⛳🌹🌿❣💲❣🌿🌹⛳
*साईनाथ गुणकिर्ती शतकपुर्ती [४३]*
बघता बघता झालेच एक वर्ष
गुणगाण गायले तुझ्याच कृपे
लिहता लिहविता स्वामीराया
लिखाण गुणवर्णन झाले सोपे..
तुच लावलेला बगीचा सुगंधी
मी तोडलेली सुमने काहीती
साधी सोज्वळ साईकिर्तीची
सुगंध पसरला अवतीभवती..
पाठवलेली अत्तरकुपी सुंदर
सुवास दरवळे सौम्यसा हिना
कुपी ती साईघरची संपुर्णम
तिथे माझे श्रेय काही नसेना..
कधी कोणी कौतुकले आनंदे
कोणी काही म्हंटले सुखावले
पण जाणीव मज मनी होती
हे साईंचें भावे त्यास अर्पियले..
लिहलेले काही स्तुतीबखान
ती प्रभुची प्रशंसा गुणकिर्ती
आदरीले आत्म्यातुन अमरा
निम्मित्त्य समाधी शतकपुर्ती..
जे जे पसंतसे पटले ते सारे
साकार साईंचीं असे लीला
कुठे चुकले ,न पटले तैसेते
क्षमा करतील साधक मला..
कधी लेख तर कविता केली
शब्दसुमनाजंली भावभक्तिने
वाह्यली पदांगुली अर्चनसेवा
निराजंनम निष्कपट निष्ठेने..
होई प्रसन्न देवराया मजवरी
शिरडीसी बोलावी देईदर्शन
अद्भुत अदृश्य गुढ अनुभुती
साक्षात् श्रीमुर्तीचे करी पुजन..
डोई ठेवली साईचरणयुगुली
पुनीत हस्त धरी मस्तकावरी
आर्शिवच वदावे विमलमुखे
चरणधुलीची इच्छा कर पुरी..
*साईनाथ गुणकिर्ती शतकपुर्ती*
*माधुरी ब्रह्मे-देशपांडे*
*षटतिला एकादशी*
*३१-१-१९-गुरुवार*
⛳🌹🌿❣💲❣🌿🌹⛳
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"