मुखी उच्चार होता स्वामी नामाचा
नाद भरे आनंदाचा..
रुप ते अजानुबाहु
मन गाभारी नित्य पाहु..
ध्यास धरु स्वामींचा
सुख दु:ख त्यांच्या चरणी वाहु..
नाम रंगी रंगुनी जाऊ
वेलु फुलेल जीवनाचा..
जीवन अवघे धन्य झाले
स्वामी नाम मुखी आले..
स्वामीचरणी जडला ध्यास कायमचा
करुणाघन ती स्वामी माऊली
भक्तांसाठी धावुनी आली
सांभाळ करी निज भक्तांचा..!!
!!#अवधूत_चिंतन_श्री_गुरुदेव_दत्त !!
!!#दिगंबरा_दिगंबरा_श्रीपाद_वल्लभ_दिगंबरा !!
!!#श्री_नृसिंहसरस्वती_स्वामी_महाराज_की_जय_!!
#श्री_अक्कलकोट_सदगुरू_श्री_स्वामी_समर्थ_महाराज_कि_जय !!
!!#श्री_दत_जय_दत_सदगुरू_स्वामी_समर्थ_महाराज_की_जय !!
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"