Saturday, February 2, 2019

अष्टदिशा माहिती

---------------------------------------------
*!! अष्टदिशा माहिती !!*
---------------------------------------------

भारतीय वास्तुशास्त्रीय दृष्टीकोनातून विचार करताना आपण अष्टदिशांना महत्त्व देतो. अष्ट म्हणजे आठ या शब्दाला आपल्या भारतात अनेक दृष्टीकोनातून महत्त्व आहे.
उदा अष्टपैलू, अष्टदिशा, अष्टगुणसंपन्न, अष्टप्रधान, अष्टलक्ष्मी, अष्टविनायक, अष्टौप्रहर, "अष्टपुत्र सौभाग्यवती भव' सारखे प्राचीन आशीर्वाद, अशा अनेक संकल्पनांमधून आठ या आकड्याचे महत्त्व दिसून येते.
---------------------------------
!! *अष्टदिशा* !!
-----------------------------------

पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य या आठ दिशा आहेत.

*१. पूर्व दिशा* : 
या दिशेचा दिशापालक इंद्र देव आहे. त्याची पत्नी शची देवी आहे. त्याचे नगर (पूर) अमरावती आहे. त्याचे वाहन पांढरा हत्ती (ऐरावत) आहे. त्याचे आयुध वज्रायुध हे आहे. या दिशेची राशी मेष (१) , वृषभ (२) आहे. या दिशेचा रंग श्वेत (पांढरा) आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला ऐश्वर्यं लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह सूर्य (रवी) हा आहे.

*२. आग्नेय दिशा* : 
या दिशेचा दिशापालक अग्नी देव आहे. त्याची पत्नी स्वाहा देवी व सदा देवी आहे. त्याचे नगर (पूर) तेजोवती आहे. त्याचे वाहन मेंढा आहे. त्याचे आयुध भोप (रोज) / राग (क्रोध) हे आहे. या दिशेची राशी मिथुन (3) आहे. या दिशेचा रंग लाल/तांबडा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धान्य लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह शुक्र हा आहे.

*३. दक्षिण दिशा* :
 या दिशेचा दिशापालक यम देव आहे. त्याची पत्नी शामला देवी आहे. त्याचे नगर (पूर) संयमनी आहे. त्याचे वाहन महिष आहे. त्याचे आयुध कालपाश हे आहे. या दिशेची राशी कर्क (४), सिंह (५) आहे. या दिशेचा रंग लाल आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला आदि लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह मंगळ हा आहे.

*४. नैऋत्य दिशा* : 
या दिशेचा दिशापालक नैऋती देव आहे. त्याची पत्नी दीर्घा देवी आहे. त्याचे नगर (पूर) कृष्णांग आहे. त्याचे वाहन नर (मनुष्य) आहे. त्याचे आयुध कुंत हे आहे. या दिशेची राशी कन्या (६) आहे. या दिशेचा रंग धूम्र आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धैर्य लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचे ग्रह राहू-केतू हे आहेत.

*५. पश्चिम दिशा* : 
या दिशेचा दिशापालक वरुण देव आहे. त्याची पत्नी कालिका आहे. त्याचे नगर (पूर) श्रद्धावती आहे. त्याचे वाहन मगर आहे. त्याचे आयुध पाश हे आहे. या दिशेची राशी तुल (७) व वृश्चिक (८) आहे. या दिशेचा रंग लाल, तांबडा व काळा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला गज लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह शनीदेव हा आहे.

*६. वायव्य दिशा* :
 या दिशेचा दिशापालक वायूदेव आहे. त्याची पत्नी अंजनी देवी आहे. त्याचे नगर (पूर) गंधवती आहे. त्याचे वाहन हरीण आहे. त्याचे आयुध ध्वज हे आहे. या दिशेची राशी धनु (९) आहे. या दिशेचा रंग पांढरा, निळा, काळा, करडा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला विजय लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह चंद्र हा आहे.

*७. उत्तर दिशा* :
 या दिशेचा दिशापालक कुबेर देव आहे. त्याची पत्नी चित्रलेखा देवी आहे. त्याचे नगर (पूर) अलकावती आहे. त्याचे वाहन पांढरा घोडा आहे. त्याचे आयुध खड्ग हे आहे. या दिशेची राशी मकर (१०), कुंभ (११) आहे. या दिशेचा रंग पिवळा, पोपटी, हिरवा, पिवळसरपांढरा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला धन लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह बुध हा आहे.

