नर्मदा परिक्रमा-
नर्मदा नदीला प्रदक्षिणा घालण्याच्या उपक्रमाला नर्मदा परिक्रमा म्हणतात. या परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर अथवा प्रबोधिनी एकादशी झाल्यावर होते.
इतिहास-
मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे. मार्कंडेय ऋषींनी नद्या न ओलांडता ४५ वर्षात ही परिक्रमा पूर्ण केली. स्कंदपुराणात नर्मदेचे वर्णन आले आहे असे म्हणतात.
पायी केल्यास ही यात्रा ३ वर्षे ३ महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे. ही यात्रा अतिशय खडतर आहे.
नर्मदेची परिक्रमा करण्याचे नियम-
परिक्रमेची सुरुवात ओंकारेश्वर येथून केली जाते, परंतु तेथूनच केली पाहिजे असे नाही. परिक्रमेला अमरकंटक, नेमावर व ॐकारेश्वर यापैकी कुठूनही सुरुवात करता येते. परिक्रमा चालू असताना नर्मदेचे पात्र ओलांडता येत नाही. म्हणजे नर्मदेतून वाहणारे व निघणारे पाणी ओलांडणे निषिद्ध आहे, मात्र नर्मदेला मिळणारे पाणी ओलांडलेले चालते. सदावर्तात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पद्धतीने परिक्रमा करावी लागते. रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन व नित्य पाठ करून, परिक्रमादरम्यान सतत ॥ॐ नर्मदे हर॥ या मंत्राचा जप व नामस्मरण केले जाते.
आवश्यक गोष्टी-
परिक्रमेत जाताना -
पांघरण्यास एक रग
खाली अंथरण्यास एक पोते, चटई अथवा कांबळे
पाण्यासाठी कडी असलेला डबा
थंडीसाठी स्वेटर अथवा जॅकेट
हातात काठी असल्यास सुविधा होते.
पायी परिक्रमा करतांना लागणारी गावे-
परिक्रमा ओंकारेश्वर येथून सुरू केली तर खाली दिलेली गावे क्रमाक्रमाने लागतात. संपूर्ण परिक्रमा सुमारे ३००० किलोमीटरची होते.
ओंकारेश्वर
मोरटक्का
टोकसर
बकावा
भट्यान
आमलथा
बडगाव
शालिवाहन आश्रम
बलगाव
खलघाट
भिकारी बाबा आश्रम
दवाना
राजपूर
दानोद
पलसुद
निवाली
पानसेमल
ब्राम्हणपुरी
प्रकाशा
खापर
सागबारा
डेडियापाडा
खुरा आंबा
राजपीपला
नविन शुलपाणेश्वर
कटपूर
कटपूर ते * मिठीतलाई-बोटीतून समुद्राने प्रवास - (नर्मदा व समुद्र याच्या संगमाचे स्थान.)
एकमुखी दत्त
अविधा
सुवा
नवेठा
झाडेश्वर
धर्मशाला
नारेश्वर
शिणोर
चांदोद
तिलकवाडा
गरुडेश्वर
चतुर्भुज राम
रेवकुंड
हिरापूर
महेश्वर
जलकुटी
मंडलेश्वर
जलूद
अर्धनारीनटेश्वर
विमलेश्वर
खेडीघाट
पामारखेड
नर्मदेचे नाभिस्थान
छिपानेर
बाबरीघाट
आवरीघाट
बुदनी
बनेटा थाला
पतईघाट
थारपाथर
नर्मदेचा उगम
कबीर चबुतरा
रुसा
गाडा सरई
डिंडोरी
चाबी
सहस्रधारा
जबलपूर जवळ
सोमती
कोरागाव
करेली
कौंडिया
बासरखेडा
करणपूर
होशंगाबाद
आमुपुरा
मालवा
छितगाव
हरदा
मांडला
ओंकारेश्वर
नर्मदा परिक्रमा वाहनाने करताना वाटेत लागणारी गावे -
ओंकारेश्वर
राजघाट
प्रकाशा
गोरागाँव
भालोद
अंकलेश्वरमाग्रे
कठपोर
मिठीतलई
भरुच
मोटी करोल
नारेश्वर
तिलकवाडा
तिलकवाडा
कोटेश्वर
गरुडेश्वर
माण्डू
सहस्रधारा
महेश्वर
मण्डलेश्वर
बडम्वाह
नेमावर
बरेलीमाग्रे
बरमनघाट
जबलपूरचा गौरी घाट
अमरकंटक
होशंगाबाद
ओंकारेश्वर
नर्मदा परिक्रमा या विषयावरील पुस्तके-
कुणा एकाची भ्रमणगाथा- गो. नी. दाण्डेकर
माते नर्मदे - दत्तप्रसाद दाभोलकर
नर्मदे हर हर जगन्नाथ कुंटे
नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा - भारती ठाकूर, नाशिक - गौतमी
बसने नर्मदा परिक्रमा वामन गणेश खासगीवाले
नर्मदे हर हर नर्मदे सुहास लिमये
श्री नर्मदा परिक्रमा अंतरंग - श्री नर्मदाप्रसाद
चलो नर्मदा परिक्रमा- पर्यटन भारती
नर्मदा मैय्येच्या कडेवर - शैलजा चितळे
माझी नर्मदा परिक्रमा - सांब सदाशिव अनंत
नर्मदा परिक्रमा - जोगळेकर दा.वि.
नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका - Sunil Aakivate
भागवत सप्ताह आणि नर्मदा परिक्रमा - बोरीकर अरुण
नर्मदा परिक्रमा - लेले शैलजा
तत्वमसि - लेखक ध्रुव भट्ट अनुवाद अंजनी नरवणे - केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"