##... भाजलेले चणे... फुटाणे...
.. फुटाणे म्हणजेच भाजलेले चणे अतिशय पौष्टिक , बल दायि असतात. फुटाण्यात, मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, कँलशिअम, आर्यन, व विटामिन सी असतं याचे आरोग्याचे विपुल असे फायदे आहेत.
दररोज नाश्त्यात अथवा जेवणात आधि ५० ग्रँम फुटाणे खाल्याने रोगप्रतिकार क्षमता वाढते. आणि त्यामुळे अनेक आजारापासून रक्षण होते.
##लठ्ठपणा #ओबिसिटिः। जर तुम्ही लठ्ठपणामूळे ग्रस्त असाल तर भाजलेले चणे खाणे फायद्याचे ठरते रोज एक वाटाभर फुटाणे खाल्याने वजन कमी होते. आणि हलके वाटते, शरिरातिल अतिरिक्त चरबि निघून जाते.
##युरिनबद्दलसमस्याः ज्यांना सतत युरिनला जावे लागत असेल, जळजळ होत असेल, त्यांनि चणे व गूळ खावे एकत्रित काहि दिवसातच आराम पडतो.
##पाचनशक्तिवाढवतेः पचनसंस्था मजबूत होण्याकरता रोज चण्याचे सेवन करावे . बद्धकोष्ठ दूर होते कारण यात फायबर मुबल आहे, फुटाणे खाल्याने
रक्त शुद्ध होते त्वचा निकोप राहते चण्यात फाँस्फरस असतं ज्यामुळे हिमोग्लोबिनचि पातळी वाढते.
##मधूमेहावर गुणकारीः। भाजलेले चणे डायबिटिजच्या रूग्णांना लाभदायि आहेत. फुटाणे ग्लुकोजचि मात्रा कमि
करतात. व रक्तातलि साखर नियंत्रित ठेवतात.
हिवाळ्यात , थंडित, हरभर्याच्या पिठाचा हलवा थोडे दिवस नियमित खाल्यास संधिवात, गुडघेदुखि, सांधेदुखि असे सर्व वाताचे त्रास कमी होतात.
गर्भवतिला मळमळ होऊन उलटि होत असेल तर फुटाण्याचे सार, सूप करून पाजावे त्वरित आराम पडतो.
## ५० ग्रँम फुटाणे उकळून घ्या आणि त्याच उकळलेल्या पाण्यात बारिक करा, हे कोमट करून पिल्यास जलोदर, लिव्हर बद्दलचे सर्व आजार दूर होतात. असे एक महिनाभर करावे.
भाजलेले चणे रात्रि चावून खावेत आणि त्यानंतर गरम दूध प्यावे. या उपायाने श्वासाशि संबंधित रोग , कफ, दमा, अस्थमा, खोकला दूर होतो., बरा होतो.
## अनेक जण कँलशिअम वाढावे म्हणून तर्हैतर्हैच्या विटामिनच्या गोळ्या खातात, पण रोज तुम्हि मुठभर फुटाणे दररोज खाल्ले तर शरिराचि कँलशिअमचि कमतरता भरून निघते.
हाडे मजबूत होतात, शारिरिक श्रमामूळे किंवा मानसिक तणावामूळे मनुष्य वयाआधिच म्हातारा दिसतो , तेव्हा शारिरिक थकवा, व मानसिक थकवा, तणाव कमी करणारी तत्वे फुटाण्यात आहे. याचे
नियमित सेवन करावे., याने अनिद्रा दूर होते.
## पूर्वि पाहुण्याचे स्वागत गूळ फुटाणे देउनच करत. त्यामागचे कारण हेच कि, प्रवासाचा थकवा, दगदग, दूर होउन, तो शीण निघावा. गुळ फुटाणे हे अतिशय उत्तम
काँबिनेशन आहे, हे खाल्यास सर्वच विटमिन, मिनरल मिळतात.
गूळ फूटाणे दातांना सुरक्षित ठेवतात, यातिल फाँस्फरस दातांसाठि उपयोगि आहे. गर्भावस्थेनंतर स्रियांनि दररोज गूळ फुटाणे खावेत.
## गुळ फुटाणे खाल्याने बुद्धि तीक्ष्ण होते. यातील विटामिन बी स्मरणशक्ति वाढवते. यातिल पोटँशिअम हार्ट अटँकपासून रक्षण करते. ह्रुदय संबंधित समस्यांसाठी गूळ- फुटाणे उपयोगि आहेत.
...... अगदी माफक किंमतित उत्तम आरोग्य आपल्याला
सहज मिळू शकतं फुटाण्याचे दररोज सेवन केल्यास हे नक्कि....#*#*#*#...
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"