाई उन्होंने एक तलवार कल्पना की और दो टुकड़े कर दिये काली के। छ: घंटे के लिए थिर हो गये। रोआ भी न हिला। छ: घंटे के लिये पत्थर हो गये! और जब आंख खोली तो आज एक अपूर्व दशा थी-जों आनंद के भी पार है, जो सारी अभिव्यक्तियों के पार है! रामकृष्ण ने जो वचन, पहला वचन बोला छ: घंटे के बाद वह यही था : आज अंतिम बाधा गिर गई। बहुत -बहुत धन्यवाद दिया तोतापुरी को कि तुम्हारी करुणा अपार है। आज अंतिम बाधा गिर कई! आज आखिरी सीढ़ी पार हो गई। चाह भी छोड़नी होती है। वही कठिनाई है।
 *सोमू*🙏🏻

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १९ जुलै 🙏

*‌‌।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १९ जुलै  🌸*

*साधनाची  चार  अंगे .*

मी जेव्हा भजन करीत असे, त्या वेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे. तसे तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे, आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी तुम्हाला सांगतो आहे. 

प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत ते हुडकून काढावे आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. 
प्रत्येकजण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून, दुसर्याच्या अवगुणांकडे किंवा दोषाकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, पण दुसर्याच्या डोळ्यातले कुसळसुद्धा मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते, हेच चुकते. आपण दुसर्याचे दोष सांगू नयेत, आणि परनिंदा करू नये.  

रोज निजण्याच्या वेळेस, आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज असे तुम्ही करीत जा,म्हणजे तीन महिन्यात तुमचे चित्त शुद्ध होईल.

चित्तशुद्ध होण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत ? आपण पाहू गेलो तर संत आपल्याला ओळखता येतील का ? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का ? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे. अशा वेळी दासबोध हाच संत होईल. 
समर्थांनी सांगून ठेवले आहे की, जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संग घडेल.
आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात, तेच ते होत असे समजावे. 

त्यांनी चार गोष्टी करायला सांगितल्या आहेत : 
एक, निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी. त्यानेच निर्गुणरहस्य कळेल. 
दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो.
तिसरी गोष्ट अन्नदान, कलियुगात यथाशक्ति अन्नदान करीत जावे. त्याचे महत्त्व फार आहे. 
चौथी गोष्ट म्हणजे भगवन्नामस्मरण अखंड ठेवणे. परमात्मप्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. 

संत भेटल्यावर, काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामा नये. ज्यांना ते वाटते, त्यांना गुरू भेटूनही भेट न झाल्यासारखेच आहे. 
आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली, अशी इच्छा का असावी ?
 गुरू एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते, त्यानेच गुरू भेटल्याचे सार्थक केले असे होते. गुरुआज्ञेपरते दुसरे त्याला साधनच नसते. तोच परमार्थ, आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखी काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानीमनीही येत नाही.

*२०१ .  अत्यंत  चिकाटीने  संतांचा  समागम  करावा ,  आणि  त्यांच्या  कृपेस  पात्र  व्हावे .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।‌।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - २० जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  २० जुलै  🌸*

*नामांतच  राहे  समाधान ।  ही  सद्‌गुरूची  आहे  खूण ॥*

रामापायी ठेवावे मन । त्यासी कर्तव्य नाहीं उरले जाण ॥
देहभोग आजवरी नाही सुटला कोणाला । त्याचा त्रास मात्र नाहीं रामभक्ताला ॥

तुम्हाला आता करण्याचेंच नाही काही । भाव ठेवा रामापायीं ॥
नामांतच राहे समाधान । ही सद्गुरूची आहे खूण ॥

रामास जावें अनन्य शरण । कृपा करील तो दयाघन ॥
देह सोडावा प्रारब्धावर । ज्या ज्या वेळी जें जें होईल तो मानावा आनंद ॥

दृश्याते नाहीं मानूं सत्य । रामरूपीं ठेवावें चित्त ॥
विषयासी नाही देऊं थारा । दया येईल रघुवीरा ॥

नाहीं देवाजवळ मागूं दुजें जाण । तुमचे नामीं लागो मन ।ऐसें प्रार्थिता जो झाला । राम कृपा करील त्याला ॥
नाहीं भंगूं द्यावें समाधान । रामापायीं ठेवावें मन ॥

लोभ्याच्या मनांत जसें वित्त । तसें साधकाचें नामांत चित्त ॥
एवढे ज्यानें केलें काम । त्याला नाहीं रामाचा वियोग ॥

पाण्यांवाचून जसा मासा तळमळतो । तसें नामाशिवाय व्हावें मन ॥

एक मानावी आज्ञाप्रमाण । नाहीं याहून दुसरें साधन जाण ॥
साधनाच्या आटाआटी । नाही देह करू कष्टी ॥

रामावांचून नाही कोणी सखा । त्याला नाहीं कोठें धोका ॥
प्रपंची ज्याचा राम सखा । भय चिंता दुःखनाहीं देखा ॥

रामसेवेपरतें हित । सत्य सत्य नाहीं या जगांत ॥

मनानें होऊन जावें भगवंताचे । त्यानें खास केलें सार्थक जन्माचे ॥

सर्व कर्ता राम । हा भरवसा ठेवावा ठाम ॥
राम कर्ता हा ठेवितां विश्वास । काळजीचें कारण उरत नाहीं खास ॥ 

रामरायाचें सान्निध्य राखता । भय, चिंता, शोक, यांची नाही वार्ता ॥
सतत करावें नामस्मरण । सर्व इच्छा राम करील पूर्ण ॥
 
नामाचें चिंतन, भगवंताचें ध्यान, गुरुआज्ञा प्रमाण ।तीच गुरुपुत्राची आहे खूण 
। नाहीं यावांचून दुसरें स्थान । जिथें राहे समाधान ॥

रामापायीं व्हावें लीन । याहून नाहीं दुसरें लिहिणें जाण ॥
आतां याहून दुजे नाही करणें काहीं । असा भाव ज्यानें ठेविला हृदयीं । त्याला राम नाहीं राहिला दूर ॥

रामाविण न मानावे हित । त्यानेंच जोडेल भगवंत ॥

नाहीं करूं देहाचा कंटाळा । राम ठेवील त्यांत राहावें सदा । 
जे जे होतील देहाचे हाल । ते ते परमात्म्यापासून आले असें जाणावें ॥
नाहीं करूं काळजीला । मी नाही सोडलें तुम्हांला ॥
ज्याची वाटते महति । त्याचेंच चिंतन होय चित्तीं ॥
रामावांचून न ठेवा दुजा भाव । चित्तास येईल तेथेंच ठाव ॥

देहासकट माझा प्रपंच जाण । हा रामा तुला अर्पण ।ऐसें वाटत जाणेंचित्तीं । कृपा करील रघुपति ॥

सर्व ठिकाणीं पाहावें अधिष्ठान । तेणें मिळेल मनास समाधान ॥

*२०२ .  रामापायीं  ठेवा  मन ।  नाम  घ्यावें  रात्रंदिन ॥*

 *।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Friday, July 19, 2019

Osho on Ramana Maharshi and the Enlightened Cow

Osho on Ramana Maharshi and the Enlightened Cow ❤️

"One of the greatest enlightened men was Raman Maharshi, in South India, on the mountain of Arunachal. He was not a man of many words; he was not very educated either. He was only seventeen when he escaped into the mountains in search of himself. He was a very silent man, and people used to go particularly to have a taste of his silence.

