Friday, August 16, 2019

नामजपाचे महत्व

🌹 *श्री स्वामी समर्थ*  🌹
 *नामजपाचे महत्व :* 
मुंबईमध्ये गोंधळेकर नावाचे गृहस्थ होते त्यांचे महाराजावर प्रेम होते ते नामस्मरण करीत असत सन १९३३ मध्ये त्यांना काळपुळी झाली ,मुंबईतील एका चांगल्या डॉक्टरने त्यांचे ऑपरेशन केले,पण पाठीवर ज्या ठिकाणी कापले होते त्या ठिकाणी पुष्कळ मोठी जखम झाली होती,त्या जखमेमध्ये पु न होता ती लवकर बरी व्हावी म्हणून तिचे ड्रेसिंग डॉक्टर रोज करत ,ड्रेसिंगच्या वेळी जखम धुताना गोंधळेकराना अक्षरशः प्राणांतिक वेदना होत असत एक दिवशी त्यांनी महाराजांना प्रार्थना केली "महाराज देहाचा भोग हा भोगलाच पाहिजे हे मला कबुल आहे ,हि जखम बरी व्हायला जो वेळ लागेल तो लागुदया त्यामध्ये मी नामस्मरण करण्याचा प्रयत्न करीन,परंतु रोज ड्रेसिंगच्या वेळी ज्या प्राणांतिक वेदना मला होतात त्या इतक्या भयंकर असतात कि माझा जीव कासावीस होतो, मला आपला वेदांत नको,माझ्या या वेदना कमी करा नाहीतर माझा प्राण जाउद्या " अशी अगदी कळवळून प्रार्थना केल्यावर "काळजी करू नये ,ड्रेसिंगची वेळ आली कि नामस्मरणाला सुरवात करावी राम वेदना कमी करेल " हे उत्तर त्यांना मिळाले. दुसर्या दिवशी सकाळी डॉक्टर ड्रेसिंग साठी आले इकडे गोंधळेकरानी नामस्मरण सुरु ठेवले कौतुकाची गोष्ट अशी कि त्यादिवशी डॉक्टरने जखम धुवून टाकलेली त्यांना कळली देखील नाही पुढे आठ दिवस ड्रेसिंग होत होते पण त्यांना त्याचा अजिबात त्रास झाला नाही त्यातून बरे झाल्यावर ते लोकांना सांगत कि " आपण मनापासून नामस्मरण केले तर महाराज खात्रीने आपल्यापाशी असल्याचा अनुभव येतो ,काहीही झाले तरी आपण नाम सोडता कामा नये. . या प्रसंगावरून नामजपाचे सामर्थ्य आपल्या लक्षात येते , नामजपाने प्रारब्धाने आपल्या वाटय़ाला आलेले भोग,व दुःख सौम्य होतात. प्रारब्धाचे भोग हे कोणालाही चुकले नाहीत ते माणसाच्या देहाला व मनाला ते भोगावेच लागतात. परंतु आपले रामाशी नामरूपाने सततचे अनुसंधान असेल तर ते भोग आपल्याला जाणवत नाहीत नामाने देहाचे ममत्व कमी होते. अखंड नामाने मीपणाची जाणीव नकळत कमी होते व "मी कर्ता" हि भावना नाहीशी होते,व "राम कर्ता" हि भावना निर्माण होते,. भगवंताच्या अखंड नामस्मरणात इतके सामर्थ्य आहे. की माणसांवर असलेला दुष्कर्माचा प्रभाव कमी होऊन त्याची वृत्ती सात्त्विक बनते. व सद्विचार आणि सद्वर्तनाकडे वळते. विषयासक्त आणि चंचल, अशांत मन, शांत आणि स्थिर होते. महाराज म्हणतात, भक्तांनो, आपल्या जिभेचा उपयोग केवळ भगवंत नामासाठीच करा. कोणालाही वाईट बोलु नका, कोणाचे वाईट चिंतू नका. सत्कर्मे करा, आणि पुण्य जोडा. आपल्या वाटय़ाला जे भोग येतील ते राम नामात सदैव दंग राहून हसतहसत भोगा. नामावर पूर्ण विश्वास ठेवा. कारण नामाच्या सामर्थ्यानेच प्रारब्धातील दुखः कमी होणार आहे.              🙏 🙏🙏 शुभ रात्री 🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"