*८. ईशान्य दिशा* :
 या दिशेचा दिशापालक देवाधिदेव महादेव आहे. त्याची पत्नी सती देवी व पार्वती देवी आहे. त्याचे नगर (पूर) कैलास (हिमालय) आहे. त्याचे वाहन वृषभ (बैल) आहे. त्याचे आयुध त्रिशूळ हे आहे. या दिशेची राशी मीन (१२) आहे. या दिशेचा रंग हिरवा, पांढरा आहे. अष्टलक्ष्मी मध्ये या दिशेला संतान लक्ष्मीचे स्थान आहे. या दिशेचा ग्रह गुरु हा आहे.

Friday, February 1, 2019

लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करू शकता :

*श्री स्वामी समर्थ* 

नवीन वर्ष आपल्या जीवनात आनंद आणि सुख आणेल या अपेक्षेने आपण बरेच उपाय करतो. त्या सबोतच तुम्ही *लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करू शकता :*  
 
$ घराच्या मुख्य दारापासूनच *सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचा आदान प्रदान सुरू होतो.* म्हणून घरातील दारावर *चांदीने बनलेले स्वस्तिक लावावे* ज्याने घरात सकारात्मकता येते.  
 
$ धन देवता कुबेराचे घर *उत्तर दिशेत असते तर या वर्षी उत्तर दिशेला सशक्त बनवा.*  
 
$ घरात झाड झुडपं लावल्याने सकारात्मक ऊर्जेला जागा मिळते. ही *पूर्व दिशेचे दोषांना दूर करून संतुलन बनवण्याचे काम करतात.*  
 
$ घरातील *उत्तर, पूर्वेकडून कचरा फेकून, जुने कपडे व इतर वस्तूंना हटवून द्या, यामुळे घरात क्लेश होतो.*  
 
$ घरात असे चित्र जसे *वीरानं घर, भांडण, पतझड इत्यादी नकारात्मक गोष्टींना वाढवतात त्याच्या जागेवर मनाला उत्साह, आनंद, उमंग, शांती व तरोताजा करणारे चित्र लावावे.*  
 
$ जल तत्त्व संबंधी चित्रांना *झोपण्याच्या खोलीत लावू नये.*  
 
$ दक्षिण-पश्चिमांमध्ये *आरसा नाही लावायला पाहिजे.* यामुळे बनत असलेले काम शेवटच्या टप्प्यात येऊन पूर्ण होत नाही.  
 
$ घरातील *दक्षिण दिशेत जलतत्त्व किंवा निळा रंग नसावा.* पण जर ते फारच गरजेचे असेल तर *हिरवा आणि लाल रंगांचा मिश्रण किंवा फक्त लाल रंगाचा प्रयोग केला पाहिजे.*  

 
$ नवीन वर्षात जमिनीची खरेदी करताना त्याच्या *आजूबाजूचे रस्ते आणि त्याचा उतार कोणत्या बाजूला आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. असे प्लॉट नाही घ्यायला पाहिजे*

$ *दक्षिण-पश्चिमेकडून* रस्ता येत असेल. *दक्षिण दिशेला रस्ता असणारे प्लॉट विकत नाही* घ्यायला पाहिजे. दक्षिण-पश्चिम दिशेला कापणारा प्लॉट देखील नाही विकत घ्यायला पाहिजे.  
 
$  *दक्षिण दिशेच्या स्वयंपाक घरात पांढर्‍या रंगाचा कलर केल्याने वास्तू दोष दूर होण्यास मदत मिळत.*

*श्री स्वामी समर्थ संगमनेर*
*तळोले.सर*
*9860795019*
*वाडेकर.सर*
*9767727992*

*विशेष सुचना*
$ वरील सर्व *आध्यत्मिक महीतीत अजिबात बदल न करता आहे तशी शेअर करावी* ह्या छोट्याशा *स्वामीसेवेने आत्मीक समाधान आणी मानसिक आनंद मिळतो.*

