Monday, February 11, 2019

सवय बदलायची आहे



*🌾एका साधकाने  "मला राग खुप लवकर येतो, नंतर मला पश्चातापही होतो, मला माझी ही सवय बदलायची आहे, ही सवय बदलण्यात आपण माझी मदत करु शकता का?"*
*श्रीमान जी! सर्वप्रथम आपले मनःपुर्वक अभिनंदन, कारण तुम्ही हे मान्य केलेत, आणि तुम्ही आयुष्यात नवे सकारात्मक बदल घडवण्यासाठी उत्सुक आहात, सज्ज आहात, त्यामुळे अर्धा विजय तर इथेच झाला.*
*मी चुकतोय, हे कळणे, म्हणजे आपोआपच पुढची चुक टाळणे; नाही का?आता तुमच्या प्रश्नाकडे वळुया, मी तर म्हणेन, दाग अच्छे है, च्या धर्तीवर राग चांगला असतो, असे म्हणणे योग्य ठरेल.*
*उदा. आपल्याला कचर्‍याचा राग येतो, म्हणुन तर आपण स्वच्छता ठेवतो, आपल्याला गरीबीचा तिटकारा असतो म्हणुन आपण रोज कामावर जातो, लोकांनी केलेल्या अपमानाचा आपल्याला राग येतो म्हणुन तर, इच्छा असो वा नसो, आपण आपलं काम चोखपणे पार पाडतो!   राग ही एक उर्जा आहे, आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातुन निर्माण झालेल्या उर्जा व्यर्थ घालवत नाहीत, तिचा सकारात्मक वापर करुन विश्व बदलुन टाकतात.*
*गांधीजींना जेव्हा रेल्वेतुन बाहेर फेकुन दिलं तेव्हा त्यांना प्रचंड राग आला, इतका की त्यांनी ना ना खटपटी करुन इंग्रजांनाच देशाबाहेर हाकलुन लावलं!मार्टीन ल्युथर किंगला राग आला आणि त्याने अमेरीकाच बदलुन टाकली. नेल्सन मंडेलाला कृष्णवर्णीयांवर होणार्‍या अन्यायाची चीड आली आणि त्याने अफ्रिका हादरुन टाकली.*
*आंबेडकरांनी तेच केलं, शिवाजी महाराजांनी केलं, त्यांनी आपला राग एकदाच व्यक्त होवुन शांत होऊ दिला नाही, तो निखारा त्यांनी आपल्या हृदयात सतत पेटता ठेवला, आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यातुन मिळलेलं इंधन आपल्या स्वप्नपुर्तीसाठी वापरलं! ते जे करु शकतात ते आपणही करु शकतो की!फालतु गोष्टींवर रागराग करुन आपली बहुमुल्य उर्जा वाया घालवण्यापेक्षा तिचं रुपांतर तीव्र इच्छाशक्तीमध्ये करायला शिकणं, हीच खरी आनंदाची आणि यशाची गुरुकिल्ली आहे.*🙏
(श्री सागर उमरीकर ह्यांनी प्रस्तुत केलेल्या एका लेखावर आधारित)
*जय जय श्रीराम!! जय जय श्रीराम!!*

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"