नवीन कपडे खरेदी आणि परिधान करणे सर्वांना आवडते. यामुळे आपल्याला आनंद होतो, यासोबतच मूडही फ्रेश राहतो नवीन कपडे खरेदी आणि परिधान करताना काही गोष्टींकडे लक्ष दिल्यास यामुळे आपले गुडलकही वाढू शकते. याउलट जुने (फाटलेले) कपडे घातल्याने दुर्भाग्य वाढते. ज्योतिष ग्रंथ बृहतजातकम् यामध्ये कपड्यांशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
1. नवीन कपडे खरेदी करण्यासाठी शुक्रवार सर्वात चांगला दिवस आहे. शनिवारी नवीन कपडे खरेदी करू नयेत.
2. ज्योतिष शास्त्रानुसार, शुभ नक्षत्र (अश्विनी, चित्रा, रोहिणी)मध्ये नवीन कपडे खरेदी आणि परिधान केल्याने गुडलक वाढते.
3. फाटलेले, जळालेले कपडे कधीही घालू नयेत आणि सांभाळूनही ठेवू नयेत. असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव आयुष्यावर पडतो.
4. तुम्ही खूप जास्त निगेटिव्ह विचार करत असाल तर पिंक किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करणे शुभ राहते.
5. एखाद्या कामामध्ये यश प्राप्त करण्याची इच्छा असल्यास पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावेत.
6. लाल रंगाच्या कपड्यांचा संबंध शुक्र आणि पिवळ्या रंगाचा संबंध गुरु ग्रहाशी आहे.
7. जुने झालेले कपडे कधीही फेकून देऊ नयेत, हे एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावेत. यामुळे शनीशी संबंधित दोष दूर होतात.
8. मनुस्मृतीनुसार, जो व्यक्ती अस्वच्छ कपडे परिधान करतो तो नेहमी गरीब राहतो. देवी लक्ष्मी अशा लोकांच्या घरात कधीही
प्रवेश करत नाही. यामुळे नेहमी स्वच्छ वस्त्र परिधान करावेत.
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"