गायत्रीमंत्र

🌺🙏🙏गायत्रीमंत्राबद्दल लोकांना खूप कुतूहल असते. पण
त्याबद्दलची विशेष माहिती नसते. बहुतेकांना 'ॐतत्सवितु:' ही सविता (सूर्य) गायत्री माहिती आहे.पण अशा एकंदर चोवीस गायत्र्या आहेत,गायत्र्या निरनिराळ्या देवतांच्या निरनिराळ्या असतात.
सर्व ठिकाणी एकवाक्यता नाही; पण सविता गायत्री हीच मुख्य मानली जाते.ज्या गायत्र्यांचा लोक साधारणत: जप करतात
त्या पुढे दिल्या आहेत:-
💥१. सूर्य गायत्री
ॐ तत्सविर्तुवरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि । धीयोयोन:
प्रचोदयात् ।।
💥२. विष्णु गायत्री
ॐ नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि ।
तन्नो विष्णु: प्रचोदयात् ।।
💥३. महादेव गायत्री
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि । तन्नो रुद्र:
प्रचोदयात् ।।
💥४. गणेश गायत्री
ॐ एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि ।
तन्नो दन्ती प्रचोदयात् ।।
💥५. आदित्य गायत्री
ॐ भास्कराय विद्महे महद्युतिकराय धीमहि ।
तन्नो आदित्य प्रचोदयात् ।।
💥६. श्रीलक्ष्मी गायत्री
ॐ महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि ।
तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् ।।
💥७. पांडुरंग गायत्री
ॐ भक्तवरदाय विद्महे पांडुरंगाय धीमहि ।
तन्नो कृष्ण: प्रचोदयात् ।।
💥८. ब्रह्मा गायत्री
ॐ चतुर्मुखाय विद्महे हंसारूढाय धीमहि । तन्नो ब्रह्म:प्रचोदयात् ।।
💥९. नृसिंह गायत्री
ॐ नृसिंहाय विद्महे वङ्कानखाय धीमहि ।
तन्नो नृसिह: प्रचोदयात् ।।
💥१०. कृष्ण गायत्री
ॐ देवकी नंदनाय विद्महे वासुदेवाय धीमहि ।
तन्नो कृष्ण: प्रचोदयात् ।।
💥११. अग्नी गायत्री
ॐ सप्तजिव्हाय विद्महे अग्निदेवाय धीमहि ।
तन्नो अग्नि: प्रचोदयात् ।।
💥१२. इंद्र गायत्री
ॐ सहस्रनेत्राय विद्महे वङ्काहस्ताय धीमहि ।
तन्नो इंद्र: प्रचोदयात् ।।
💥१३. हनुमान गायत्री
ॐ अंजनीसुताय विद्महे वायुपुत्राय धीमहि ।
तन्नो हनुमंत: प्रचोदयात् ।।
💥१४. राम गायत्री
ॐ भरताग्रजाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि ।तन्नो राम: प्रचोदयात् ।।
💥१५. चन्द्र गायत्री
ॐ क्षीरपुत्राय विद्महे अमृततत्त्वाय धीमहि ।
तन्नो चन्द्र: प्रचोदयात् ।।
💥१६. यम गायत्री
ॐ सूर्यपुत्राय विद्महे महाकालाय धीमहि ।
तन्नो यम: प्रचोदयात् ।।
💥१७. वरुण गायत्री
ॐ जलबिम्बाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि ।
तन्नो वरुण: प्रचोदयात् ।।
💥१८. राधा गायत्री
ॐ वृषभानुजायै विद्महे कृष्णप्रियायै धीमहि ।
तन्नो राधा प्रचोदयात् ।।
💥१९. दुर्गा गायत्री
ॐ गिरिजायैच विद्महे शिवप्रियायैच धीमहि ।
तन्नो दुर्गा प्रचोदयात् ।।
💥२०. पृथ्वी गायत्री
ॐ पृथ्वदेव्यै विद्महे सहस्रमत्र्यैच धीमहि ।
तन्नो पृथ्वी प्रचोदयात् ।।
💥२१. सीता गायत्री
ॐ जनक नन्दिन्यै विद्महे भूमिजायैच धीमहि ।
तन्नो सीता प्रचोदयात् ।।
💥२२. षण्मुख गायत्री
ॐ षण्मुखाय विद्महे महासेनाय धीमहि ।
तन्नो षण्मुख: प्रचोदयात् ।।
💥२३. वैश्वानर गायत्री
ॐ पावकाय विद्महे सप्तजिव्हाय धीमहि ।
तन्नो वैश्वानर: प्रचोदयात् ।।
💥२४. गौरी गायत्री
ॐ सुभागयैच विद्महे काममालिन्यैच धीमहि ।
तन्नो गौरी प्रचोदयात॥