तो बाबा दिनरात जागाच आहे
हे कोणी विसरून चालायचे नाही llधृ.ll
माणसाला दिली वाणी आहे
भलत सलत ते बोलायचे नाही ll१ll
शंकरबाबा आहे एक कोडे
मूर्ख ठरती शहाणे, शहाणे ते वेडे
शहाणपण आपले बाजूला ठेवून
सद्गुरुपुढे वागायचे आहे ll२ll
जो आहे जातीने हरिजन
बाबा म्हणती तयासी बामन
नाते नाजूक घ्यावे समजून
ज्ञानी लोकांचे तुम्ही ऐकून ll३ll
शंकरबाबांचा परिवार मोठा
विविध भक्तांचा बाबांजवळ साठा
प्रत्येकाशी बाबांचे न्याते न्यारे
हे सारे समजून वागायचे आहे ll४ll
भावभक्ती गुरूंचा अलंकार
भक्त सारे बाबांचे जवाहीर
तोडुनि भक्तांची रत्नमाला
सोन्यामोत्यांनी सजवायचा नाही ll५ll
वेळ थोडा आणि करणे आहे फार
पूर्वकर्माचा शिरी आहे भार
गुरुभक्तांचा जमुनी सागर
त्या सागरात पोहायचे आहे ll६ll
चंदनाच्या परी झिजणे आहे
कर्मसुगंध पसरवायचा आहे
चंदनाचा बहुमान मोठा
शेकोटीवर ते जाळायचे नाही ll७ll
जरी समर्थ तो सद्गुरू आहे
तेथे भलत्यासलत्याला तोलायचे नाही
गुरुवचनावर चालायचे आहे
गुरुभक्तीशी खेळायचे नाही ll८ll
#जय_शंकरबाबा
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"