Friday, May 24, 2019

श्रीपाद वल्लभ चरित्र अमृत :- अध्याय -52, 53

॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -५२
शंकरभट्टाचे योगानुभव निरूपण श्रीपाद प्रभूंचे दिव्य दर्शन
श्रीपाद प्रभूंचे दिव्य दर्शन
मी तीन वर्षे सतत दररोज मध्यरात्रीच्या वेळी श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमय दर्शन घेत असे. मी योगाच्या अनुभूती एका पुस्तकाच्या रूपात लिहिल्या. ते पुस्तक हिमालयातील एक योगी येऊन घेऊन गेले. ही श्रीपाद प्रभूंचीच इच्छा असणार असे मी मानतो. त्यांच्या आज्ञेनेच हे घडले यात तिळमात्र संशय नाही.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
॥ श्री गुरुवे नम: ॥ ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ 
अध्याय -५३
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथाचे पीठिकापुरम पोहोचण्याचे विधान - ग्रंथाचे वैशिष्टय
मी लिहिलेला ''श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत '' ग्रंथ थोडे दिवस श्रीपाद प्रभूंच्या मामांच्या घरी होता. त्यानंतर त्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगु भाषेत अनुवाद करण्यात आला. तेलुगु भाषेत भाषांतर झाल्यावर मूळ संस्कृत ग्रंथ अदृश्य झाला. गंधर्वानी तो श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थानी नेऊन जमिनीत खोलवर पुरून ठेवला . त्याचे सिध्दयोग द्वारा पठन होत आहे. मी रचलेले चरित्रामृत श्रीपाद प्रभूंच्या दिव्य पादुकाजवळ ठेऊन मी त्यांना वाचून दाखविले. ऐकण्यास आलेले पांच भक्त ते श्रवण करून धन्य झाले. मी पंडित नाही त्यामुळे कोणता अध्याय वाचला असता काय फळ मिळेल ते सांगु शकत नाही. श्री बापनाचार्युलुच्या तेहतीसाव्या पिढीच्या कालखंडात या ग्रंथाची तेलुगु भाषेतील प्रत उदयास येईल. ज्या भाग्यवंत व्यक्तींनी हा ग्रंथ उदयास आणला त्यांनी श्रीपाद प्रभूंच्या जन्मस्थळी जाऊन तेथील महासंस्थानाच्या पवित्र परिसरात पारायण करून हा ग्रंथ श्रीपाद प्रभूंच्या चरणी अर्पण करावा. या ग्रंथाचे पारायण चालू असताना पारायण करणाऱ्या भाग्यवान भक्तास गाणगापूर क्षेत्रातून पाठवलेला प्रसाद मिळेल. तो प्रसाद आणून देणारी व्यक्ति बापनाचार्युलुच्या तेहतीसाव्या पिढितील असेल. हे तेजोमय स्वरूपात दर्शन देणाऱ्या श्रीपाद प्रभूंचे दिव्य वचन आहे.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो ॥
!! समाप्त !! श्री श्रीपाद राजम् शरणम्  प्रपंदे

No comments:

Post a Comment

im writing under "Comment Form Message"