Saturday, March 30, 2019

" *श्रीक्षेत्र गाणगापूर "येथील स्थान* *महात्मा*

*संगम* -"-गाणगापूर "क्षेत्रात भीमा -अमरजा या दोन नद्यांचा संगम झाला आहे. गाणगापूर गावापासून पश्चिमेस दोन मैलावर हा संगम झाला आहे .तेथे "श्री नृसिंह सरस्वती " नित्य स्नान करीत अशा या ठिकाणी स्नान केल्यास यांत्रिकांची पापे धुतली जातात "निर्गुण पादुकांचे" दर्शन घेण्यापूर्वी संगमावर जाऊन प्रथम स्नान करावे. संगमावर नदीकाठी अंघोळीसाठी घाट बांधण्यात आलेले आहे.संगमावर जवळच महाराजांचे मंदिरही आहे.                  *भस्ममहिमा* -संगमाच्या जवळ एक लहानशी टेकडी आहे ती भस्माने बनली आहे भगवान "परशुरामांनी "या ठिकाणी मोठे यज्ञ  केले. या यज्ञातील विभुती झालेली ही टेकडी अशी पौराणिक पार्श्वभूमी चाललाी आहे. श्री गाणगापूर क्षेत्राचा मुख्य प्रसाद म्हणून या टेकडीवरील विविध  भक्तगणांना  नेतात या विभूतीने आपले मनोरथ पूर्ण होते अशी  श्रद्धा आहे.              *संगमेश्वर मंदिर* -हे मंदिर भीमा अमरजा नद्यांच्या संगमाजवळ आहे हे एक जागृत स्थान अाहे.   नृसिंह सरस्वती  शुष्क कष्टातून जी  औदुंबर  पल्लवीत केली तो वृक्ष या देवळा समोरच होता .संगमावर स्नान केल्यानंतर प्रथम संगमेश्वरचे दर्शन घेऊन मग निर्गुण पादुकांच्या दर्शनाला जातात .                                       *औदुंबर वृक्ष* -संगमेश्वरच्या देवळाच्या पूर्वेचे हे झाड श्री नृसिंह सरस्वतींनी केलेल्या असंख् लीलां पैकी एक  लिलेशी संबंधित आहे. श्रीनरहरी नावाच्या एका ब्राह्मणाला कुष्ठरोग होता नरहरी जेव्हा स्वामींना शरण गेला तेव्हा स्वामींनी एक  शुष्क काष्ठ जमिनीत रोवण्यात सांगितले .ज्या दिवशी या शुष्क काष्टाला पालवी फुटेल त्या दिवशी त्या ब्राह्मणाचा  राेग जाईल असे महात्मा सांगितले पुढे त्या ब्राह्मणाची खरी भक्ती बघून   नरसिंह सरस्वती   त्या कष्टावर तीर्थ शिंपडले लगेच  काष्टाला पालवी फुटली आणि  माेठे  मा झाले . स्वामींच्या शब्दावर श्रद्धा ठेवून त्यांनी सांगितल्या प्रमाणे वागल्यास कल्याण होते. याचे हे उदाहरण  आहे महापुरात हा वृक्ष वाहून गेला आहे त्याच  ठिकाणी दुसरे औदुंबर उगवला आहे .त्या ठिकाणी गणपतीची मूर्ती व पादुका स्थापन करण्यात आलेली आहे. तेथे झाडाखाली भक्त गुरुचरित्र पारायण करतात .              *विश्रांती कट्टा* -श्री नरसिंह सरस्वतींनी आपल्या पवित्र स्पर्शाने मंगलमय केलेला हा कट्टा संगमा कडे जाताना एका शेतात लागू आहे. स्वामी संगमाला जातांना परत येते वेळी या कट्ट्यावर विश्रांती घेत म्हणून त्याला विश्रांती कट्टा असे नाव झाले आहे. कट्ट्याचे महात्मा असे आहे कि ज्या शेतात हा कट्टा आहे  गुप्तरुपाने नरसिंह  सरस्वती संगमाला जातात आणि कट्ट्यावर विश्रांती घेतात आणि अशावेळी स्वामींची कृपादृष्टी जाग्यावर पडते त्या व्यक्तीची भरभराट होते .                               *निर्गुण पादुका महात्मा -*  निर्गुण पादुका "श्रीक्षेत्र गाणगापूरचा" आत्मा आहे  .असे म्हटले तरी चालेल भक्तांच्या   आग्रहावरून आपल्या  अवतार समाप्तीच्या वेळी नृसिंह सरस्वतींनी 


