Sunday, February 10, 2019

प्रदक्षिणा

🙏🚩🌷 *प्रदक्षिणा*🌷🚩👏

देवाला भावपुर्ण नमस्कार केलेला आहे. डोळेभरून त्याचे लोभस रूप मनात साठवले आहे. 
आता प्रदक्षिणा मारायची...... 

म्हणजे काय करायचे...... 
सगळे करतात म्हणून करायचे का? कारण बर्‍याच जणांच्या तोंडून ऐकलेला शब्द.... 
चला चकरा मारू....... 
गोल फीरू...........

पण प्रदक्षिणेचा अर्थ नीट समजुन घेतला तर....... 
प्रदक्षिणा म्हणजे देवाला नीट न्याहाळणे. चहुबाजुंनी त्याला बघत बघत मी माझी पावलं टाकणे.

आपण प्रदक्षिणा करतांना एक मंत्र म्हणतो.,

यानि कानिच पापानि,
जन्मांतर कृतानीच,
तानी तानी विनश्यन्तु प्रदक्षिणे पदेपदे.

पादुकापुजन झाल्यावर ह्या मंत्रासहित स्वत:भोवती आपण तीन प्रदक्षिणा हा मंत्र म्हणत घालतो त्यामुळे हा मंत्र परिचयाचाच आहे. 

ह्याचा अर्थ ह्या किंवा त्या कारणाने माझ्याकडुन, कळत नकळत ज्या काही चुका झाल्या असतील, त्या प्रत्येक चुकांचा/ पापांचा, ह्या प्रदक्षिणेद्वारे पडणार्‍या प्रत्येक पावला गणिक, नाश होऊ दे.

म्हणुन स्वत:भोवतीची प्रदक्षिणा अजुनच सावकाश घालायची असते. 

माझा देव मधे बसलेला आहे.
तो माझ्या कडे बघतो आहे.
मीहि त्याच्या कडे प्रेमाने पहात हि प्रदक्षिणा पुर्ण करतो आहे..हा शुध्द भाव जागृत असायला हवा.
तरच त्या प्रदक्षिणेच्या कृतीला अर्थ आहे. नाहितर फक्त कवायतीच व्हायच्या.

" जर पुजा करतांना, मंत्र म्हणतांना भाव नसेल तर आपण करतो त्या फक्त कवायतीच."

 प्रदक्षिणेचा अर्थ विस्तृत पणे बघितला तर फक्त मंदिरात जाऊनच प्रदक्षिणा करायला पाहिजे असे नाही. 

त्या ईश्वराचे चिंतन, मनन, त्याला समजुन घेण्याचा प्रयास म्हणजेहि प्रदक्षिणाच. सगुण.... सहगुण ईक्षण. मग त्यासाठी मला मंदिरातच जायला हवे असे नाही..... 
कुठेहि कधीही कितीतरी वेळ मी अशा पध्दतीने प्रदक्षिणा करू शकतो. 

निरालंब ईक्षण...... 
म्हणजे माझ्या वर्तमानाच्या परिस्थितीचा मनापासून स्विकार करून करत राहिलेले कर्म.  स्वत:शी, माझ्या देवाशी प्रामाणिक राहून केलेले कर्म..... 
सेवा..... भक्ती...... 

कुणी मला चांगले म्हणावे, 
माझी वाह वा करावी, 
म्हणुन दार्शनिक केलेली भक्ती काय उपयोगाची? 

प्रत्येक क्षण फक्त त्याच्याच साठी
तन..... मन... बुध्दी..... 
त्याच्याच चिंतनात.

अशीही प्रदक्षिणा......... 

आता प्रदक्षिणेचा भाव आणि कृती बघुयात..... 

1) द्विदल
आपण आता देवासमोर उभे आहोत. दोन्ही हात जोडलेले आहेत.. माझे चंचल मन मी या शरीरात एकवटले आहे. आणि पुर्ण पणे तुला, तुझ्या रूपाला न्याहळतो आहे.

आता आपण हळुहळु हिच भावना मनात एकवटून पुढे चाललो आहोत. देवाच्या उजव्या बाजूला आपण आहोत आणि शक्यतो मंदिराच्या तिन्हि बाजुंनी आपल्याला मुर्ती दिसेल अशी मंदिराची रचना असते. 

2) बध्दकरांजली
ह्या उजव्या बाजूला आपले दोन्ही हात झाकलेले म्हणजे माझ्या हातात काहितरी धरून ठेवलेल्या अवस्थेत असतील. 
इथे माझा भाव देवा, मी माझे माझे जे म्हणतो पैसा, अडका, माझे पाप,माझे पुण्य, प्रारब्धाचे ओझे. हे सगळेच्या सगळे तुझ्या चरणी अर्पण करतो. तुझ्या शेतात पेरतो आहे.

हे सर्व अर्पण करता करता पाऊले पुढे पुढे जातील......... 

आता आपण देवाच्या मागच्या बाजूला आहोत. 

तिन्हि बाजुने देव दिसतो पण इथे मला माझे मस्तक भिंतीवर टेकवायचे आहे, म्हणून हि बाजु बंद आहे. 
मी जरी देवाच्या मागच्या बाजूला असलो तरी देव नेहमीच माझ्या मागे असतो... मला सांभाळण्याची...... 

3) मस्तक स्पर्शन
माझे मस्तक मी टेकवायचे. दोन्हि हातही टेकवलेले.
माझा भाव मी तुझ्या शेतात आत्ता जे पेरले.त्यातुन जे काही चांगले वाईट उगवेल ते परत सगळे तुला अर्पण करतो.

आता बघा...... माझे ते त्याला दिले......परत जे उगवले तेहि अर्पिले....... 

आता हळूहळू पुढे येऊन मी देवाच्या डाव्या बाजूला उभा आहे. 

4) मुक्तकरांजली
ह्या वेळेस माझे दोन्ही हात उघडलेले देवाकडे असतील..

माझा भाव =शुध्द... निर्लेप.... 
आता माझ्या कडे देवा काहिच उरले नाही. आता मला फक्त आणि फक्त तुच हवा आहेस.
माझ्या जवळ तुझ्या व्यतिरिक्त आता काहिच नाही......... 

माझा असा जेव्हा भाव असतो तेव्हा अनंत पटीने माझी झोळी भरलेली असते. 
कारण तो नवऐश्वर्य दाताच माझ्याकडे आहे मग उणिव ती कशाची? 

प्रदक्षिणा करतांना अगदि हळुवार गती असावी.......

मी शेगावला गेले कि 108 प्रदक्षिणा घालायच्या असा प्रयास नेहमी असायचा. पण त्या प्रदक्षिणेचा वेग वाढवला तरच बाकि सगळे साध्य व्हायचे. मग भरभर प्रदक्षिणा पूर्ण करायच्या. धावत पळत....... 
ह्यातहि भाव होताच...... 

मग ठरवले, मनापासून, उत्साहाने,नियोजित वेळेत,  जेवढ्या होतील तेवढ्या प्रदक्षिणा करायच्या. मोजण्यात लक्ष घालण्यापेक्षा, माझे ते देवाच्या चरणी अर्पण करण्यात वेळ देऊयात.

आता प्रदक्षिणेतले पावित्र्य, भाव, सहजच जपला जातो.
🚩‼ *श्री गुरुदेव दत्त*‼🚩

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"