One thing very miraculous was watched by every comer: whenever he sat in the veranda of the temple, waiting for people who wanted to sit with him in silence, a cow used to come without fail, exactly at the right time. She would sit there, and people could not believe it: "What kind of cow is that?" And when Raman Maharshi moved inside his room, and everybody dispersed, the cow would come close to the window and put her head inside -- just to say goodbye, every day. And then she would go back. Then tomorrow she would come again.

It went on continually for years. But one day she did not turn up, and Raman Maharshi said, "She must be either very ill or she must be dead. I must go in search of her."

The people said, "It doesn't look right for a man of your heights to go in search of a cow." But Raman Maharshi did not listen to the people, he went. People followed, and the cow was found. She had fallen in a ditch.

She had become old. She was coming, she was on the way, but she had slipped and had fallen into the ditch.

But she was still alive, and as Raman Maharshi reached her, sat by her side, the cow had tears in her eyes. And she put her head into Raman Maharshi's lap and died.

Raman Maharshi told his people, "A great temple should be made in her memory here, because she has died enlightened -- she will not be born even as a human being." And even today the temple stands there, with a statue of the cow inside.

Perhaps we have not made much effort to communicate with animals, with trees, with mountains, with rivers. Certainly their language cannot be our language; some other ways have to be found. But in silence many people have experienced a harmony with the trees, with the animals, with the birds.

So it is not only a parable, it is also an indication of a possibility for the future. Man just has to explore... there is so much to explore! But we are engaged in trivia. We are not concerned with the real and great values of life. We are not concerned even with life itself and its different forms. All these are different forms of the same life which we are made of -- the same stuff. There must be some way of communion."

OSHO
Zarathustra: The Laughing Prophet

Thursday, July 18, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १८ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १८ जुलै  🌸*

*साक्षित्वाने  राहाणार्याला  दुःखाची  बाधा  नाही .*

देहबुद्धी आहे तोवर, म्हणजे 'मी देही आहे' ही भावना आहे तोपर्यंत, काळजी राहणारच. काळजी मनातून असते. जोवर संशय फिटत नाही, 
परमेश्वराचा आधार वाटत नाही, तोवर काळजीही मनाला सोडीत नाही.

कुंडलीतल्या ग्रहांच्या अधिकाराची मर्यादा देहापर्यंतच आहे. पैसा किती मिळेल हे त्यावरून सांगता येईल, भगवंताकडे किती कल आहे हे सांगता येईल, पण भगवंताची प्राप्ती होईल की नाही हे सांगता येणार नाही. 

मनुष्यजन्म येऊनही भगवंताची प्राप्ती नाही झाली, तर जिवाचे फार नुकसान आहे. भगवंताच्या प्राप्तीची मनापासून तळमळ लागायला पाहिजे. एकदा का अशी तळमळ लागली की मनुष्य वेडा बनतो, आणि कोणी संत भेटला की निवांत होतो. 

संत आपल्यावर येणारी संकटे नाहीशी करीत नाहीत, तर त्या संकटांची भिती नाहीशी करतात. 
संकटापेक्षा संकटाची भितीच आपल्याला फार घाबरवून सोडते.

 'आपल्याला हे कळले ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या,' असा संतांचा एकच हेतू असतो. 
संत विषयावर मालकी गाजवितात. जगाला जिंकणे एक वेळ सोपे, पण स्वतःला जिंकणे कठीण आहे. संत स्वतःला जिंकून जगात वावरत असतात.
 संत साक्षित्वाने जगात राहतात, आणि साक्षित्वाने राहणाऱ्याला दुःखाची बाधा होत नाही. 

संतांच्या संगतीत राहून, त्यांच्या आज्ञेत राहून, आपण आपल्या मनातले सर्व संशय नाहीसे करावेत. 
वास्तविक, संतांच्या आज्ञेचे एकनिष्ठपणाने जो पालन करतो, त्याचे संशय आपोआप दूर होतात. 
जोवर संशय आहे तोवर असमाधान आहे. समाधान हे आपले आपल्यालाच घ्यायचे असते. म्हणून ज्याला समाधानी राहायचे आहे, त्याने फार धडपड करू नये.जशी स्थिती येईल त्या स्थितीत समाधानात राहावे.

कचेरीचे विचार आपल्याबरोबर घरी आणू नयेत; ते तिथेच ठेवावेत. घरातले वातावरण शुद्ध आणि निःसंशयाचे असावे. 
भोळेपण एक प्रकारे चांगले; ती भाग्याची गोष्ट आहे. जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगी भोळेपण असते; जसे कल्याणस्वामींच्या अंगी होते.

 झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच आनंद आहे; पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता, भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे. 
म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते. त्या वेळी शरीरसुद्धा बरे राहायला, आनंद हे फार मोठे औषध आहे. 
हसावे, खेळावे, लहान मुलांत मिसळावे, थट्टा-विनोद करावा; काहीही करावे पण आनंदात राहावे. ज्याचा आनंद कायम टिकला, त्याच्याच जन्माचे सार्थक झाले.

*२०० .  समाधान  ही  परमेश्वराची  देणगी  आहे .  ती  मिळविण्याचा  उपाय  म्हणजे  भगवंताचे  स्मरण  होय .*

*।। श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Wednesday, July 17, 2019

33 meanings of the word ‘guru’

On the occasion of #GuruPurnima, know 33 meanings of the word 'guru' as explained in various Sanskrit texts.

Pranama‑s to all guru‑s and best wishes to all on Guru Purnima.

Meaning #1: "one who swallows ignorance"
Meaning #2: "one who teaches 'dharma' and scriptures like Veda‑s"
Meaning #3: "one who is praised by gods, 'gandharva'‑s, humans, etc."
Meaning #4: "one who destroys darkness with brilliance"
Meaning #5: "one who removes the disease of worldly existence"
Meaning #6: "one who is beyond [three] qualities and form"
Meaning #7: "one who releases from the bondage of 'maya'"
Meaning #8: "Brahma (the creator)"
Meaning #9: "Vishnu"
Meaning #10: "Shiva"
Meaning #11: "Supreme Brahman"
Meaning #12: "Brihaspati, the teacher of the gods"
Meaning #13: "Prabhakara, the teacher of Mimamsa philosophy"
Meaning #14: "Drona, the teacher of the Pandava‑s and Kaurava‑s"
Meaning #15: "one who performs 'nisheka' rituals (garbhadhana etc.)"
Meaning #16: "one who gives a mantra"
Meaning #17: "the father"
Meaning #18: "any of eleven male elders"
Meaning #19: "any of the elders"
Meaning #20: "one who is great"
Meaning #21: "one who is ageless"
Meaning #22: "one who is large"
Meaning #23: "one who is powerful"
Meaning #24: "one who is honourable"
Meaning #25: "one whose speech has profound meaning"
Meaning #26: "heavy"
Meaning #27: "Shiva, who grants 'siddhi'‑s and burns sins"
Meaning #28: "the illuminator of truth who bestows oneness with Shiva for the attainment of 'jnana'"
Meaning #29: "abundance"
Meaning #30: "a long syllable"
Meaning #31: "the 'pushya' constellation"
Meaning #32: "the velvet bean creeper ('Mucuna pruritus')"
Meaning #33: "the foxtail millet grass ('Panicum italicum')"

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १३ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १३ जुलै  🌸*

 *देव  आणि  नाम  भिन्न  नाहीत .*

आपल्या अनुभवाला येईल तेच खरे जरी असले, तरी आपण त्या प्रमाणे वागतो का ? पुष्कळ गोष्टी वाईट आहेत असे आपल्या अनुभवाला येते, परंतु त्या करण्याचे आपण टाळतो का ? हाच तर आपला दोष आहे. 
थोर पुरुषांचे मात्र तसे नसते. त्यांना जे अनुभवाला आले ते त्यांनी आचरणात आणून दाखविले, आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले. 

