Monday, February 11, 2019

स्थान माहात्म्य

*_स्थान माहात्म्य_*

*_हुमणाबादच्या माणिकनगर या दत्तस्थानाची महती श्रीमाणिकप्रभूंच्या मुळेच लोकांच्या ध्यानात आली. गुलबर्गा, कल्याण व बेदर या शहरांच्या त्रिकोणी भूभागास पूर्वी मणिचूल पर्वत असे नाव होते. 'मणिगिरी' असा उल्लेख, या भागाचा गुरुचरित्रकार करतात. 'वृषभाद्रि' असेही नाव या प्रदेशाचे कोठे कोठे आढळते. वीरशैव अथवा लिंगायत धर्मपंथाचे संस्थापक बसवेश्र्वर याच भागातले. इतिहासप्रसिद्ध चंद्रसेन जाधवाने वसविलेली जयसिंहपेठ पुढे हुमणाबाद या नावाने ओळखली गेली. सदानंद, पूर्णानंद, शिवरामस्वामी याच बसवकल्याणच्या परंपरेतील. याच पावनभूमीत श्रीमाणिकप्रभूंचे अवतारकार्य झाले. माणिकप्रभू हे दत्तावतारी म्हणून प्रसिद्ध असून संगीतादि कला आणि भौतिक ऐश्वर्य यांनी शोभणारा यांचा सकलमत संप्रदाय आहे. अनेक तीर्थक्षेत्रांची दर्शने घेत घेत प्रभू कल्याणहून मणिचूल पर्वताकडे आले. गोट्टमगोट्टीचे जंगल, करतनकल्लीच्या वक्क प्रभूंची समाधी, रेकुळीचा केतकीसंगम अशी काही स्थाने प्रभूंना तेथील एकांतामुळे आवडली. बेदर, झरणीनृसिंह ही स्थानेही प्रभूंना आवडली. बेदरहून प्रभू कल्याणाकडे जात असताना हुमणाबादेच्या ओढ्यावरून गडवंतीच्या वाटेस लागले. बाभळीच्या काटेरी झाडीत त्यांचा मेणा अडकला. त्यामुळे त्यांना हुमणाबादच्या जवळ संगमावरच राहावे लागले._*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"