आचार हा प्रथम धर्म आहे.
कर्तव्यपालन ही पहिली उपासना आहे.
आपल्या देशाप्रती,समाजाप्रती, कायद्याप्रती असलेले प्रेम ही श्रेष्ठ महापूजा आहे.
शरीर हे सर्व धर्मपालनाचे साधन आहे.
.ते सारे सांभाळून मग कृतज्ञबुध्दीने देवाची प्रेमभावाने पूजा, नाम- स्मरण इ.करायचे असते.
अभ्यासाकडे दुर्लक्ष करून देऊळात दर्शनाला जात राहिला तरी काही फायदा होणार नाही.मग देवाचे करून काहीही होत नाही असे रडगाणे गात बसून उपयोग नाही.कर्तव्यदक्ष माणूस देवाचे फारसे करत नसला तरी तो यशस्वी होत असतो.पण काहीही कामे करायची नाहीत फक्त देव देव अशी रुक्ष बडबड करायची हे व्यर्थ होते.स्वतः-
च्या आईवडीलांना वृध्दाश्रमात टाकायचे आणि अष्टविनायक यात्रा करायची हे ढोंग असते.मुलानाही संध्याकाळी रामरक्षा म्हणायला बसविण्यापूर्वी आधी अभ्यास पूर्ण झाला आहे ना ते विचारावे.शाळेत जाताना मुलांना साईबाबांची उदी लावताना ही उदी तुला परिक्षेत नक्की पास करेल अशी अंधश्रध्दा त्या बालमनात पेरणे घातक असते.तुझा अभ्यास खूप चांगला होण्यासाठी हा बाबांचा आशिर्वाद आहे ही समजूत फायदेशीर होईल.'कर्तव्यपालन' ह्या सारखा श्रेष्ठ धर्म नाही.सावता माळी, पंढरीच्या वारीला जाणा-या संतांसाठी भाजी पिकवण्यात इतका मग्न झाला होता की त्याला पंढरपूरला जायला सवडच सापडली नाही.पण त्याचे श्रेष्ठ कर्तव्यपालन पाहून विठ्ठल-रखु-
माईच त्याच्या शेतावर आशिर्वाद देण्यासाठी स्वतः जातीने आले.आई वडीलांच्या सेवेचे कर्तव्यपालन करीत असल्यामुळे
प्रत्यक्ष पंढरीराया आले तरी पुंडलीक ते सोडून उठला नाही तर थांबण्याची खूण करून उभे रहाण्यासाठी वीट फेकली.आणि ते सावळे परब्रह्म आदिमायेसह अठ्ठावीस युगे न विटता त्या वीटेवर उभे आहे.केवढे हे महत्व कर्तव्य पालनाचे!बायका घामाघुम होऊन अग्निनारायणांची धग सोसत स्वैपाकघरात कुटुंबासाठी राबत असतात.मनःपूर्वक अवधान ठेवून रुचकर पदार्थ बनवून सदस्यांना भोजनानंद देण्याचे कर्तव्य चोख बजा
वीत असतात.म्हणून स्त्रियांना नाही वेगळे कर्म! पति देतो अर्धा धर्म!कर्तव्यपालनातील दक्षतेमुळे स्त्रियांच्या ठिकाणी भरपूर
पुण्यसंचय असतो म्हणून स्त्रियांचा नेहमी आदर करावा.तीन्ही
सांजेला अचानक एखादी सुवासिनी घरी आली तर तिला हळद कुंकु लावून दूध द्यावे व देवीस्वरूप समजून नभस्कार करावा.मित्रमैत्रिणींनो स्त्रिया, "कार्येषु मंत्री,वचनेषु दासी,भोज्ये
षु माता, शयनेषु रंभा,धर्मानुकूला आणि क्षमया धरित्री" अशा सहा गुणांनी परिपूर्ण समृध्द असतात.त्यांचा अवमान कधीही करू नये.तात्पर्य पूजा,जपजाप्य,पारायण,नामस्मरण,ध्यान ह्या
सर्वाच्या आधी आपापली कर्तव्ये चोख बजाऊनच बैठकीला बसावे.आईला चढ्या आवाजात काही बोलून मग देवीमहात्म्य
वाचायला बसला तर सारे व्यर्थ होईल.आपापली कर्तव्ये चोख बजावली तरच आतून मन शांत होते.समाजातल्या सर्व थरांनी
असे केले तर पोलीसांना कामच उरणार नाही व खरेखुरे रामरा-
ज्य निर्माण होईल.पिताधर्म,मातृधर्म,पुत्रधर्म,आचारधर्म,शेजार
धर्म,कर्तव्यधर्म,प्रजाधर्म,अतिथीधर्म,कायदापालनधर्म असे सारे धर्म (कर्तव्ये)नीट निभावले तरच उपासना लवकर फळेल.धर्मपालन नीट न करता देव देव करणे उलट्या घड्यावर पाणी.आता कळेल की देवाचे करूनही फळ का मिळत नाही.कर्तव्यदक्षता,भगवंतावरचे प्रेम,माणुसकी,नम्रता,
उपकारवृत्ती,दानधर्म हे गूणच अध्यात्मात प्रगती करवतात.🙏शरद उपाध्ये 🙏🏻
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"