खरोखर संतांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत ! 
जगातले सुख हे खरे सुख नव्हे, दुःखानेच सुखाचा घेतलेला केवळ वेष आहे तो, असे जेव्हां त्यांच्या अनुभवास आले, तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरविली आणि खर्या सुखाच्या शोधाला ते लागले. 
परमेश्वर प्राप्तीतच खरे सुख आहे, असे त्यांना आढळून आले. त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचे नाम. हेच, वेदकाळापासून तो आतापर्यंत सर्व साधुसंतांनी अनुभव घेऊन सांगितले आहे. 

सद्गुरूकडून मिळालेले ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तिने आणि एकाग्रतेने घेतले, तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो, असा सर्व संतांनी आपला अनुभव कंठरवाने सांगितला आहे.
आपण तसे नाम घेतो का ? नामाकरिता नाम आपण घेतो का ? का मनात काही इच्छा, वासना ठेवून घेतो ? 

कोणतीही वृत्ती मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच; नाम म्हणजे देव आणि देव म्हणजेच नाम. एकदा मुखात आले म्हणजे देव हातात आलाच. 
मुले पतंग उडवितात, एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो. तरी तो पतंग उडविणारा म्हणतो, 'माझ्या हातात आहे पतंग.' कारण पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो. 
जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे, तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला. 

आपल्या नामस्मरणाला एक गोष्टीची अत्यंत जरूरी आहे. आपल्या जीवनात परमेश्वरावाचून नडते असे जोपर्यंत आपल्याला वाटत नाही, तो पर्यंत आपले नामस्मरण खरे नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही, अशी वृत्ती बाणल्यावर होणारे नामस्मरण तेच खरे नामस्मरण. आपली स्थिती तर याच्या अगदी उलट ! परमेश्वरावाचून आपले कुठेच अडत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो. मग परमेश्वर तरी कसा येईल ? 
परमेश्वराचे नाम हेच आपल्या जीवनाचे सर्वस्व समजून नाम घेतले, तर जीवनाचे सार्थक झाल्यावाचून राहणार नाही. 
नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी. अशा नामालाच 'निष्ठेचे नाम' असे म्हणतात.

*१९५.  भक्त,  भगवंत  व  नाम  ही  तिन्ही  एकरूपच  आहेत.  जेथे  नाम  आहे  तेथे  भक्त  आहे,  व  तेथेच  भगवंत  आहे .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १४ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १४ जुलै  🌸*

*गुरू  सांगेल  तेच  साधन.*

परमार्थ म्हणजे काय, हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. परमार्थाचे जर काही मर्म असेल तर, आसक्ति सोडून प्रपंच करणे हे होय.
ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले,म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही. हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे. 

गुरु कुणाला करावे ? जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद कुठेही एकच असते. 
गुरूला कोठे आडनाव असते का ? गोंदवलेकर गोंदवल्यास राहात असतील, दुसरा कोणी आणखी कोणत्या गावी राहात असेल. म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्वकाळी अबाधित असेच असते.

 तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरू समजा, आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा; त्याच्या देहाकडे पाहू नका. तो लुळापांगळा आहे की काय, हे पाहू नका. तो देहाने कसाही असला, तरी त्याने सांगितलेल्या साधनात राहा.
त्याची लाज, जिथून गुरुपद निर्माण झाले, त्याला असते. गुरुआज्ञा हाच परमार्थ; तो सांगेल तेच साधन. 

तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात, तर त्यात तुम्हाला यश येणार नाही. 
अभिमान धरून काही करू लागलात, तर ते साधणार नाही. म्हणून अभिमान सोडून गुरूकडे जा. गुरू सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा.

खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो स्वतःकरता आहे. 
आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल, तितका आपल्याला फायदेशीर आहे. जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही. खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे, हा तर मोठा घात आहे. 

एकाने कोळश्याचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले; दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्त्व आहे. तसे, प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्त्व नसून, मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्त्व आहे. 

परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते. आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे. एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला, म्हणजे परमार्थ लवकर साधतो. 

खरोखर परमार्थ इतका सोपा आहे, की तो सहज रीतीने करता येतो. पण गंमत अशी, की तो सोपा आहे म्हणून कुणीच करीत नाही. 

प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही, तो परमार्थासाठीच आहे, हे पक्के लक्षात ठेवावे. 
साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून, मनाने मात्र ईश्वरोपासना करावी.

*१९६.  हृदयी  ठेवा  राम ।  मुखी  सदा  त्याचे  नाम । हातात  असावे  प्रपंचाचेकाम ।  हेच  खरे  परमार्थाचे  मर्म ॥*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩*🌸 प्रवचने :: १५ जुलै 🌸*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १५ जुलै  🌸*

*तळमळ  लागल्यावर  गुरुभेट  निश्चित  !*

काय करावे हे मनुष्याला कळते, पण त्याचे मन त्याला आवरत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यामध्ये रंगून जाते, आणि त्याचे सुखदुःख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्टासारखी चित्तवृत्ती होते. 

आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत : एक सद्विचार, दुसरी नामस्मरण, आणि तिसरी सत्संगती. 
संत ओळखणे फार कठीण आहे. आपण त्याच्यासारखे व्हावे तेव्हांच तो कळायचा. त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे. 
भगवंताचा विचार तोच सुविचार होय. भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत, पण याहीपेक्षा, आपल्याजवळ राहणारे असे त्याचे नाम घ्यावे. 
तुम्ही नेहमी नाम घेत गेलात, तर तुम्हाला संत धुंडीत जाण्याची जरूर न पडता, संतच - अगदी हिमालयातले संत, तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील. अहो, खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको !

 तुम्ही म्हणाल, 'आम्हाला ते करता येत नाही.' पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो, आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला, तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही ? त्याला एखादी विद्या आली नाही, तर दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही ? आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागतेच की नाही ? तशी परमेश्वर मिळावा म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का ? 
तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरू प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तो सारखा तुमच्याकरिता वाट पाहात असतो. 

आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंत, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करील; पण गुरू हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला, तरी तो नाही असे समजू नका. 

तुम्ही दुश्चित्त झाला म्हणजे तो दुश्चित्त होतो. म्हणून तुम्ही केव्हांही दुश्चित्त होऊ नका. देहाचे भोग येतील-जातील, पण तुम्ही सदा आनंदात राहा. 
तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका. गुरुभेट झाली म्हणजे तुम्ही तुम्हीपणाने उरतच नाही. मात्र, गुरूला अनन्य शरण जा. 

एक शिष्य मला भेटला, तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. मी त्याला विचारले, "तुला एवढा कसला आनंद झाला आहे ?" त्यावर तो म्हणाला, "मला आता आनंदाशिवाय दुसरे काही उरलेच नाही, कारण मला आज गुरू भेटले !" जो असा झाला, त्यालाच खरी गुरूची भेट झाली. तरी, तुम्ही गुरूला अनन्य शरण जा, म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरूरी नाही.

