Wednesday, August 28, 2019

पिठोरी अमावास्या २९ व *अमावास्या (पोळा) ३० आॕगस्ट रोजीच*

🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉

📕 *पिठोरी अमावास्या २९ व दर्श*
   *अमावास्या (पोळा) ३० आॕगस्ट रोजीच*

📘 *पिठोरी अमावास्या - शास्त्रार्थ : -  "जास्त" मानाने "प्रदोष" व्यापिनी ( सूर्यास्तानंतरच्या ६ घटिका=२ तास २४ मिनिटे.) श्रावण अमावास्येस "पिठोरी अमावास्या" म्हणतात.* 📘
⛔ *खुलासा : -  "१०४ वर्षांची अखंडित परंपरा असलेले जगप्रसिध्द दाते पंचांग" नुसार दि. २९ आॕगस्ट रोजी गुरुवारी "अमावास्या १९-५६ नं. ( रात्री ०७-५६ नं.) प्रारंभ" होत आहे. ही अमावास्या "गुरुवारी"च "प्रदोष" व्यापिनी आहे. म्हणून पंचांगात ठळक अक्षरात "पिठोरी अमावास्या" असा "उल्लेख" केलेला आहे.* ⛔
📙 *दर्श अमावास्या - शास्त्रार्थ : - "जास्त" मानाने "अपराण्ह" व्यापिनी ( दिनमानाच्या एकूण "५ समान" भागांपैकी  "४ थ्या" भागाचा कालावधि : सामान्यत: "मध्यम" मानाने  दुपारी १|| ते ४ दरम्यानचा कालावधि.) अमावास्येला "दर्श" अमावास्या म्हणतात. ह्याच दिवशी "पोळा" सण, "वृषभ पूजन" करावयाचे असते. म्हणून पंचांगात "दर्श अमावास्या" लगतच "पोळा" ह्याचा कंसात ठळक अक्षरात उल्लेख केलेला आहे.* 📙
⛔ *खुलासा : - दि. ३० आॕगस्ट रोजी शुक्रवारी "अमावास्या १६-०७ ला ( दु. ०४-०७ ला) समाप्त होत आहे. ही अमावास्या "शुक्रवारी"च "अपराण्ह" व्यापिनी आहे. म्हणून पंचांगात ठळक अक्षरात "दर्श अमावास्या (पोळा)" असा उल्लेख केलेला आहे.* ⛔ 
🏀 *विशेष सूचना : - "घरचा ज्योतिषी, रुईकर पंचांग, ह्यात "पिठोरी अमावास्या दि. ३० आॕगस्ट रोजी शुक्रवारी" दिलेली आहे.* 🏀

🛑 *प्रेषक : - दिलीपकुमार अनंत*
       *रेवणकर, उल्हासनगर, जि.- ठाणें.*
       *9175434799,  9156614483.*
*e - mail :*
*🌹||अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||🌹*

🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"