ठेवलेल्या या पादुका श्रीगुरु  अस्तित्वाचे    साक्ष आहे.ज्यावेळी भीमा नदीत  केळीच्या पानावर आरुढ झालेले नरसिंह सरस्वती एकाएकी अंतर्धान पावले,  जेव्हा सारे भक्त परत देवळाकडे परतले तेव्हा निर्गुण पादुकांच्या स्थानी प्रत्यक्ष नरसिंह  सरस्वती विराजमान असलेले दृश्य भक्तांनी पाहिले .

लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते

---------------------------------------------------
*
 लक्ष्मीचे प्रतिक मानले जाते,*
------------------------------------------------

*जाणून घ्या, झाडूशी संबंधित काही खास गोष्टी.*

 अनेक वेळा आपण काही वस्तू साधारण समजून वापरत असतो पण वास्तवात त्या आपल्या जीवनात फार महत्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यांचे शुभ-अशुभ जीवनात मोठा बदल घडवू शकतात. 
अशीच एक सामान्य वस्तू आहे ती म्हणजे झाडू. घरात वापरला जाणारा झाडू आर्थिक दृष्ट्या फार महत्वाचा असतो. 

*शकुन आणि अपशकुन*

 शास्त्रांमध्ये झाडूचा वापर आणि त्याला वापरण्याची वेळ तथा त्याला वापरण्याला अत्याधिक महत्व दिले आहे. वास्तुशास्त्र नुसार झाडू संबंधित दिलेले काही प्रयोग करून आपण अनेक समस्यांपासून सुटका मिळवू शकतात. 
*आज आम्ही झाडू संबंधित अशाच काही वास्तू टिप्स सांगणार आहोत.*


ज्योतिष आणि शास्त्रांचे मानले तर एकीकडे झाडूचा चुकीचा वापर दारिद्रता आणतो तर दुसरीकडे तोच योग्य प्रकारे वापरल्याने लक्ष्मीसाठी घराचे दार उघडून देतो. झाडूचा चुकीच्या वेळी वापर घरात गरिबीचे कारण बनतो तर दुसरीकडे तोच योग्य प्रकारे वापरल्यास सामान्य माणसाला करोडपती बनवू शकतो. त्यामुळे आपण यासंबंधीचे नियम आणि मान्यता नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. जसे की..

*१. चुकूनही पायाने स्पर्श करू नये*


हिंदू धर्मात झाडूला देवी लक्ष्मीचे सूचक मानले जाते. त्यामुळे झाडूला कधीच पायाने स्पर्श नाही केला पाहिजे. कारण असे देवी लक्ष्मीचा अपमान केल्याचं मानलं जातं. ज्यामुळे आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. सोबतच झाडू अशा ठिकाणी ठेवला नाही पाहिजे जिथे चप्पल जोडे ठेवले असतात.

*२. इथे ठेवा झाडू*


घरात झाडू ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की, झाडू कधीच अशा जागी ठेवला नाही पाहिजे जिथे त्यावर बाहेरच्या लोकांची सरळ नजर पडेल. त्याला कायम लपवून ठेवल पाहिजे. सोबत हे ही लक्षात ठेवावे की झाडू कधीच ईशान्य कोपऱ्यात ठेवला नाही पाहिजे, त्यामुळे देवाच्या आगमनात अडथळा येतो. आणि दुर्भाग्य घरात चालून येत. झाडू ठेवण्यासाठी योग्य कोपरा दक्षिण आणि पश्चिम सांगितला आहे.