*१९७.  भगवंताची  तळमळ  हा  साधकपणाचा  प्राण  आहे .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर🚩🌸 प्रवचने :: १६ जुलै 🌸*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १६ जुलै  🌸*
*गुरु  आज्ञापालनाशिवाय  दुसरे  कर्तव्यच  उरले  नाही .*

परमात्म्याकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत.  
आपल्या गुरूंनी जो राजमार्ग दाखविला त्यानेच जावे. मध्येच दुसरा मार्ग घेतला, तर पल्ला कधीच गाठायचा नाही. 
एका वैद्याचे औषध सोडून दुसऱ्याचे घेतले, तर पहिल्या वैद्याची जबाबदारी संपली. तरीही मी माझ्या माणसाला सोडीत नाही ही गोष्ट निराळी. 
ज्या दिवशी मी तुम्हाला अनुग्रह देऊन आपला म्हटले, त्या दिवशीच सर्व प्रापंचिक आणि पारमार्थिक जबाबदारी गुरूवर सोपवून तुम्ही मोकळे झाला, गुरुआज्ञेशिवाय तुम्हाला दुसरे कर्तव्यच उरले नाही. पण तुम्हाला असे वाटते कुठे ?
विष हे आमटीत घातले काय किंवा भाजीत घातले काय, दोन्ही त्याज्यच; त्याप्रमाणे अभिमान व्यवहारात असला काय किंवा पारमार्थिक साधनात असला काय, दोन्ही त्याज्यच.
 मी कोण हे आधी जाणले पाहिजे; परमात्मा कोण ते मग आपोआपच कळते. दोघांचेही स्वरूप एकच आहे, म्हणजे दोघेही एकच आहेत. 
परमात्मा निर्गुण आहे, आणि तो जाणण्यासाठी आपणही निर्गुण असायला पाहिजे. म्हणून आपण देहबुद्धी सोडली पाहिजे.
 कोणतीही गोष्ट आपण 'जाणतो' म्हणजे आपल्याला त्या वस्तूशी तदाकार व्हावे लागते; त्याखेरीज जाणणेच होत नाही. म्हणून परमात्म्याला जाणण्यासाठी आपणही नको का परमात्मस्वरूप व्हायला ? यालाच 'साधू होऊन साधूस ओळखणे' किंवा 'शिवो भूत्वा शिवं यजेत्' असे म्हणतात. 
आता, कोणत्याही वस्तूचा आकार आपल्याला प्राप्त होण्यासाठी आपल्याजवळ तत्सदृश असे संस्कार पाहिजेत. ते संस्कार त्या वस्तूच्या आघाताने प्रत्याघातरूपाने उद्भूत होतात; नंतर त्या वस्तूचे ज्ञान होते. म्हणून परमात्मरूपाला विरोधी असे संस्कार घालवून, आपण आपले अंतःकरण पोषक संस्कारांनी युक्त केले पाहिजे. 
जर आपण साधन करून निष्पाप होऊ शकलो, तर आपल्याला जगात पाप दिसणेच शक्य नाही.

देवाच्या गुणाने आणि रूपाने त्याचे गुण आणि रूप मिळेल, पण त्याच्या नामाने तो जसा असेल तसा सर्वच्या सर्व मिळतो. म्हणून नाम हे साधन श्रेष्ठ आहे.
 आपण भगवंताच्या नामात राहिले पाहिजे; त्यातच जीवनातले सर्व सुख सामावले आहे. याहून दुसरे काय मिळवायचे ? मी सुखाचा शोध केला, आणि ते मला सापडले. म्हणून मी तुम्हाला त्याचा निश्चित मार्ग सांगेन. तो मार्ग म्हणजे, भगवंताचे अनुसंधान होय. 
मी अत्यंत समाधानी आहे, तसे तुम्ही समाधानी रहा. जे मी सुरुवातीला संगितले तेच मी शेवटी सांगतो : तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे. नामात शेवटचा श्वास गेला पाहिजे. याहून दुसरे काय मिळवायचे ?

*१९८.  आपल्याकडून  होईल  तेवढे  नाम  घ्यावे .  न  होईल  त्याचा  राम  कैवारी  आहे .*

*‌।‌।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

Friday, July 12, 2019

महायोगातील अवस्था

महायोगातील अवस्था
     महायोगाच्या आरंभावस्था, घटावस्था, परिचयावस्था आणि निष्पत्ती अशा चार अवस्था आहेत.
    आरंभावस्थेत योगमाया, कुंडलिनीशक्ती प्रथम हठयोगाला आरंभ करते. त्यामुळे नानाप्रकारच्या शारीरिक क्रिया होऊ लागतात. त्यात निरनिराळ्या प्रकारची आसने, बंध, मुद्रा, प्राणायाम यांच्या योगाने नाडीशुद्धी होते. हठयोगाने शरीर परिपक्व होते, म्हणून शरीर स्वाधीन ठेवण्याचा उपयोग होतो.
    घटावस्थेत शरीर संपूर्ण शुद्ध व सत्त्वगुणयुक्त होते. विषयवासनेचा र्हास होतो. साधक पवित्र व प्रसन्न राहतो. शरीर आरंभावस्थेत दृढ होते; तर घटावस्थेत मन दृढ होते. म्हणून कुंडलिनी शक्तीचा ब्रह्मरंध्रात जाण्याचा मार्ग सुगम व सुलभ होतो. यानंतर साधकाला परिचयावस्थेची प्राप्ती होते.
    परिचयावस्थेत साधकाचा प्राण अनंताकाशात लीन होतो. हृदयाकाशात प्राणाला स्थिरत्व प्राप्त करवून, प्राणशक्ती कुंडलिनी सहस्रार चक्रात शिवाशी संलग्न होते. त्यामुळे जोपर्यंत प्राणाचा रोध असतो तोपर्यंत साधकाची शारीरिक अवस्था निष्क्रिय व निर्जीव होते. महायोगात ही अवस्था महत्त्वाची मानली जाते. असा साधक इच्छा झाली तर तो आपले सामर्थ्य कोणालाही देऊ शकतो. हृदयग्रंथी सुटून सर्व संशय दूर होतात. अशा योगाचे ज्ञान कोणत्याही आवरणाने झाकले जात नाही.
निष्पत्ती अवस्थेत महासिद्धी आत्मज्ञानाचा उदय होतो त्या वेळी सिद्धयोगी आपल्या जीवत्वाचा त्याग करून शिवतत्त्वाचा लाभ करून घेतात. या अवस्थेत योगी कुंडलिनीशक्तीला परमशिवात विलीन करण्याला समर्थ होतो. त्यामुळे साधकाला जीवन्मुक्त  अवस्था प्राप्त होते.
      साखर जरी पांढरी, मऊ आणि गोल या तीन गुणांनी एकच असते. त्याच प्रमाणे जे सत् तेच चित् तेच आनंदरूप असते. आत्म्याचा हा आनंद प्रकृतीच्या गुणांनी झाकला जातो. उपासनेत साधकाचा सत्त्वगुण वाढून रज, तम क्षीण होतात. सत् विद्या लाभून आत्मस्वरूपाकडे लीन झाली म्हणजे त्याला मीपणा उरत नाही. मीपणा गेला की अद्वैतानुभवाने केवळ परमानंद उरतो.
   सद्गुरूंचा कृपाप्रसाद असल्याशिवाय साधकाला यश मिळत नाही. कारण साधन करीत असताना त्याच्या अंगी नाना प्रकारच्या विलक्षण शक्ती येत असतात. त्याचा अंहकार व त्याची लौकिकाची आवड गेलेली नसते. म्हणून शक्तिरूपी सिद्धी अंगी प्रकटल्यावर त्याचा उपयोग न करता साधना चालू ठेवणे महाकठीण होते. या अडचणीत सद्गुरूंच्या चरणांचा आधारच कामास येतो, कारण साधनेत या सिद्धी  विघ्न आणून साधकाचे चित्त विचलित करतात. मनाने, कर्माने जो सद्गुरूंच्या कृपेचा आश्रय करतो तोच साधक नि:स्पृह राहू शकतो.
     कोणत्याही आध्यात्मिक उपासनेत परिपूर्णतेसाठी शक्ती जागरण हाच महत्त्वाचा भाग आहे. तिच्या जागृतीशिवाय सर्व प्रयत्न कष्टप्रद होतात. योगाभ्यासात शक्ती जागरण होऊ शकते. परंतु त्यातील निरनिराळ्या प्राणायाम, बंध आदि क्रियांतून झालेली बारीक चूकही अपायकारक ठरू शकते. मंत्रयोगात जोपर्यंत मंत्रप्रभावाने चैतन्य निर्माण होत नाही, म्हणजेच शक्तिपात होत नाही तोपर्यंत सर्व कष्टदायक ठरते.
    लययोग व राजयोगातही शक्ती जागरणाची प्रक्रिया आवश्यक आहे. म्हणजेच शक्तिजागृती ही आध्यात्मिक अनुभव व त्याची परिपूर्णता येण्यासाठी आवश्यक आहे.
या सर्वांचा विचार करता शक्तिपात योगाचा गीतोक्त, शास्त्रोक्त, वेदप्रतिपाद्य प्रत्यक्ष अनुभव देणारा व कांहीही न करता होणारा सोपा असा मार्ग अवलंबिणे प्रशस्त ठरेल.

