Saturday, April 13, 2019

रामायण म्हणजे ज्यात राम आहे माया आहे व नारायण आहे

🙏🌼🙏 🙏🌼🙏

*रामायण म्हणजे ज्यात राम आहे माया आहे व नारायण आहे म्हणजे सगळे आहे ते रामायण*

*कसे ते पाहु, राम आहे म्हणजे नारायण आहे आणि नारायण आहे म्हणुन राम आहे, माया आहे म्हणजे वनवास सीता हरण व रावण वध, सीतेचा त्याग सीते कडुन सोनेरी मृगाची मागणी ही माया झाली आणि मायेला जो जाणतो तो राम म्हणजे नारायण*

*वनवासात चालताना श्रीराम पुढे असायचे, सीतामाई मध्ये व लक्ष्मण मागे असायचे, म्हणजे राम - ब्रह्म, सीता - माया व लक्ष्मण - जीव. ज्या वेळी जीवाला ओढ लागते त्यावेळी त्याचा जीव तगमगतो व तो त्यास जाणतो. कसे, राम ज्यावेळी पुढे चालत असे व लक्ष्मण मागे चालत असे व मध्ये सीतामाई असत सीतामाई मध्ये असल्याने लक्ष्मणास रामाचे दर्शन होत नसे आणि सीतामाई थोडया बाजुला झाल्या की दर्शन होई.*

रामनाम घेत असतांना लक्ष नामावर स्थिर झाले की मन *लक्ष + मन = लक्ष्मण* होते. 

नामस्मरण  करताकरता मन *उन्मन होते म्हणजेच हनुमान* होते.

हनुमान झालेले हे मन *भक्तीमध्ये रत झाले की भरत* होते.

असे मन सततच्या नामस्मरणामुळे तृप्त होते, त्यातील विकार नाहीसे होतात, *शत्रुंचे हे मन हनन करते म्हणून शत्रुघ्न* होते.

अशा नामस्मरणाने मन *शांत होते शीतलता प्राप्त  करते म्हणजेच सीता* होते.

सीता झालेल्या या मनात *दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने राम स्वरूप* होते. 

*|| श्रीराम जयराम जय जय राम ||*

🙏🌸🙏🌸🙏🌸🙏🌸🙏

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"