*३. सूर्यास्तानंतर झाडू मारू नये*


सूर्यास्तानंतर घरात झाडू मारला नाही पाहिजे. असे केल्याने देवी लक्ष्मी रुष्ट होते. घरात झाडू लावण्याची वेळ सकाळी चार पहरी सांगितल्या आहेत. रात्रीच्या प्रहरी झाडू लावल्यास दारिद्रता आपले पाय पसरते.

*४. झाडू कधीच उभा ठेवू नये*


अनेक वेळा लोक झाडू उभा ठेवतात पण ते वास्तूच्या दृष्टीने फार हानिकारक आहे. ज्यामुळे घरात विनाकारण क्लेश राहतो. सोबतच याने भाग्याचा मार्गात बाधा निर्माण होते शिवाय देवी रुष्ट होते. त्यामुळे झाडू कायम आडवा ठेवावा.
------------------------------------------------
*झाडूच्या ह्या उपायांनी मिळते सौभाग्य*
-------------------------------------------------

१. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुठल्याही मंदिरात ब्रह्म मुहूर्तावर तीन झाडूंचे गुप्तदान करावे. सोबतच झाडू दान करण्याआधी शुभ मुहूर्त अवश्य बघून घ्यावा. जर त्यादिवशी शुभ योग्य किंवा कुठला सण असेल तर त्याचे महत्व वाढते आणि घरात स्थायी लक्ष्मी वास करते.


२. जर आपण नवीन घरात प्रवेश करत असाल तर नवीन झाडू घेऊनच प्रवेश करावा. हा शुभ शकुन मानला जातो. ज्यामुळे नवीन घरात सुख, समृद्धी आणि शांती बनून राहते.

३. शनिवारच्या दिवशी नवीन झाडूचा वापर करणे शुभ मानले जाते.
--------------------------------------------------
*झाडूशी संबंधित या गोष्टी दूर करू शकतात तुमच्या विविध अडचणी*
-------------------------------------------------


*येथे जाणून घ्या, झाडूशी संबंधित काही खास गोष्टी.*

१. घर किंवा ऑफिस, दुकानामध्ये झाडूचे काम नसेल तर तो डोळ्यासमोर ठेवू नका. पूर्णवेळ झाडू दिसणे शुभ मानले जात नाही. उघड्यावर ठेवलेल्या झाडूमुळे घर, ऑफिसमधील सकारात्मक उर्जा बाहेर पडते.

२. अनेकवेळा झाडू तुटल्यानंतरही आपण त्याचा उपयोग करतो, परंतु वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे चुकीचे आहे. घर किंवा ऑफिसमधील झाडू तुटला असेल तर लगेच बदलून घ्यावा. तुटलेल्या झाडूने घराची स्वच्छता केल्यास विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते

३ . झाडू कधीही उभा ठेवू नये, उभा झाडू अपशाकुनाचे कारण ठरतो. यामुळे झाडू नेहमी आडवाच ठेवावा.

४. लक्षात ठेवा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नये. असे केल्यास घरामध्ये दरिद्रता येते. सूर्यास्तापूर्वी घराची साफसफाई करून घ्यावी, कारण सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मी पृथ्वी भ्रमण करत असते.

५. शक्य असल्यास झाडू पश्चिम दिशेच्या खोलीत ठेवावा. या दिशेला झाडू ठेवणे सर्वात उत्तम मानले जाते. यामुळे घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक उर्जा येत नाही.

६)हिंदू धर्मामध्ये झाडूला लक्ष्मी समान मानले गेले आहे. घरातील कोणत्याही सदस्याचा झाडूला पाय लागणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. विद्वानांच्या मतानुसार झाडूवर पाय पडल्याने महालक्ष्मीचा अवमान होतो. झाडूला कधीही जाळू नये.

७. जुना झाडू बदलून नवीन वापरण्यासाठी शनिवारचा दिवस निवडावा. शनिवारी नवीन झाडूचा वापर करणे शुभ मानले जाते.