प्रारब्धशुद्धी

*✍🏼||प्रारब्धशुद्धी||*

🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀

आध्यात्मात प्रगती करायची असेल, तर प्रथम प्रारब्धशुद्धी करावी लागते. 

प्रारब्ध  

केल्याशिवाय आध्यात्मात कधीही प्रगती होत नाही. प्रारब्धाचे मुख्य तीन मुख्य भेद आहेत.

||संचित||

मानवाच्या चित्तामध्ये पूर्वीच्या हजारो जन्मांचे संस्कार साठलेले असतात. त्याचप्रमाणे पूर्वीच्या हजारो जन्मांतील कर्माचे व वासनांचे गाठोडे या चित्तामध्ये साठलेले असते. या गाठोडयाला 'संचित' असे म्हणतात.

||प्रारब्ध||

संचितामधून या जन्मी जे काही मानवाने भोगायचे आहे त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. या प्रारब्धानुसारच माणसाला बुद्धी होत असते. म्हणून बुद्धिकर्मानुसारिणी म्हंटले जाते. 

||क्रियामाण||

या जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास 'क्रियामाण' कर्म म्हणतात. अर्थात, हे क्रियामाण कर्म पुन्हा संचितात जमा होत असते. व संचिताचे गाठोडे वाढतच असते. म्हणून प्रत्येक कर्म करतांना नीट विचार करून कर्म करावे व आपल्याला पाप लागणार नाही याची दक्षता घ्यावी.

संचित, प्रारब्ध, आणि क्रियामाण यांचे कार्य कसे चालते ते पुढील उदाहरणावरुन लक्षात येईल.
समजा, एखाद्या मनुष्याने त्याला आपण डॉक्टर व्हावे असे वाटू लागते. याला म्हणतात प्रारब्ध. हे प्रारब्धच त्याला डॉक्टर होण्याची प्रेरणा देत राहते व मला डॉक्टर व्हायचे आहे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण करते. डॉक्टर होण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु होतात. तो खुप मन लावून अभ्यास करु लागतो व एक दिवस डॉक्टर बनतो. याला म्हणतात 'क्रियामाण'.
आजही भारतात असे ज्योतिषी आहेत की, जे कुंडली पाहताच डॉक्टर होणार की, वकील होणार, इंजिनिअर होणार की, आचारी होणार, हे अचूक सांगतात. मानवी जीवनातील सर्व गोष्टी या प्रारब्धाधीन आहेत व आध्यात्मात प्रगती जर हवी असेल, तर मुळावर घाव घालणे अतिशय आवश्यक असते. ही प्रारब्धशुद्धी कशी करायची हे आता पाहूयात.

दररोज किमान दोन तास जप किंवा एखाद्या स्तोत्राचे पाठ करायला हवेत. (एक तास सकाळी व एक तास संध्याकाळी.) या साधनेने हळूहळू प्रारब्धशुद्धी व्हायला सुरवात होते.

||दान||

आपल्या उत्पन्नातील किमान २० टक्के रक्कम दानधर्मात खर्च करायला हवी. याने प्रारब्धाची शुद्धी होते व लक्ष्मी स्थिर होते. दानाने धनाची वृद्धी होते व केलेल्या कार्यात यश प्राप्त होते. वेद शास्त्रे व अठरा पुराणे या सर्वांमध्ये दानाचा महिमा वर्णन केलेला आहे.  सर्वसाधारण ईश्वरी महिमा असा आहे की, एखाद्या घराण्यामध्ये लक्ष्मी जास्तीत जास्त ६० वर्षे राहते. घराण्यातील पूर्वज जर जास्तच पुण्यवान असतील, तर लक्ष्मी ७५ वर्षांपर्यंतसुद्धा राहते. या कालावधीत पुण्याईचा क्षय होत असतो. घराण्यामध्ये कोर्ट-कचेऱ्या, भांडणे, कलह, पिशाच्च शक्तींचा उपद्रव, अशा प्रकारचे त्रास सुरु होतात. शेवटच्या १०-२० वर्षात सर्व संपूण जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूढता यांच्या खाईत ते घराणे लोटले जाते. लक्ष्मी निघून जाते व अहंकार, दारिद्र्य व दुर्गुण घराण्यात शिल्लक राहतात. धन, यश, किर्ती, ऐश्वर्य, विद्या, सत्ता, सौंदर्य, सामर्थ्य या सर्व गोष्टी पूर्वपुण्याइने प्राप्त होत असतात व पूर्वपुण्याई ही दैनंदिन मानवी जीवणामध्ये रोजच खर्च होत असते. याकरिता पुण्याई सतत वाढवीत राहणे आवश्यक असते. ईश्वरचिंतन व दान याने पुण्याई वाढत राहते. म्हणून सतत ईश्वरचिंतन व दान करत राहायला हवे. 
धनवानांनो ! या चंचल लक्ष्मीवर कधीही विश्वास ठेवू नका. अहंकार, घमेंड, स्वार्थ व लोभ अशा अनेक दुर्गुणांना बरोबर घेऊन ही लक्ष्मी आपल्या घरी येते. व ती जेव्हा जाते तेव्हा अनेक दुर्गुणांना आपल्या घराण्यात सोडून जाते, असे विद्वान लोकांचे म्हणणे आहे; परंतु खरी गोष्ट अशी आहे की, अपुऱ्या पुण्याईमुळे धन आल्यानंतर माणसाला अहंकार होतो व अहंकार सर्व दुर्गुणांना जन्म देतो. भरपूर पुण्याई असेल, तर खऱ्या अर्थाने लक्ष्मी प्रसन्न होते व लक्ष्मी प्रसन्न झाली असता ऐहिक, पारमार्थिक उन्नती होते. 

||निरपेक्षता||

अपेक्षा हे सर्व दुःखांचे मूळ आहे. कोणाकडून कसलीही अपेक्षा करु नये. अगदी परमेश्वराकडून कसलीही अपेक्षा करु नये. आध्यात्मात प्रगती होण्यासाठी निरपेक्षता या गुणाची जोपासना करणे अत्यंत आवश्यक असते. निःस्वार्थ बुद्धी जेव्हा परिपक्व होते. तेव्हा तिला निरपेक्षता म्हणतात. निरपेक्षतेने अखंड समाधान प्राप्त होते. अन्तःकरण इतके विशाल होते की, प्रत्यक्ष परमेश्वर ह्रदयात येऊन राहतो. अशा विशाल हृदयाच्या भक्तांविषयी श्री ज्ञाणेश्वर माऊली म्हणतात.....

