परमात्माचे स्थान गिरनारला जाण्यासाठी काही महत्त्वाच्या
गोष्टी
१) गिरनारला पादुका दर्शनासाठी जाताना पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन महाराजांना शरण जावे आणि म्हणावे कि मला घेवून चला. त्याआधी पहिल्या पायरीजवळील चढवावा मारुतीचे दर्शन घ्यावे व गुरुशिखर चढण्यासाठी शक्ती द्यावी यासाठी प्रार्थना करावी.
२) चालण्यासाठी चांगली चप्पल घ्यावी (sports sandal उत्तम )आणि त्यावर 10-15 दिवस चालण्याची practice करावी.
३) सॉक्स पायात घातले तर पायात थंडी वाजत नाही.
४) साधारण रात्री 11 वाजता चालायला सुरुवात करावी म्हणजे उन्हाचा त्रास होत नाही व पहाटेच्या प्रसन्न वातावरणात पादुकांचे पुढे नतमस्तक होता येते . अंदाजे ५ तास लागतत.
५) कपडे सुटसुटीत असावे, जीन पॅन्ट अथवा नेहेमी घालतो तशी पॅन्ट नसावी .
६) स्वेटर आणि कानटोपी बरोबर असावी साधारण 6000 पायरी नंतर पहाटेचा गार वारा असतो .
७) हातात काठी घ्यावी त्याने चालण्यासाठी मदत मिळते. (३०रुपये रेंट त्यातील २० रुपये परत मिळतात ).
८) पाण्याची बाटली घ्यावी , रस्त्यामध्ये पण मिळते. त्यात electrol पावडर टाकली तर तरतरी येते. electrol पावडर व glucose पावडर प्रत्येकांनी घ्यावे. पाहिले 3000 पायऱ्या खूप घाम येतो त्यावेळी खरी गरज भासते .
९) खिशामध्ये खडीसाखर , गोड गोळ्या (eclair ) घ्यावेत.
१०) कमरेला pouch असेल तर उत्तम.
११) start तो end कुठेही toilet नाही हे लक्षात ठेवावे.
१२) ज्यांना गुडघेदुखी चा त्रास आहे त्यांनी kneecap ठेवावी, उतरताना त्याचा खूप उपयोग होतो .
१३) रात्री अंधारात चालणे उत्तम त्यामुळे किती चाललो याचा अंदाज येत नाही. (शक्यतो 6/8 ग्रुपमध्ये जावे ). चढताना पायऱ्यावर नंबर टाकलेले आहेत त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे .
१४) pocket torch बरोबर घ्यावी , 2 extra सेल बरोबर असावे . वाटेत लाईट आहेत पण मध्ये मध्ये खूप अंतर आहे .
१५) आपल्यापेक्षा बरेच physically unfit, वयस्कर लोक गिरनार पर्वत चढतात त्यामुळे महाराजांवर श्रद्धा ठेवावी, विश्वास असेल तर दत्तनाम जप चालू ठेवावा . वेगळी अंतशक्ती मिळते .
१६) ही शर्यत नाही त्यामुळे दम लागला कि बसावे. त्याने Stamina वाढतो . बरोबर च्या लोकांशी थोडी चर्चा करावी , थोडे फ्रेश वाटते .
१७)उतरताना हळूहळू उतरावे. घाई केली तर पायात गोळे येतात. उतरताना काठी चा फार उपयोग होतो पायाचा भार थोडा काठीवर टाकावा म्हणजे उतरणे सोपे होते .
१८) जमले तर उतरल्यावर पायाला मालिश करून घ्यावी त्यामुळे थोडा आराम मिळतो. आता ऍक्युप्रेशरचे मशीन घेऊन एक जण बसतात खाली।त्यावर 2,3 मिनिटे उभारल्यावर शरीराला बराच आराम मिळतो।
१९) त्रिपुरी पोर्णिमा (साधारण 4 नोव्हेंबर ) च्या चार दिवस आधी गिरनार परिक्रमा असते. वर्षातील फक्त हे चार दिवस forest dept हा जंगलातील रस्ता खोलते, तेव्हा किमान एकदा तरी ही परिक्रमा करावी याला खूप पौराणिक महत्व आहे.
दत्त भक्ती मार्गातील गिरनार पर्वतावरील पादुकांचेदर्शन हा एक अत्त्युच्च क्षण अहे. तर भाविकांनी नक्कीच गिरनार पर्वतावर जावे. नेणारा आणि आणणारा तो आहे हे कायम लक्षात ठेवावे. सर्व कर्ता करविता, तो आहे ह्यावर दृढ विश्वास ठेवावा .
20) काही कारणास्तव कोणाला चढणे नाही जमले तर डोलीचा आधार घ्यावा . लोकं काय म्हणतील / बरोबर चे काय म्हणतील म्हणून डोलीत बसणे टाळू नये. डोली ही कुठल्याही ठिकाणी मिळू शकते . अश्या वेळी इतर डोलीवाल्यांच्या संपर्कात रहावे ते अथवा जवळ असणारे दुकानदार डोलीची व्यवस्था करतात . डोलीचा खर्च आपले आपण करायचा आहे .
21) गोरक्षनाथ मंदिर सोडल्यानंतर एकही दुकान वाटेत नाही , पादुकांचे ठिकाणी एकही दुकान अथवा हार , फुले मिळत नाही . कोरडा प्रसाद अथवा भक्तीभावे पादुकांचे ठिकाणी अर्पण करावयाच्या ऐच्छिक वस्तू न विसरता सॅक मध्ये एका वेगळ्या कप्प्यात ठेवाव्या .
शेवटचे व अत्यंत महत्वाचे, पादुकांचे दर्शन झाल्यावर खाली कमंडलू तीर्थ येथे सर्वांनी प्रसाद घ्यावा तो तुम्हाला खूप energy देतो , कारण तुम्हाला परत साधारण 2000 पायऱ्या चढायच्या असतात व तेथे असलेल्या सेवकवर्गांशी अदबीने वागावे . विनाकारण हुज्जत अथवा भांडण करू नये . जमल्यास ऐपतीनुसार तेथे दानधर्म करावा .
या वर्षीची 15 नोव्हे ते 22 नोव्हें या काळात आहेत।
38 km ची ही पायी परिक्रमा असते।ही परिक्रमा फक्त पायी करता येते।डोली,वाहन या द्वारे करता येत नाही।
श्रीपाद श्रीवल्लभ
जय गिरनारी
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"