Monday, February 11, 2019

आवर रे निजमना!

आवर रे निजमना!
कुठे कुठे फिरशी तू
सावर रे निजमना!
धरुन रहा नामा तू

प्रतिभा नाही तुझी
प्रसाद तो स्वामींचा
कृपा जरी तुजवरती
चमत्कार स्वामींचा

नको उडू आकाशी
जमिनीवर रहा तू
भुलवतील जन सारे
नको भुलू मोहा तू

स्वामींचे नाम घेत
त्यां चरणीं हो नत तू
अंतर्नाद ऐकत
आत स्वामी बघ तू


श्री. मिलिंद द. करमरकर
३१-०१-२०१९     
 ( एकादशी)

*☘अनंतकोटी_ब्रम्हांडनायक☘*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"