ययापरी पार्था | माझिया भजनी आस्था || तरी तया ते मी माथा | मुकुट करी ||

अथवा

देखे साधक निघोनी जावे | मागा पाउलांची ओळ राहे || तेथे ठायी ठायी होये | आणिमादिक |

   💐💐💐💐💐

आजपासून चातुर्मास सुरू होतोय

//जय जय रामकृष्ण हरि //
आजपासून चातुर्मास सुरू होतोय.
देवशयनी एकादशी. 
देव झोपतात, चार महिने !  ही आमची श्रद्धा ! 
कार्तिकी एकादशीला देव जागे होतील.
तोपर्यंत काय करायचे भक्तांनी ? 
स्वतःचे रक्षण आता स्वतःच करायचे.
घरातील जाणता मनुष्य जर झोपला असेल तर त्याची झोपमोड होऊ नये म्हणून बाकीची मंडळी दक्षता घेत असतात. ( अशी दक्षता घ्यायची असते..... हे आताच्या पिढीला सांगायला हवंय) 
कुणाचीही झोपमोड होऊ नये म्हणून आपण किती काळजी घेतो ना ? जरा सुद्धा आवाज होणार नाही याची काळजी घेतो. पावलांचा, बोलण्याचा, भांड्यांचा, गाण्याचा, मोबाईलचा.....
का ? 
तर, "तो" उठेल. आत्ताच कुठे डोळा लागलाय. झोपूदेत ना जरा. नऊ महिने एवढे काम केलंय, आता चार महिन्याची विश्रांती. 

12 महिन्यातील चार महिने विश्रांती घ्यायची असते, हे भगवंत सांगताहेत.

यातलं गणित लक्षात येतंय का ? 
12 महिन्यातील 4 महिने विश्रांती म्हणजेच 12 तासात 4 तास. आणि 24 तासात 8 तास विश्रांतीचे ! 

जुळतंय की नाही अध्यात्म आणि आरोग्य !  

ही विश्रांती अत्यंत आवश्यक असते. सुतार आपल्या हत्यारांना धार लावण्यासाठी काही काळ आपले मुख्य काम थांबवतो, तो टीपी नसतो, पुढचं काम चांगलं होण्यासाठी ती छोटी विश्रांती आवश्यकच असते. एवढं लक्षात ठेवूया......

पण आजच्या लेखनाचा उद्देश जरा वेगळाच आहे. 
देव झोपलेत, मग आपली जबाबदारी वाढली नाही का ? 
अध्यक्ष हजर नसतील तर उपाध्यक्ष कार्यवाह यांची जबाबदारी वाढतेच ना ! तस्संच आहे. या देवांचे छोटे रूप, प्रतिरूप म्हणजेच आपण. स्वतः ! तो परमात्मा मी आत्मा ! परमात्माच जर झोपला असेल तर आत्म्याची जबाबदारी वाढणारच ना ! त्यांची सर्व कामे आता आपल्यालाच पार पाडावी लागणार. आता आपल्यालाच परमात्मा व्हावे लागणार. 
जर परमात्मा व्हायचे असेल तर त्याचे गुणदोष अभ्यासावे लागणार. ( चुकलंच. फक्त 'गुणच' ! कारण "तो" पूर्ण आहे ना, त्याच्याकडे 'दोष' असणारच नाहीत. )
आणि आपल्यातील दोष काढून टाकावे लागणार. 

यासाठीच तर आहे, 
*चातुर्मास संकल्प !* 
आपले आरोग्य शंभर वर्षे टिकून रहावे, यासाठी काहीतरी योग्य विचार करावा लागेल...
यासाठी ही चार महिन्यांची विश्रांती ! 
पुनः नव्याने, आपलं काय चुकतंय हे शिकण्यासाठी ! 
आधी आणावा लागेल *संयम*
त्यासाठी करावा लागेल *संकल्प*
संकल्पपूर्तीसाठी करावे लागेल *तप*
मिळवायचंय *वैराग्य*
कारण.....
उपभोग घ्यायचाय *आयुष्याचा*
आणि मिळवायचाय *आनंद*
*शाश्वत आनंद*
कुछ पाने केलिए कुछ खोना पडता है, कुछ छोडना पडता है ....

या निमित्ताने काही संकल्प करावेत  !
मनावर संयम येण्यासाठी 
इंद्रियावर संयम येण्यासाठी 
अवयवांना ताब्यात ठेवण्यासाठी 
शतायुषी होण्यासाठी 
केवळ शतायुषी नव्हे, तर औषधांशिवाय शतायुषी होण्यासाठी ! 

अध्यात्मिक ग्रंथात अनेक संकल्प दिलेले आहेत, वांगी, पावटे, गाजर, बीट, हरभरे, गहू, पडवळ, कांदा, लसूण, मटण, चिकन, मासे, इ.इ.  खाऊ नयेत, आपल्याला ही सगळी यादी वाचली तर प्रश्न पडतो, मग खायचे काय ? कारण आपण एवढे विषयाच्या आहारी गेलेलो आहोत, की क्षणभर सुद्धा हे विषय बाजूला जाऊ नये असे आपल्याला वाटते. हे पदार्थ बंद करायचे म्हणजे शक्यच नाही असे वाटते, हा *मोह*. जीभेला मोह आहे.
जीभ हा एकमेव अवयव असा आहे, जो ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय. म्हणून एका जीभेवर संयम ठेवला तर ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये ताब्यात येतात. 
यातून जे मिळते त्याला म्हणतात *वैराग्य*  इंद्रियांचे विषय त्यांना उपभोगायला द्यायचे नाहीत, समोर असून खायचं नाही, उपभोग घ्यायचा नाही,  हा संयम येण्यासाठी *चातुर्मास* करावा. आपल्याला जसा जमतोय तसा करावा, एखादी गोष्ट भगवंतासाठी सोडावी, फक्त चार महिने.
शारिरीक आणि मानसिक आरोग्याचा विचार केला तर काही संकल्प सुचवतो.
बघा, एखादा संकल्प फक्त चार महिन्यांसाठी करायला झेपतोय का ?
* कोणताही एक आवडीचा खाद्यपदार्थ सोडणे.
* आठवड्यातून एक दिवस मौनात रहाणे.
* नियमितपणे बारा सूर्यनमस्कार घालणे.
* बारावेळा लोटांगण, बारा प्रदक्षिणा.
* रात्रीचे जेवण सूर्यास्तापूर्वी करणे.
* हाॅटेलिंग / विकतचे बाहेर खाणे बंद.
* बेकरी पदार्थ विकत घेणे बंद.
* जाणीवपूर्वक दररोज एका गरजूला मदत करणे.
* दररोज सत्पात्री दान करणे.
* कोणत्याही आध्यात्मिक ग्रंथाचे नियमितपणे वाचन करून त्यावर दिवसभर चिंतन करणे.
* जागेपणी ठरवून घेतलेल्या वेळेत मोबाईलला हातही न लावणे.
* कोणाही एका नवीन व्यक्तीला योग शिकवणे
* स्वतःचे जेवलेले ताटवाटी कप ग्लास धुवुन ठेवणे.
* घरातील दोन कामे, जी आधी करत नव्हता, ती जाहीरपणे करणे.
* जेवताना शिजलेल्या अन्नाची निंदा न करणे
* अन्न ताटात न टाकणे.
यासारखा आणखी कोणताही एक संकल्प आपण ठरवून तो घरात जाहीर करावा, म्हणजे तो पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू होतील.
आपली सेवा पांडुरंगा चरणी नक्की कामी येईल, असा विश्वास आहे.
पांडुरंग हरि वासुदेव हरि
वैद्य सुविनय दामले कुडाळ सिंधुदुर्ग 
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Ask permission & communicate with God

Ask permission.