८. झाडू धुवायचा असल्यास तो स्वच्छ  पाण्याने धुवावा. घाण पाण्याने झाडू धुणे हा जादूचा अपमान मानला जातो आणि यामुळे घरातील सदस्यांना विविध प्रकारच्या अडचणीं सामोरे जावे लागू शकते.
------------------------------------------------
*संकलन :- सतीश अलोणी @*
--------------------------------------------------

राम भक्त तुलसीदास

तुलसीदासांना एकदा एका भक्तांने विचारले की
"महाराज तुम्ही रामाचे इतके गुणगान गाता.
तुम्हाला स्वतः रामाने कधी दर्शन दिले आहे का?"
तुलसीदास म्हणाले "हो"
भक्त:- मला पण दर्शन घडवाल का???
तुलसीदास:- "हो नक्की"
तुलसीदासांनी त्याला खुप समर्पक उत्तर दिलं, जे
एखाद्या गणिती तज्ञाला ही लाजवेल!!!
तुलसीदास म्हणाले "अरे हे खुप सोप्पं आहे!!! तू रामाचे
दर्शन तुझ्यातच घेऊ शकशील. " प्रत्येकाच्या नावांत
देखील शेवटी आपल्याला रामाचेच दर्शन घेता येईल.
त्यासाठी मी तुला एक सुत्रश्लाेक सांगतो.
त्याप्रमाणे कोणाच्याही नावाला ते सुत्र लागु
होईल!!!
भक्त:-"कोणते सुत्र?"
तुलसीदास:-
"नाम चतुर्गुण पंचतत्व मिलन तासां द्विगुण प्रमाण।
तुलसी अष्ट सोभाग्ये अंत मे शेष राम ही राम॥"
वरील सुत्राप्रमाणे
आता कोणाचेही नांव घ्या, त्याची अक्षरे माेजा...
१)त्याला (चतुर्गुण) ४ ने गुणा.
२)त्यात (पंचतत्व मिलन) ५ मिळवा.
३)त्याची (द्विगुण प्रमाण) दुप्पट करा.
४)आलेल्या संख्येला (अष्ट सो भागे) ८ ने भागा.
पुर्ण भाग जात नाही!!!
दरवेळेस बाकी २ शिल्लक राहतेच...
ते दोन म्हणजेच "राम" ही दोन अक्षर होय...
विश्वासच बसत नाही ना???
चला उदा. घेऊ...
कोणाचेही नाव निवडा, अक्षर कितीही असोत!!!
उदा. निरंजन
४ अक्षरे
१) ४ ने गुणा ४x४=१६
२)५ मिळवा १६+५=२१
३) दुप्पट करा २१×२=४२
४)८ ने भागा ४२÷८= ५पुर्णांक, बाकी मात्र २!!!
बाकी नेहमी दोनच अक्षरे उरतील ती म्हणजे-
"राम"!!!
विशेष म्हणजे सुत्रश्लोकातील संख्यांना सुद्धा
तुलसीदासांनी फार महत्व दिलं आहे!!!
चतुर्गुण म्हणजे ४ पुरुषार्थ- धर्म, अर्थ, काम आणि
मोक्ष!!!
पंचतत्व म्हणजे पंचमहाभौतिक- पृथ्वी, जल, अग्नि,
वायु व आकाश!!!
द्विगुण प्रमाण म्हणजे माया व ब्रह्म असे दोन!!!
अष्ट सो भागे म्हणजे अाठ दिशांनी (चार दिशा-
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण; चार उपदिशा- आग्नेय,
नैऋत्य, वायव्य, ईशान्य) आठ प्रकारची लक्ष्मी (आग्घ,
विद्या, सौभाग्य, अमृत, काम, सत्य, भोग आणि योग
लक्ष्मी)
आता प्रत्येकाने स्वतःच्या नावाने हे तपासून पहा...
विस्मयकारक वाटेल पण बाकी नेहमी २च येईल...
यात तुलसीदासांच्या बुद्धिचातुर्याची व अतुट
रामभक्तीची ओळख पटते!!!