केश शास्त्रानुसार केव्हा कापावेत माहीती
नोटः पुत्रवंतनी(ज्यांना मुलगा आहे)सोमवारी केस कापु नये
प्राचीन काळापासून दाढी करण्यासाठी आणि केस कापण्यासाठी काही दिवस वर्ज्य सांगण्यात आले आहेत. या संदर्भात मान्यता आहे की, वर्ज्य दिवसांमध्ये करण्यात आलेल्या या कामांमुळे विविध प्रकारचे अशुभ फळ प्राप्त होतात. शास्त्रानुसार दैनंदिन जीवनात शुभफळ प्राप्त करण्यासाठी काही प्रथा तयार करण्यात आल्या असून यांचे पालन आजही केले जाते. यातीलच एक प्रथा दाढी करणे आणि केस कापण्यासंदर्भात आहे. येथे जाणून घ्या, या कामाशी संबंधित प्रथा, केव्हा दाढी करावी केव्हा करू नये, केव्हा केस कापावेत आणि केव्हा कापू नयेत...
या दिवसांमध्ये करू नये हे काम
शास्त्रानुसार मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी केस कापू नयेत. हा अपशकून मानला जातो. आजही घरातील वृद्ध मंडळी शनिवार, मंगळवार आणि गुरुवारी केस न कापण्याचा सल्ला देतात.
पुढे जाणून घ्या, या दिवसांमध्ये हे काम का करू नये....
शास्त्रातील मान्यता -
- शास्त्रानुसार मंगळवारी व अमवस्याला केस कापल्यास आपले आयुष्य आठ महिन्यांनी कमी होते.
- गुरुवार सर्व देवतांचे गुरु बृहस्पतीचा वार मानला गेला आहे. या दिवशी केश कापल्यास अशुभफळ प्राप्त होतात.
- शनिवारी केस कापल्यास आयुष्य सात महिन्यांनी कमी होते.
- इतर दिवस बुधवार, शुक्रवार आणि रविवारी हे काम करू शकता. या दिवसांमध्ये हे काम केल्यास दोष लागत नाही.
पुढे जाणून घ्या, ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी केस कापल्यास कोणते फळ प्राप्त होते...
ज्योतिष शास्त्रातील मान्यता -
शास्त्रानुसार मंगळवार मंगळ देवाचा दिवस आहे. शरीरात मंगळ देवाचा निवास रक्तामध्ये असती आणि रक्तापासून केसांची उत्पत्ती होते. अशाचप्रकारे शनिवार शनि ग्रहाचा दिवस असून शनीचा आपल्या त्वचेशी संबंध आहे. यामुळे मंगळवार आणि शनिवारी केस कापल्याने मंगळ आणि शनि ग्रहसंबंधित अशुभ प्रभावांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे या दिवसांमध्ये केस न कापण्याचा सल्ला दिला जातो.
आजकाल या गोष्टींना अंधश्रद्धा मानले जाते, परंतु शास्त्रीय मान्यतेनुसार प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी बनवलेल्या या प्रथांचा आपल्या जीवनावर खोलवर प्रभाव पडत असतो.
पुढे जाणून घ्या, या संदर्भातील आणखी एक प्रचलित कारण...
हे आहे प्रचलित कारण
असे मानले जाते की, आठवड्यातील काही दिवशी ग्रहांमधून निघणारे किरणं आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. शनिवार, मंगळवार आणि गुरुवार या दिवसांशी संबंधित ग्रहांच्या किरणांचा प्रभाव आपल्या डोक्यावर पडतो. आपया शरीरातील महत्त्वाचा भाग डोक असून त्यामधील मेंदू अतिसंवेदनशील आणि खूप नाजूक असतो. याचे रक्षण केसांमुळे होते. याच कारणामुळे या दिवसांमध्ये केस कापू नयेत.
आयुष्य वाढण्यासाठी केश कापल्यानंतर स्नान करने
ज्योतिष आकाश पुराणिक
No comments:
Post a Comment
im writing under "Comment Form Message"