Before cutting the branch of a tree or removing a flower, tell the spirit of the tree or plant what you are going to do, so that they can withdraw their energy from that place and not feel the cut so strong.

When you go to nature and want to take a stone that was in the river, ask the river keeper if he allows you to take one of his sacred stones.

If you have to climb a mountain or make a pilgrimage through the jungle, ask permission from the spirits and guardians of the place. It is very important that you communicate even if you do not feel, do not listen or do not see. Enter with respect to each place, since Nature listens to you, sees you and feels you.

Every movement you make in the microcosm generates a great impact on the macrocosm.

When you approach an animal, give thanks for the medicine it has for you.

Honor life in its many forms and be aware that each being is fulfilling its purpose, nothing was created to fill spaces, everything and everyone is here remembering our mission, remembering who we are and awakening from the sacred dream to return home.

Thursday, July 11, 2019

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - ७ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  ७ जुलै  🌸*

*मूल  होऊन  भगवंतापाशी  जावे .*

या जगात कर्माशिवाय कोण राहतो ? पण कर्म यथासांग होत नाही याचे कारण, आपण कर्म कशाकरिता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही. मालक पाठीशी असला की कर्म करणाऱ्याला जोर येतो. काही चांगली कर्ममार्गी माणसे भक्तिमार्गी लोकांना नावे ठेवतात. भक्तिभावाने जो राहतो तो दुसऱ्याला नावे ठेवीत नाही. 

'मी कोण' हे जाणायला ज्ञान आणि भक्ति लागतेच. तसेच, 'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या' म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते. उपासना भगवंताला ओळखून करावी. 

लहान मूल आईकडे डोळे करून मुकाट्याने दूध पिते, त्याप्रमाणे समर्थांसारख्यांनी जे सांगितले ते आम्ही निमूटपणे करावे. डोळे मिटून जितके काम होईल, अंधश्रद्धेने जे होईल, ते अभिमानाने, ज्ञानाचे डोळे उघडे ठेवूनही नाही होणार. मूल होऊन भगवंताला ओळखावे. याला अडचण एकच असते; माझे 'शहाणपण' आड येते. भक्त मुलांसारखे वागतात देव त्यांचे लाड पुरवितो. कुणी असे म्हणतील की, "भगवंताची आणि आमची ओळख नाही, तर त्याची आम्ही कशी पूजा करावी ?" "त्याला ओळखल्या शिवाय मी भजन करणार नाही" असे म्हणणे वेडेपणाचेच आहे. 
भगवंताला पुष्कळ मार्गांनी ओळखता येईल. पांडुरंगाकडे जाण्यासाठी काही मार्ग आधी आक्रमणे जरूर आहे. 

संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला; तो असा की, देहाने प्रपंच करा, पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा. मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झाल्याशिवाय इतर काहीही करून उपयोग नाही.

ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे. 
प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. 'देव माझा आहे' असे म्हणण्या‍ऐवजी 'मी देवाचा आहे' असे म्हणावे, म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. समुद्राचा तरंग असतो, तरंगाचा समुद्र असतो असे नव्हे.

साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे; म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे. जशी श्रद्धा तशी फळे. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. प्रपंचात कधीच धीर सोडू नये. 

ज्याप्रमाणे मुंग्यांची राणी जागेवरून हलवली की तिच्यामागे असणाऱ्या हजारो मुंग्या तिच्याबरोबर नाहीशा होतात, त्याचप्रमाणे एक देहबुद्धी काढून टाकली, की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय.

*१८९.  भक्तिमार्ग  हा  प्रेमाचा  मार्ग  आहे .  प्रपंचाकडचे  प्रेम  भगवंताकडे  वळविले  की  भक्ति येते .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

श्री गोंदवलेकर महाराज प्रवचन - १२ जुलै 🙏

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

*🚩श्री  ब्रह्मचैतन्य  महाराज  गोंदवलेकर🚩*

*🌸  प्रवचने  ::  १२ जुलै  🌸*

*सद्गुरू  सांगेल  त्याप्रमाणे  वागावे .*

शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. 
भक्ति ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन-अर्चन केले, म्हणजे भक्ति निरपेक्ष केली असे नव्हे. 
देवाचे करीत असताना, जप करीत असताना,त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे.

तुम्ही सर्व लोक भजन पूजन करता, परंतु हे सर्व कसे होऊन बसले आहे? जसे भांडे कुठे ठेवावे, पळी ताम्हन कुठे ठेवावे, वगैरे जे शास्त्रात लिहिलेले असते ते सर्व, माणूस तोंडाने म्हणत असतो आणि करीत असतो. कारण त्यामुळे त्याला कृती करणे सोपे जाते. तसे आपण देवाचे करतो. परंतु ते केवळ केले पाहिजे म्हणून, ती आपल्या घरातली एक प्रथा आहे म्हणून; आपल्याला देव आवडतो म्हणून नव्हे. 

एक मुलगा होता, त्याला त्याच्या वडिलांची पत्रे येत असत. तो पत्र वाची आणि देव्हार्यात ठेवून देई. दुसरे पत्र आले की ते वाची, आणि मागले पत्र काढून टाकी. एकदा वडिलांनी पंचवीस रुपये मागितले. मुलाने ते पत्र वाचले आणि नेहमीप्रमाणे पूजेत नेऊन ठेवले. नंतर काही दिवसांनी वडिलांकडून एक गृहस्थ आला आणि म्हणाला, "तुला तुझा वडिलांचे पत्र मिळाले का ?" त्यावर तो म्हणाला"हो." त्यावर त्या गृहस्थाने विचारले,"अरे, मग पैसे का पाठविले नाहीस वडिलांना ?" त्यावर तो म्हणाला, "तेवढेच राहिले बघा !" तसे आपले होते. 

आपण कृती करतो, पूज्यभाव वगैरे ठेवतो, परंतु सद्गुरूने सांगितलेले तेवढे करीत नाही. त्यामुळेच आपली सत्कर्मे ही आपला अहंकार कमी व्हायला कारणीभूत न होता, उलट अहंपणा वाढवायलाच मदत करतात. म्हणून सद्गुरूने सांगितलेले साधनच आपण प्रामाणिकपणे, संशयरहित होऊन करावे. त्याकरिता व्यवहार सोडण्याची जरूर नाही.
आपण व्यवहाराला सोडू नये, पण व्यवहारात गुंतू नये. 

युद्धात सारथ्याच्या हाती सर्वकाही असते. तो लगाम हाती घेऊन जागृतपणे उभा असतो, आणि योग्य वाटेल तेथे रथ नेऊन उभा करतो. युद्धकर्त्याचे काम फक्त बाण अचूक दिशेला किंवा व्यक्तीवर सोडणे. त्याप्रमाणे, आपले सर्व जीवन एकदा सद्गुरूच्या ताब्यात दिल्यावर, तो सांगेल त्याप्रमाणे वागणे हेचआपले कर्तव्य ठरते.

ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच हे लक्षात ठेवावे. एखादा रुपया आपण उचलला तर त्याच्या दोन्ही बाजू जशा एकदमच येतात, त्याप्रमाणे आपण प्रपंचात पडलो की आपल्याला परमार्थ हा पाहिजेच.

 परमार्थात भगवंताची गरज असते. ही भगवंताची गरज, सद्गुरू त्याचे 'नाम' देऊन भागवितात. आपण हे नाम निरंतर आणि श्रद्धेने घेणे आवश्यक आहे. अशा रीतीने नामात अखंड राहिले तर परमार्थ साधतो, भगवंताची गरज भासते, प्रपंचात समाधान मिळते, आणि जन्माला आल्याचे सार्थक होते.

*१९४.  गुरूवर  विश्वास  ठेवून  चिकाटीने  व  आवडीने  नाम  घ्यावे .*

*।।  श्री  राम  जय  राम  जय  जय  राम  ।।*

उपयुक्त माहिती...

*उपयुक्त माहिती...*

*१) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?*

*उत्तर :-* ती यमाची मृत्यू ची दिशा आहे . यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.

 *२) स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये?*

*उत्तर :-* ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.

 *३) देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ?*

*उत्तर :-* ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी .

*४) शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी.*

*उत्तर :-* शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात .त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.

*५) एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?*

*उत्तर :-* प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून.

 *६) गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?*

*उत्तर :-* हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून ....

*७) शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत ?*

*उत्तर :-* शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून ..

*८) निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये ?*

*उत्तर :-* तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर तम तत्व वाढेल . राक्षसी संकटे येतील म्हणून .

*९) देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत ?*

*उत्तर:-* त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून ...

*१०) विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये ?*

*उत्तर :-* फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून ..

*११) शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये ?*

*उत्तर :-* शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून...
सर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते . सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन...
देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो . शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही . ती हिरण्यगर्भा आहे . ती प्रसूति वैराग्य आहे ..

*१२) आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये ?*

*उत्तर:-* त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते . ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो.

*१३) देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे.*

*उत्तर :-* हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत .
अंगठा -आत्मा/ 
तर्जनी -पितर/
मध्यमा-स्वतः/अनामिका -देव/करंगळी -ऋषी /
म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे...

*१४) समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत.*

*उत्तर :-* विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून......

*१५) अंगावर फाटलेला कपडा कधीही का शिवू नये.*

*उत्तर :-* पितराना दोष लागतो म्हणून .

*१६) उंब-यावर बसून का शिंकू नये.*

*उत्तर :-* उबरा हा मुळात बसण्यासाठी नाही तेथे सर्वतिर्थे बसतात. तिथे घराची सात्विक ऊर्जा स्तंभित असते शिंकेने तिला व्यास येतो त्यामुळे अपशकुन घडतो म्हणून..... घडल्यास पाणी शिंपडावे......

*१७) निजलेल्या माणसास का ओलांडून जावू नये.*

*उत्तर :-* झोपलेला शव असतो म्हणजे शिव असतो म्हणून ..

 *१८) मांजराना प्रेत ओलांडून का देवू नये.*

*उत्तर :-* प्रेत प्रेतच राहते म्हजे पिशाच्च योनित जाते त्याला मोक्ष प्राप्ती होत नाही म्हणून ..

*१९) रात्रीच्या वेळी मीठ किंवा उडीद का आणू नयेत किंवा दुस-यास का देवू नयेत ?*

*उत्तर :-* याच्यात करणीतत्व आहेत. आकर्षण क्रिया पटकन होते व बळीतत्त्व आहे म्हणून ....

 *२०) सायंकाळी केर का काढु नये?*

*उत्तर :-* लक्ष्मीला आवडत नाही .
लक्ष्मी हळूहळू निघून जाते व अलक्ष्मीला आवडते...

 *२१) रस्त्यात प्रेत दिसल्यास नेहमी नमस्कार का करावा.*

*उत्तर :-* शव= शिव म्हणून नमस्कार करावा....

*२२) कुणाच्या घरातून परत निघताना जातो असे न म्हणता येतो असे का म्हणावे ?*

*उत्तर :-* येणे घडते नाहीतर कायमचे जाणे होते...

*२३) एका हाताने देवाला नमस्कार का करू नये.* 

*उत्तर :-* दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो . पंचतत्त्वाचा नाही ...

*सर्वांना ही माहिती द्या..*

देवाशी संवाद


देवाशी संवाद ............

 *माणूस :*  देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का ?

 *देव :*  विचार ना .

माणूस :  देवा , माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास . असं का केलंस तू देवा ?

 *देव :*  अरे काय झालं पण ?

 *माणूस :*  सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला .

 *देव :*  बरं मग ?

 *माणूस :*  मग माझी स्कूटर पण चालू होत नव्हती . कशीबशी रिक्षा  मिळाली .

 *देव :*  मग ?

 *माणूस  :*  आज कँटीन पण बंद . बाहेर सँडविच खाल्लं . ते पण  बेकार होतं .

 *देव :*  (नुसताच हसला )

 *माणूस :*  मला एक महत्त्वाचा फोन आला होता . त्या माणसाशी बोलताना माझा फोनच बंद पडला .

 *देव :*  बरं मग

 *माणूस  :*  संध्याकाळी घरी गेलो तर लाईट गेली होती . मी इतका थकलो होतो की ए . सी . लावून झोपणार होतो .
का तू असं केलंस देवा माझ्या बरोबर ?

 *देव :*  आता नीट ऐक .
        आज तुझा *मृत्यूयोग* होता . मी माझ्या देवदूतांना पाठवून तो थांबवला . त्या गडबडीत अलार्म पण थांबला .

तुझी स्कूटर मी सुरू होऊ दिली नाही कारण स्कूटरला अपघात होणार होता .

कँटीनच्या जेवणातून तुला विषबाधा होणार होती . ते  सँडविच वर निभावलं .

तुझा फोन मी बंद पाडला कारण समोरचा माणूस तुला एका कारस्थानात अडकवणार होता .

संध्याकाळी तुझ्या घरी शॉर्टसर्किट होऊन आग लागणार होती म्हणून मी लाईट घालवली .

 *माणूस :*  देवा मला क्षमा कर .

 *देव :*  क्षमा मागू नकोस . फक्त विश्वास ठेव . माझ्या योजनांविषयी कधीच शंका घेऊ नकोस . आपल्या आयुष्यात जे बरं वाईट घडतं त्याचा अर्थ फार उशीरा लागतो आपल्याला 
 
आपण खरंच देवावर श्रद्धा आहे असं म्हणतो . 
मग *श्रवणाच्या* वेळी डुलक्या का येतात ? 
तीन तासाच्या पिक्चर मध्ये जराही झोप येत नाही . ...

आपल्या आयुष्याला सुंदर बनवणारे विचार आपण दुर्लक्षित करतो आणि 
नको ते मेसेज फॉरवर्ड करतो .....

      देवाशीच संगत केली तर आपल्याला एकटं का वाटावं

माणूस हा सवडीनुसार , वागत असतो ...!

चहात माशी पडली तर चहा फेकून देतो ,

 पण साजूक तूपात माशी पडली तर तो
         माशी फेकून देतो तूप नाही ..
              अगदी तसच ...

    आवडत्या माणसाने चूक केली तर
काहीही न बोलता ती पोटात घालतो पण

जर नावडत्याने केली तर आकांडतांडव
      करून बोभाटा करतो.  

 ' माझं ' म्हणून नाही " आपलं " म्हणून जगता आलं पाहिजे ...
जग खुप *' चांगलं '* आहे फक्त चांगलं *" वागता "* आलं पाहिजे ...
  
 सगळं विकत घेता येतं पण 
संस्कार नाही।

 *समुद्र* आणि *वाळवंट* कितीही आथांग आसले
तरी वाळवंटात आणि समुद्रात *पिक* घेता येत नाही 

देह सर्वांचा सारखाच।
फरक फक्त विचारांचा।

               🙏🏻 ** 🙏🏻